मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime: धक्कादायक ! निवडणुकीत प्रतिमा मलीन करण्याची धमकी देत नगरसेविकेला मागितली २५ लाखांची खंडणी

Pune Crime: धक्कादायक ! निवडणुकीत प्रतिमा मलीन करण्याची धमकी देत नगरसेविकेला मागितली २५ लाखांची खंडणी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 06, 2022 03:03 PM IST

पुण्यात भाजपच्या एका माजी नगरसेवकिला निवडणुकीत प्रतिमा मलिन करण्याची धमकी देऊन तिला तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी एका माहिती अधिकारी कार्यकर्त्याला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे: बेकायदेशीर बांधकामाबाबत खोटे अर्ज दाखल करुन येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत प्रतिमा मलीन करण्याची भिती घालून नगरसेविका मुक्ता जगताप व त्यांच्या पतीकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जितेंद्र अशोक भोसले (रा.विमाननगर, पुणे) या माहिती अधिकार कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात अर्जुन धोंडीबा जगताप (वय ४५, रा.विमाननगर,पुणे) यांनी आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना ३०/७/२०२० ते २५/८/२०२२ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन जगताप यांच्या पत्नी मुक्ता जगताप या भारतीय जनता पक्षाकडून महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत नगरसेवक पदावर निवडून आलेल्या आहेत. आरोपी जितेंद्र भोसले याने तक्रारदार व्यवसायिक अर्जुन जगताप व त्यांच्या नगरसेविका पत्नी मुक्ता जगताप यांना त्यांच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत खोटे अर्ज दाखल करून तुम्हाला अडचणीत आणू त्याचप्रमाणे आगामी महानगरपालिका निवडणुकीत तुमची प्रतिमा मलीन करु अशी धमकी देत जगताप यांच्या कडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.

खंडणीचे २५ लाख रुपये न दिल्यास जिवे ठार मारण्यात येईल अशी धमकी ही दिली. त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्हात अडकवून राजकीय कारकीर्द खराब करण्याची धमकी दिली. भोसले याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर नगरसेविकेच्या पतीने याप्रकरणी विमाननगर पोलिस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग