श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव
आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. मात्र, याआधी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २१३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १७२ धावांवर गारद झाला. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालागेने सर्वाधिक ४२ धावा केल्या तर धनंजय डीसिल्वाने ४१ धावा केल्या.
तर भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
श्रीलंकेची आठवी विकेट पडली
१७१ धावांवर श्रीलंकेची आठवी विकेट पडली. महिष तिक्षिना १४ चेंडूत २ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. आता दुनिथ वेलालगे आणि कसून रजिथा क्रीजवर आहेत. ४१ षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या १७२/८ आहे.
धनंजय डी सिल्वा बाद
१६२ धावांवर श्रीलंकेची सातवी विकेट पडली. धनंजय डी सिल्वा ६६ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ४१ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. आता टीम इंडिया या सामन्यात पुनरागमन करू शकते. श्रीलंकेसाठी क्रीजवर एकही अनुभवी फलंदाज नाही. खालच्या फलंदाजांना ५० धावा करणे सोपे जाणार नाही.
धनंजय डिसिल्वा-वेल्लालागे यांच्यात ५० धावांची भागिदारी
श्रीलंकेच्या धावसंख्येने सहा विकेट गमावून १५० धावा केल्या आहेत. दुनिथ वेलालगे आणि धनंजय डी सिल्वा यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केल्याने श्रीलंकेचा संघ सामन्यात परतला आहे. आता भारतीय गोलंदाजांवर दबाव वाढत आहे. टीम इंडियाला ही भागीदारी लवकरच तोडावी लागणार आहे.
श्रीलंकेची सहावी विकेट पडली
९९ धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची सहावी विकेट पडली. दुसान शनाका १३ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. आता धनंजय डी सिल्वासोबत दुनिथ वेलालगे क्रीझवर आहे. २६ षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या सहा गड्यांच्या मोबदल्यात १०१ धावा आहे.
श्रीलंकेचा निम्मा संघ गारद
भारतीय संघाने श्रीलंकेचा निम्मा संघ ७३ धावांत गुंडाळला आहे. फिरकीपटू कुलदीप यादवने चरित असलंकाला झेलबाद केले. चारिथला केवळ २२ धावा करता आल्या.
श्रीलंकेची चौथी विकेट पडली
६८ धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची चौथी विकेट पडली. सदीरा समरविक्रमा ३१ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्याला लोकेश राहुलने यष्टिचित केले. आता धनंजय डी सिल्वा चरित असलंकासोबत क्रीजवर आहे.
श्रीलंकेला तिसरा धक्का
श्रीलंकेची तिसरी विकेट २५ धावांवर पडली. दिमुथ करुणारत्नेला मोहम्मद सिराजने शुभमन गिलच्या हाती झेलबाद केले. त्याने १८ चेंडूत दोन धावा केल्या. सध्या चरिथ असलंका आणि सदीरा समरविक्रमा क्रीजवर आहेत.
श्रीलंकेला दुसरा धक्का
२५ धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेला दुसरा धक्का बसला आहे. कुसल मेंडिस १६ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.
श्रीलंकेची पहिली विकेट पडली
सात धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची पहिली विकेट पडली. पथुम निसांका सात चेंडूत ६ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला यष्टिरक्षक लोकेश राहुलकडे झेलबाद केले. आता करुणारत्ने आणि कुसल मेंडिस क्रीजवर आहेत. चार षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर १५ धावा आहे.
भारत २१३ धावात गारद
भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.१ षटकात सर्वबाद २१३ धावा केल्या. आता श्रीलंकेला विजयासाठी ५० षटकात २१४ धावा करायच्या आहेत.
श्रीलंकेसमोर सामना जिंकण्यासाठी २१४ धावांचे लक्ष्य आहे. कर्णधार रोहित शर्मा हा भारतीय संघातील एकमेव फलंदाज होता, ज्याने ४८ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला अर्धशतक करता आले नाही. दुनिथ वेलाल्गे आणि चारिथ असलंका या दोन फिरकीपटूंसमोर संपूर्ण भारतीय संघ गारद झाला. असलंकाने १८ धावात ४ तर वेल्लालगेने ४० धावात ५ विकेट घेतल्या.
भारताच्या २०० धावा
भारताची धावसंख्या नऊ गड्यांच्या मोबदल्यात २०० धावा पार झाली आहे. अक्षर पटेल आणि सिराज क्रीजवर आहेत.
पावसामुळे खेळ थांबला
पावसामुळे खेळ थांबला आहे. ४७ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या १९७/९ आहे. अक्षर पटेल २९ चेंडूत १५ धावा आणि मोहम्मद सिराज १३ चेंडूत २ धावांवर खेळत आहे.
भारताला नववा धक्का
बुमराहला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर चरित असलंकाने कुलदीप यादवला झेलबाद केले. ४२.२ षटकांनंतर भारताची धावसंख्या ९ विकेटवर १८६ धावा आहे.
भारतीय संघाची सातवी विकेट पडली
१७८ धावांच्या स्कोअरवर भारतीय संघाची सातवी विकेट पडली. रवींद्र जडेजा चार धावा करून बाद झाला. चरित असलंकाने त्याला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकरवी झेलबाद केले. आता अक्षर पटेलसोबत जसप्रीत बुमराह क्रीजवर आहे. ४० षटकांनंतर भारताची धावसंख्या १८०/७ आहे.
वेल्लालगेचे ५ विकेट
दुनिथ वेलल्गेने पाच विकेट पूर्ण केल्या आहेत. वेललगेने हार्दिक पांड्याला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकरवी झेलबाद केले. भारताची धावसंख्या ३६ षटकात ६ बाद १७२ धावा आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत.
३३ षटकांनंतर भारताच्या १६८ धावा
३३ षटकं संपल्यानंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात १६८ धावा आहे. इशान किशन ३२ आणि हार्दिक पांड्या ४ धावांवर खेळत आहे. इशानने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार मारला आहे.
केएल राहुल बाद, वेल्लालगेची चौथी शिकार
१५४ धावांच्या स्कोअरवर भारतीय संघाची चौथी विकेट पडली. लोकेश राहुल ४४ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. वेललागेने त्याला स्वताच्याच चेंडूवर त्याचा झेल घेत बाद केले. आतापर्यंत या सामन्यात वेलालगेने चारही विकेट घेतल्या आहेत. भारताच्या ३० षटकात १५४ धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या आणि इशान किशन क्रीजवर आहेत.
इशान किशन आणि लोकेश राहुलने डाव सावरला
भारताचे तीन विकेट लवकर पडल्यानंतर इशान किशन आणि लोकेश राहुल यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळली. दोघेही सावधपणे खेळत आहेत आणि मोठ्या भागीदारी करून टीम इंडियाला सामन्यात चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. २६ षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावा आहे.
भारत ३ बाद ११९
२३ षटक संपल्यानंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावा आहे. केएल राहुल १० आणि इशान किशन १६ धावा करून खेळत आहे.
भारतीय संघाला तिसरा झटका
भारतीय संघाला तिसरा झटका बसला आहे. ड्युनिट वेल्लालगेनं रोहित शर्माला बोल्ड केले. वेल्लालगेनं तीनही विकेट घेतल्या. भारताची धावसंख्या १५.१ षटकांनंतर तीन गड्यांच्या मोबदल्यात ९१ धावा आहे. इशान किशन आणि केएल राहुल खाते न उघडता क्रीजवर आहेत.
कोहली आऊट
भारताला दुसरा धक्का बसला आहे. विराट कोहलीला डावखुरा फिरकी गोलंदाज ड्युनिथ वेल्लालगेनं बाद केले. कोहलीने १२ चेंडूत ३ धावा केल्या. आता इशान किशन फलंदाजीस आला आहे. भारताची धावसंख्या १३.५ षटकांनंतर २ बाद ९० अशी आहे.
रोहित शर्माचे अर्धशतक
आशिया कप 2023 मध्ये कर्णधार रोहित शर्माचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. रोहितने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकले आहे. त्याने नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्धही अर्धशतके झळकावली. रोहितने ४४ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.
भारताला पहिला धक्का
भारताला पहिला धक्का बसला आहे. शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. गिलला फिरकी गोलंदाज ड्युनिथ वेलेझने बोल्ड केले. गिलने २५ चेंडूत १९ धावा केल्या. भारताच्या सध्या १२ षटकात ८२ धावा झाल्या आहेत. विराट कोहली २ आणि रोहित शर्मा ४७ धावांवर खेळत आहेत.
१०षटकात ६५ धावा
१० षटक संपल्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या ६५ धावा अशी आहे. कर्णधार रोहित शर्मा ३९ आणि शुभमन गिल १८ धावांसह खेळत आहे.
रोहित शर्मा १० हजारी
रोहित शर्माच्या वनडेत १० हजार धावा पूर्ण
रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा रोहित हा सहावा भारतीय फलंदाज आहे. २४८ सामन्यांच्या २४१ डावांत रोहित शर्माने हा टप्पा गाठला आहे.
भारताची फलंदाजी सुरू
भारतीय संघाची फलंदाजी सुरू झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.
दोन्ही प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.
भारताची प्रथम फलंदाजी
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासोबत अक्षर पटेलही हा सामना खेळत आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर आहे. बीसीसीआयने एक अपडेट जारी करून याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता. मार्चमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली. मात्र, आता ही समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे.
विराटला विश्रांती मिळू शकते
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १२२ धावांची शानदार खेळी केली आणि लोकेश राहुलसोबत २३३ धावांची भागीदारी केली. अशा स्थितीत टीम इंडियात विराटला विश्रांती देऊन श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.
श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला
श्रीलंकेने सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा २१ धावांनी पराभव केला होता. या रोमांचक सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने अप्रतिम गोलंदाजी करत अखेरच्या काही षटकांमध्ये श्रीलंकेचा संघ विजयी झाला. आता श्रीलंका भारताविरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल.
केएल राहुलला विश्रांती मिळू शकते
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात केएल राहुलचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाले. त्याने शानदार शतकी खेळी खेळली. राहुलने ११ धावा केल्या. यानंतर त्याने विकेटकीपिंगही केले. दुखापतीतून परतल्यानंतर राहुलची फिटनेस टेस्टही झाली. आता भारताला आज पुन्हा सामना खेळायचा आहे. सावधगिरी म्हणून राहुलला आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळवले जाऊ शकते. या स्थितीत इशान किशन यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.
भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल
भारतीय संघ सध्या सुपर फोरच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारताचे एका सामन्यानंतर २ गुण आहेत आणि +४.५६० असा नेट रनरेट आहे. त्याच वेळी, श्रीलंका एका सामन्यात २ गुणांसह आणि +०.४२० च्या नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघ दोन सामन्यांत दोन गुण आणि -१.८९२ या नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि बांगलादेश संघ दोन सामन्यांत दोन पराभवांसह चौथ्या स्थानावर आहे.
कोलंबोचं हवामान स्वच्छ, सामना पूर्ण होणार
क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोलंबोतील सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो, असे याआधी सांगितले जात होते. पण, आता सामन्यापूर्वी चांगलाच सूर्यप्रकाश आहे. चांगला सूर्यप्रकाश हा चाहत्यांसाठी मोठा दिलासा आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना भारतीय संघाच्या आणखी एका सामन्याचा आनंद घेता येणार आहे. वृत्तानुसार, सध्या कोलंबोमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ आहे आणि आकाश देखील स्वच्छ आहे.
दोन्ही संभाव्य प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव/इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा/अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद सिराज
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), डुनिथ वेल्स, महेश तिक्षना, कसून राजिथा, मथिशा पाथिराना.
आजही पावसाची शक्यता
आजच्या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. संपूर्ण सामन्यात आकाश ढगाळ राहील. दुपारी ३ वाजता सामना सुरू होण्याच्या वेळी पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, संध्याकाळी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे या सामन्यातही व्यत्यय येऊ शकतो.
भारत -श्रीलंका प्रेमदासा स्टेडियमवरची आकडेवारी
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचे संघ ३६ वेळा भिडले आहेत. यापैकी भारताने १७ सामने जिंकले असून श्रीलंकेने १६ सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले. गेल्या वेळी, २०२२ आशिया कप टी-20 मध्ये, टीम इंडियाचा सुपर फोरमध्ये श्रीलंकेविरुद्धचा पराभव निर्णायक ठरला होता आणि भारत सुपर फोर फेरीतून बाहेर पडला होता. यावेळी टीम इंडिया बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि श्रीलंका हेड टू हेड
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत भारत आणि श्रीलंका १६५ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी ९६ एकदिवसीय सामने भारताने आणि ५७ श्रीलंकेने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत राहिला तर ११ सामने अनिर्णित राहिले. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचे संघ ३६ वेळा भिडले आहेत.
सूर्या-शमीला संधी मिळू शकते
या सामन्यात भारतीय संघ आपली बेंच स्ट्रेंथ तपासू इच्छितो. सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा हे खेळाडू बेंचवर आहेत. शमी वगळता इतर कोणालाही संधी मिळालेली नाही. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन श्रीलंकेविरुद्ध काही खेळाडूंना आजमावू शकते. सूर्याचाही विश्वचषक संघात समावेश आहे. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन या खेळाडूंच्या सरावावर लक्ष ठेवणार आहे.
टीम इंडिया सलग तिसऱ्या दिवशी खेळणार
भारतीय संघ सलग तिसऱ्या दिवशी क्रिकेट खेळणार आहे. १० सप्टेंबर हा भारत-पाकिस्तान सामन्याचा अधिकृत दिवस होता. भारतीय संघ त्या दिवशी २४.१ षटके खेळू शकला. सोमवारी राखीव दिवशी ५०-५० असा संपूर्ण खेळ झाला. आता संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे.