Currently, there are no live matches.
क्रिकेट स्कोअर आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी क्रिकेटशी संबंधित अनेक अॅप्स आहेत. मात्र, हिंदुस्तान टाइम्स मराठी तुम्हाला सर्व अपडेट्स व विस्तृत कव्हरेज देतो.
क्रिकेटमध्ये लाइव्ह स्कोअर तंत्रज्ञानाच्या मदतीने दाखवला जातो. लाइव्ह स्कोअरचे पेज वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी, सरासरी व अन्य छोट्यामोठ्या तपशीलाने डिझाइन केलेले असतात. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने ते आपोआप अपडेट होतात. जवळपास शंभर वर्षांपूर्वी क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा आकडेवारी लिहिण्यासाठी कागदपत्रांचा आधार होता. त्यानंतर हा तपशील पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाला. आता कागदाचा वापर संपला आहे.
क्रिकेट स्कोअर शीटमध्ये खेळाडूंची नावे आणि त्यांच्या नावासमोर त्यांनी केलेली धावसंख्या, घेतलेल्या बळींचे आकडे नोंदवले जातात. त्याशिवाय त्यात धावांची सरासरी, धावगतीची सरासरी, षटके, झेल, षटकार, चौकार, विकेट्स आदीची माहिती असते. शालेय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील याच पद्धतीने स्कोअर शीट लिहिली जाते.
लाइव्ह स्कोअरला क्रिकेटप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. लाइव्ह स्कोअर पेजवर एकाच नजरेत अनेक गोष्टी चटकन पाहता येतात. ज्यांना प्रत्यक्ष मैदानावर जाऊन सामना पाहता येत नाही किंवा कामामुळे टीव्हीसमोर बसता येत नाही, त्यांना लाइव्ह स्कोअर हा मोठा आधार असतो.