IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ४३वा सामना खेळला जाणार आहे. या मोसमात दोन्ही संघांनी गेल्या पाचपैकी तीन लढती जिंकल्या असून डीसी सहाव्या आणि पाच वेळा माजी चॅम्पियन ठरलेल्या या संघाला गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव झाला.
कॅपिटल्सने बुधवारी टायटन्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात आपल्या फलंदाजी क्रमात अनेक बदल केले आणि त्यांचे फिनिशर शाई होप आणि अक्षर पटेल यांना वरच्या क्रमावर पाठवले. कॅरेबियन फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नसली तरी अक्षरने (४३ चेंडूत ६६ धावा) कर्णधार रिषभ पंतसोबत मिळून ११४ धावांची भागीदारी रचली. ट्रिस्टियन स्टब्सच्या फिनिशिंग टचमुळे दिल्लीने गुजराविरुद्ध २२४ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दिल्लीचा गोलंदाज रशीख सलाम (३ विकेट) आणि कुलदीप यादव (२ विकेट्स) यांच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी युनिटने गुजरातच्या फलंदाजीला सुरंग लावले. हा सामना दिल्लीने चार धावांनी जिंकला.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सला सोमवारी संजू सॅमसनच्या संघाने दणका दिला. आरआरचा गोलंदाज संदीप शर्माने विकेट घेऊन मुंबईची फलंदाजी फळी मोडीत काढली आणि मुंबईला १७९ धावांवर रोखले. यानंतर राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने आपल्या विजयी शतकाच्या जोरावर राजस्थानला १९ व्या षटकात ९ विकेट्सने विजय मिळवून दिला.
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी १९ सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सने १५ सामन्यात विजय मिळवला आहे. या दोन्ही संघामध्ये खेळण्यात आलेल्या अखेरच्या तिन्ही सामन्यात मुंबईने विजय मिळवला.
दिल्लीचा संभाव्य संघ: पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे/झाय रिचर्डसन, खलील अहमद, मुकेश कुमार.
मुंबईचा संभाव्य संघ: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह