मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandarpur News : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मूर्ती, बांगड्या अन् बरंच काही

Pandarpur News : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मूर्ती, बांगड्या अन् बरंच काही

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 31, 2024 07:06 PM IST

Pandharpur Vitthal rukmini Mandir : मंदिराच्या जीर्णोध्दाराचं काम सुरू आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरुप देण्याचे काम सुरू असताना विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाज्याखाली तळघर सापडले आहे. त्यामध्ये पुरातन मूर्तीसह अन्य वस्तू सापडल्या आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात सापडलं तळघर
पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात सापडलं तळघर

Vitthal Mandir Basement : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक पुरातन तळघर सापडल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघराची पाहणी केली असता त्यामध्ये मूर्ती व मूर्तींचे अवशेष आढळले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

मंदिराच्या जीर्णोध्दाराचं काम सुरू आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरुप देण्याचे काम सुरू असताना विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाज्याखाली तळघर सापडले आहे. वंश परंपरागत पुजारी, वारकरी संप्रदाय, पुरातत्व तज्ञ यांच्या समोर शुक्रवारी संध्याकाळच्या  सुमारास हे तळघर उघडण्यात आले. यावेळी दोन मूर्ती भग्न अवस्थेत आढळली तर १ मुर्ती चांगल्या स्थितीतील आहे.

मूर्तीवर धूळ बसल्याने मूर्ती कोणत्या देवाची आहे हे समजू शकले नाही. मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे. ही मूर्ती विष्णूशी मिळतीजुळती असल्याचे सांगितले जात आहे. मूर्तीसोबतच अन्य काही वस्तूही आढळल्या आहेत. तळघरातील या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षांपूर्वीच्या असू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर याची माहिती समोर येऊ शकते.  

दरम्यान सुमारे ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी पाहिलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जसेच्या तसे आता अनुभवायला मिळणार आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे खूप जूने, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पुरातत्वीय महत्व असणारे मंदिर आहे. मात्र, यामध्ये काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे अनेक बदल झाले होते. याच मंदिराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. हे काम सुरू असतानाच मंदिरात हे तळघर आढळून आलं आहे.

विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ तळघराचा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले आहे. 

तळघरात ६ बाय ६ फुटाचे चेंबर असून येथे ६ वस्तू आढळल्या. मातीच्या बांगड्या तसेच दगडातील कोरीव मूर्ती सापडल्या. हे तळघर आतून बंदिस्त आहे. 

९ दरवाजे चांदीने चकाकणार -

जीर्णोध्दारानंतर नव्याने तयार झालेले मंदिर भाविकांना ७०० वर्ष मागे घेऊन जाणार आहे.पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे ७०० वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे ८०० ते ९०० किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. विठ्ठल गर्भ गृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे. या बरोबरच मंदिरातील गरुड खांब, मेघडंबरी देखील चांदीने मडवली जाणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग