संजू सॅमसनचा भीम पराक्रम

By Rohit Bibhishan Jetnavare
May 08, 2024

Hindustan Times
Marathi

IPL २०२४ चा ५६वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. 

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८६ धावा केल्या. यासह संजूने IPL मध्ये २०० षटकार पूर्ण केले.

संजू सॅमसन हा IPL मध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० षटकार पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. या विक्रमात संजूने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले.

संजूने iplच्या १५९ डावांमध्ये २०० षटकारांचा आकडा पार केला. तर धोनीने १६५ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. 

संजूने या विक्रमात ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नर, किरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल सारखे खेळाडूंना मागे टाकले आहे. 

या यादीत तिसरा भारतीय फलंदाज विराट कोहली आहे. कोहलीने IPLच्या १८० डावात २०० षटकारांचा आकडा पार केला. 

यानंतर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. रोहित शर्माने १८५  डावात २०० षटकार मारण्याचा पराक्रम केला. तर पाचव्या क्रमांकावर सुरेश रैनाने १९३ डावांत हे स्थान गाठले. 

मात्र, आयपीएल सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे.

रोहित शर्माने २४९ सामन्यात २७६ षटकार मारले आहेत. यानंतर अनुक्रमे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक लागतो.