मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या अनेक मूर्ती, कुणाच्या कमरेवर हात तर कुणाच्या हातात शस्त्र, पाहा PHOTOS

Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या अनेक मूर्ती, कुणाच्या कमरेवर हात तर कुणाच्या हातात शस्त्र, पाहा PHOTOS

May 31, 2024 09:21 PM IST
  • twitter
  • twitter
Pandharpur Vitthal Temple Basement : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील संवर्धन व सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गर्भगृहातील काम पूर्ण झाल्याने २ जूनपासून चरणस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. त्यातच आज मंदिरात आढळलेल्या तळघरात अनेक पुरातन मूर्ती सापडल्या आहेत.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरुप देण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील संवर्धन व सुशोभिकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु असतानाच एक दगड खचला. तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी ६ बाय ६ फुट खोल तळघर आढळले. या तळघरात मोठ्या तीन तर लहान दोन मुर्ती सापडल्या आहेत. त्याचबरोबर पादुका, बांगड्या चे तुकडे, पैशाची जुनी नाणी सापडली आहेत.
share
(1 / 6)

पुरातत्व विभाग व वास्तू विशारद तसेच मंदिर समितीच्या अधिकाऱ्याच्या उपस्थित सायंकाळी तळघराची पाहणी करण्यात आली. यावेळी आधी दोन लहान मुर्त्या सापडल्या. त्यानंतर पादुका सापडली. यानंतर तळघरात चूनामाती, बांगड्याचे काच तुकडे सापडले. त्यानंतर पैशाची जुनी नाणी सापडली. तर आणखी आता उतरून पाहिले असता विष्णू, व्यंकटेश व महिषासूर मर्दिनी अवतारातील चार फूट उंचीच्या मुर्त्या सापडल्या आहेत. 
share
(2 / 6)

कमरेवर हात ठेवून असलेली मूर्ती सुद्धा सापडली आहे. त्यामुळे ही मूर्ती मूळ मूर्ती आहे का असा प्रश्न उपस्थितीत झाला. तसंच एक मूर्ती हातात शस्त्र घेतलेली दिसत आहे. आणखी ३ वेगवेगळ्या मूर्ती सापडल्या आहेत..
share
(3 / 6)

तळघराबाबत असाही एक अंदाज वर्तवला जात आहे की, मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होती. मुर्ती ठेवण्यासाठीच हे तळघर आहे का ? याबाबतही माहिती घेतली जात आहे.
share
(4 / 6)

विठ्ठल मंदिराच्या तळघरात तीन मोठ्या मूर्ती सापडल्या आहेत. यात दोन विष्णू अवतारातील, एक महिषासूर मर्दिनीची आहे तर दोन लहान मुर्त्या सापडल्या असून पादुका देखील सापडल्या आहेत. तसेच तळघरात बागड्यांचे तुकडे, जुनी पैशांची नाणी देखील सापडली आहेत. सर्व मूर्ती काळ्या पाषाणातील आहेत.
share
(5 / 6)

तळघरात आढळलेल्या सर्व मूर्ती भग्न अवस्थेतील, चिरा पडलेल्या, चेहरा क्रॅक झालेल्या आहेत. या मूर्ती १५ व्या ते सोळाव्या शतकातील असाव्यात. मूर्ती जरी फुटलेल्या, तडे गेलेल्या असल्या तरी त्या-त्या काळात दुरुस्त देखील केल्याचे दिसून येते. दुरुस्तीसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तज्ञ लोकांची मदत घेतली जाईल. अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी दिली.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज