Privacy Policy - https://marathi.hindustantimes.com

प्रायव्हसी पॉलिसी

HT Digital Streams Limited (HTDSL म्हणून संदर्भित) आमच्या वेबसाइटला भेट देणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याची (USER) गोपनीयता राखण्याचे महत्त्व ओळखते. आम्‍ही वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा आणि तुमचा आमच्यावरील विश्‍वासाचा सन्मान करतो. आम्ही तुमच्याबद्दल गोळा करत असलेला डाटा, तो कसा वापरला जातो आणि तो कोणासोबत शेअर केला जातो याबद्दल पारदर्शक राहण्यासाठी वचनबद्ध आहोत.

जेव्हा तुम्ही आमची वेबसाइट, मोबाइल किंवा टॅबलेट अॅप्लिकेशन किंवा इतर कोणत्याही ऑनलाइन सेवा (एकत्रितपणे, ‘सेवा’) वापरता/भेट देता तेव्हा हे गोपनीयता धोरण लागू होते. एचटीडीएसएल किंवा तिच्या समूह कंपन्यांनी इतर कोणत्याही माध्यमांद्वारे गोळा केलेल्या किंवा वापरलेल्या माहितीवर ते नियंत्रित किंवा लागू होत नाही.

आमच्या वेबसाइटला, मोबाईल अप्लिकेशनला भेट देऊन किंवा त्याचा वापर करून तुम्ही या गोपनीयता धोरणाला सहमती दर्शविता. आम्ही तुम्हाला हे गोपनीयता धोरण लक्षपूर्वक वाचण्याची जोरदार शिफारस करत आहोत. जेणेकरून तुमचा वैयक्तिक डेटा वापरण्याबाबत आमचा दृष्टिकोन तुम्हाला समजेल. HT Media Ltd. आणि तिच्या उपकंपन्या (यापुढे ‘कंपनी’ म्हणून संदर्भित) च्या वेबसाइट्स चालवणे आणि व्यवस्थापन करण्याचा अधिकृत परवाना आहे. HTDSL हे hindustantimes.com, livehindustan.com, livemint.com आणि marathi.hindustantimes.com या डोमेनचे व्यवस्थापन करते. आम्ही आवश्यकतेनुसार कोणत्याही वेळी हे गोपनीयता विधान/धोरण सुधारित करण्याचा अधिकार स्वत:कडे राखून ठेवतो.

आम्ही गोळा करत असलेली माहिती:

आम्ही थेट वापरकर्त्यांकडून, तृतीय पक्षांकडून (थर्ड पार्टी) आणि आमच्या वेबसाइट/मोबाइल अॅप्लिकेशन्सद्वारे आपोआप माहिती गोळा करतो. आमच्या सेवांच्या नोंदणीसाठी तुम्हाला नाव, वय, लिंग, संपर्क क्रमांक, ईमेल, पत्ता आणि लोकसंख्याशास्त्रीय (demographic) माहिती (क्षेत्र, स्थान, IP अड्रेस इ.) यासारखी काही वैयक्तिक माहिती नोंदणीसाठी पुरवावी लागेल.

सोयीसाठी, वापरकर्ते आमच्या कोणत्याही साइटवर साइन-अप करू शकतात आणि आम्ही इतर कोणत्याही साइटवर साइन-इन करण्यासाठी समान लॉगिन क्रेडेन्शियल्स सादर करतो (सिंगल साइन-ऑन फिचर). तुम्ही Facebook, Google इ. सारख्या थर्ड पार्टी अकौंटद्वारे तुमच्या खात्याची नोंदणी किंवा लिंक देखील आमच्या सेवांशी करू शकता. जेव्हा तुम्ही आमच्या साइटला भेट देता

किंवा साईटवरील माहितीचा वापर करता तेव्हा आम्ही तुमच्या आयपी अड्रेससह तुमच्या संगणकाच्या इंटरनेट कनेक्शनबद्दल मर्यादित माहिती गोळा करतो. तुमचा IP पत्ता तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. तुमचा ब्राउझर प्रकार, संगणक किंवा मोबाइल डिव्हाइसचा प्रकार, ब्राउझरची भाषा, IP अड्रेस, मोबाइल वाहक, अन्य डिव्हाइस यासारख्या वेबसाइट/अ‍ॅप्सच्या तुमच्या वापरासंदर्भात तुमचा संगणक किंवा मोबाइल डिव्हाइस आम्हाला पुरवत असलेली माहिती देखील आम्ही संकलित करतो आणि संग्रहित करू शकतो. युनिक डिव्‍हाइस आयडेंटिफायर, स्‍थान आणि विनंती केलेले आणि संदर्भ देणार्‍या URL द्वारे माहिती संकलित केली जाऊ शकते.

तुम्ही आमच्या वेबसाईटवर खाते तयार केले नसले तरीही तुम्ही आमच्या वेबसाइट/अ‍ॅप/सेवांवर सामग्री पाहता किंवा संवाद (interact) साधता तेव्हा आम्हाला माहिती मिळते. आमची वेब पृष्ठे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आमच्या वापरकर्त्यांच्या आवडीनुसार आमची साइट तयार करण्यासाठी, वेबसाइटवरील युजर संख्या (ट्रॅफिक) मोजण्यासाठी आम्ही ही माहिती वापरतो. ही माहिती आमच्या जाहिरातदार/तृतीय पक्ष कंपन्यांद्वारे सामग्री, जाहिराती इत्यादी वैयक्तिकृत करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.

आम्ही माहिती कशी गोळा करतो

  • a) तुम्ही आमच्याकडे नोंदणी करता तेव्हा आम्ही थेट तुमच्याकडून माहिती गोळा करतो.
  • b) तुम्ही आमच्या साइट/अ‍ॅप्स ब्राउझ करता, आमच्याकडील ईमेल (प्रचारात्मक किंवा माहितीपूर्ण) उघडता किंवा त्याला प्रतिसाद देता तेव्हा आम्ही माहिती गोळा करतो (तुम्ही आमच्याकडे नोंदणीकृत असाल किंवा नोंदणीकृत नसाल),
  • c) जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाइटवर टिप्पणी किंवा पोस्ट करता त्याचबरोबर फोन किंवा ईमेलद्वारे आम्हाला शंका/प्रश्न विचारता.
  • d) तुम्‍ही तुमच्‍या सोशल मीडिया किंवा थर्ड पार्टी अकाऊंटशी लिंक करून आमच्याकडे नोंदणी करता तेव्हा आम्‍ही तुमच्‍याकडून माहिती गोळा करतो. असे केल्याने, तुम्ही त्यांना अशा खात्यांमधून काही माहिती आमच्यासोबत सामायिक (शेअर) करण्यासाठी अधिकृत करत आहात आणि या गोपनीयता धोरणानुसार ती गोळा करण्यासाठी, संग्रहित करण्यासाठी आणि वापरण्यासाठी आम्हाला अधिकृत करत आहात.
  • e) वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी आम्ही तृतीय पक्ष साधने (third party tools), ब्राउझर कुकीज आणि वेब बीकन्स (web beacons) वापरून तुमच्याकडून माहिती गोळा करतो.
  • f) डिव्हाइस माहिती आम्ही सेवेमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या संगणक, मोबाइल डिव्हाइस किंवा अन्य डिव्हाइसबद्दल वैयक्तिक नसलेली माहिती गोळा करू शकतो, जसे की IP पत्ता, भौगोलिक-स्थान माहिती, अद्वितीय डिव्हाइस अभिज्ञापक (unique device identifiers), ब्राउझर प्रकार, ब्राउझर भाषा आदि. ब्राउझरवर सानुकूलित माहिती प्रदान करण्याच्या हेतूसाठी ही माहिती वापरली जाते.
  • g) तुम्ही अॅप किंवा ब्राउझरमध्ये GPS फिचर अक्टीव्ह केल्यास आमचे मोबाइल अप्लिकेशन्स आणि वेबसाइट तुमचे वर्तमान स्थान कॅप्चर करू शकतात.

कुकी धोरण, पिक्सेल आणि ट्रॅकिंग

कुकीज (Cookies ) या छोट्या मजकूर फायली असतात ज्यात तुम्ही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुमच्या काँप्युटरवर किंवा मोबाइल डिव्हाइसवर डाऊनलोड केलेली थोडीशी माहिती असते. जेव्हा तुम्ही वेबसाइटला पुन्हा भेट देता, किंवा ती कुकी ओळखणाऱ्या भागीदार वेबसाइटला भेट देता, तेव्हा तुमचे डिव्हाइस आमच्या वेबसाइटशी संवाद साधण्यास सक्षम असते आणि वेबसाइट त्या कुकीमध्ये असलेली माहिती वाचू शकते.

आमच्या वेबसाइट्स कार्यक्षमतेने ब्राउझ करण्यासाठी आणि प्रत्येक वेळी तुम्ही भेट देता तेव्हा तुमचा तपशील/प्राधान्ये पुन्हा प्रविष्ट न करून तुमचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही या कुकीज वापरतो. कुकीज आम्‍हाला तुम्‍हाला आवश्यक माहिती पुरवण्‍याची आणि तुमच्‍याशी संबंधित सामग्री दाखवण्‍याची परवानगी देतात. आमचे ग्राहक आमच्या वेबसाइट्सशी कसे संवाद साधतात याचे विश्लेषण करण्यासाठी देखील आम्ही कुकीज वापरतो, जेणेकरून आम्ही ग्राहकांचा आमच्या सोबतचे नाते सुधारू शकू.

तुम्ही तुमच्या ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये कुकीज स्वीकारणे किंवा नाकारणे पर्याय निवडू शकता. बहुतेक वेब ब्राउझर आपोआप कुकीज स्वीकारतात, परंतु आपण प्राधान्य दिल्यास कुकीज नाकारण्यासाठी आपण सहसा आपल्या ब्राउझर सेटिंगमध्ये बदल करू शकता. तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये कुकीज व्यवस्थापित करण्याबद्दल अधिक मदत मिळू शकते, Chrome, Internet Explorer, Mozilla Firefox आणि Safari. आदि ब्राऊजर्स काही लिंक्स, सेवा किंवा फिचरच्या प्रवेशावर परिणाम करून तुमची माहिती अन्य वेबसाइटला घेण्यापासून प्रतिबंधित करू शकतात. कुकीज आणि वेब बीकन्सद्वारे गोळा केलेली माहिती वैयक्तिकरित्या ओळखता येत नाही.

आम्ही माहिती कशी वापरतो

  • a) तुम्ही विनंती करत असलेल्या सेवा प्रदान करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी ही माहिती वापरली जाते. यामध्ये, उदाहरणार्थ, तुमच्या सदस्यत्वावर (subscription) प्रक्रिया करणे, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्रे (newsletters) पाठवणे किंवा सेवांद्वारे प्रदान केलेल्या फिचरमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तयार करणे समाविष्ट आहे. यामध्ये ईमेलद्वारे तुम्हाला वैयक्तिकृत सामग्री आणि शिफारसी प्रदान करणे देखील समाविष्ट आहे. अशा वैशिष्ट्यांद्वारे, आम्ही तुमच्या वैयक्तिक आवडी आणि गरजांनुसार तयार केलेली माहिती आणि सामग्री तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास सक्षम आहोत.
  • b) तुमच्यापर्यंत पोपचण्यासाठी: तुमचे आमच्याकडे असणारे खाते, ऑनलाइन सर्वेक्षणे, कायदेशीर सूचना, बातम्या, तुम्हाला प्रवेशासाठी पात्र असलेली नवीन वैशिष्ट्ये आणि इतर महत्त्वाच्या माहितीसह सेवा आणि आमच्या संलग्न संस्थांबद्दलच्या ऑफर आणि माहितीसह आम्ही वेळोवेळी तुमच्याशी संपर्क साधू शकतो. त्या ईमेल संदेशांमध्ये असलेल्या सूचनांचे अनुसरण करून तुम्ही आमच्याकडून व्यावसायिक ईमेल संदेश प्राप्त करण्याची निवड रद्द करू शकता.
  • c) जाहिरातींसाठी - आम्‍ही तुमच्‍या माहितीचा वापर तुमच्‍या आणि जाहिरातदारांच्‍या वतीने, सेवांच्‍या आणि त्‍याबाहेर लक्ष्‍यित जाहिराती, जाहिराती आणि ऑफरच्‍या डिलिव्‍हरीसाठी करू शकतो.
  • d) आमचे वाचक आणि वापरकर्ते समजून घेण्यासाठी - आम्ही गोळा करत असलेल्या माहितीच्या आधारे वापरकर्त्यांची लोकसंख्या (demographics), स्वारस्ये आणि वर्तन यावर संशोधन केले जाते. आम्ही हे संशोधन आमच्या वापरकर्त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यांना सेवा पुरवण्यासाठी तसेच आमची उत्पादने आणि सेवा सुधारण्यासाठी करतो.
  • e) सेवा आणि इतरांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी- सेवा, त्यांचे कर्मचारी किंवा एजंट, इतर वापरकर्ते यांचे कायदेशीर अधिकार, गोपनीयता, सुरक्षितता किंवा मालमत्तेचे संरक्षण, अंमलबजावणी किंवा संरक्षण करण्यासाठी आणि लागू कायद्याचे पालन करण्यासाठी आम्ही तुमची वैयक्तिक माहिती वापरू शकतो.
  • f) संमती (Consent) - आम्ही तुमच्या संमतीने किंवा तुमच्या निर्देशानुसार तुमची माहिती वापरू शकतो.

आम्ही तुमची माहिती कशी शेअर करतो

खालील घटकांबद्दल माहिती प्रदान केली जाते. ज्यांच्याशी आम्ही माहिती सामायिक करू शकतो. आमच्या पद्धती माहितीच्या प्रकारानुसार बदलतात.

  • A) सोशल मीडिया सेवांद्वारे लॉग इन माध्यमाने -तुम्ही सोशल मीडिया सेवेसह आमच्या सेवांमध्ये लॉग इन केल्यास किंवा तुम्ही सेवांसोबत सोशल मीडिया खाते कनेक्ट केल्यास, आम्ही तुमची माहिती त्या सोशल मीडिया सेवेसोबत शेअर करू शकतो. सामायिक केलेल्या माहितीचा सोशल मीडिया सेवांचा वापर सोशल मीडिया सेवांच्या गोपनीयता धोरण आणि तुमच्या सोशल मीडिया खाते सेटिंग्जद्वारे नियंत्रित केला जाईल. तुम्हाला तुमची माहिती अशा प्रकारे शेअर करायची नसेल, तर तुमचे सोशल मीडिया सेवा खाते तुमच्या सेवांशी कनेक्ट करू नका.
  • b) व्यवसाय भागीदार : तुम्ही विनंती करत असलेल्या सेवा तुम्हाला पुरवण्यासाठी आम्ही तुमची माहिती व्यवसाय भागीदारांसह शेअर करू शकतो.
  • c) सेवा प्रदाता : आम्हाला कॉन्ट्रॅक्टच्‍या सेवा पुरवणार्‍या विक्रेत्‍यांसोबत आम्ही माहिती शेअर करू शकतो, जसे की होस्टिंग विक्रेते, जाहिरात सेवा प्रदाता आणि सूची व्‍यवस्‍थापक. सेवांसाठी तुमच्या पेमेंटवर प्रक्रिया करण्यासाठी किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या पेमेंट माहितीसह तुमची माहिती देखील शेअर करू शकतो.
  • d) आमच्या वापरकर्ते आणि सेवांचे संरक्षण करण्यासाठी कायद्यानुसार किंवा आवश्यक असल्यास इतर पक्ष: सेवा पुरवठादार,आमचे कर्मचारी किंवा एजंट किंवा वापरकर्ते यांचे कायदेशीर अधिकार, गोपनीयता, सुरक्षितता किंवा मालमत्तेचे संरक्षण, अंमलबजावणी किंवा संरक्षण करण्यासाठी किंवा लागू कायद्याचे किंवा कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यासाठी आम्ही तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू शकतो. सार्वजनिक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या विनंत्यांना प्रतिसाद म्हणून ही माहिती शेअर केली जाते.
  • e) संलग्न संस्था : आम्ही आमच्या संलग्न कंपन्या आणि कंपनी समुहाबरोबर ही माहिती सामायिक (शेअर) करू शकतो.
  • f) सामग्री, जाहिरात किंवा कार्यक्षमता प्रदान करणारे तृतीय पक्ष : तुम्ही आमच्या सेवा वापरता तेव्हा, तृतीय पक्ष तुमच्याबद्दल /किंवा तुमच्या सेवांच्या वापराबद्दल काही माहिती गोळा करू शकतात किंवा प्राप्त करू शकतात (उदा., हॅश केलेला डेटा, क्लिक स्ट्रीम माहिती, ब्राउझर प्रकार, वेळ आणि तारीख, जाहिराती आणि इतर सामग्रीसह तुमच्या परस्परसंवादाची माहिती.), आमच्या सेवा किंवा इतर वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मवर सामग्री, जाहिरात किंवा कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी किंवा जाहिरात कार्यप्रदर्शन मोजण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी कुकीज, बीकन्स, मोबाइल जाहिरात अभिज्ञापक आणि तत्सम तंत्रज्ञानाच्या वापरासह. ही माहिती विविध वेबसाइट, ऑनलाइन सेवा आणि इतर लिंक केलेल्या किंवा संबंधित उपकरणांवर गोळा केलेल्या माहितीसह एकत्रित केली जाऊ शकते. हे तृतीय पक्ष आपली माहिती त्यांच्या स्वतःच्या सेवा सुधारण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या गोपनीयता धोरणांशी सुसंगत करण्यासाठी वापरू शकतात.
  • g) कॉर्पोरेट व्यवहाराशी संबंध असलेले इतर पक्ष : आम्ही आमच्या व्यवसायाची किंवा मालमत्तेचा सर्व किंवा काही भाग एखाद्या तृतीय पक्षाला विकतो किंवा हस्तांतरित करतो, जसे की विलीनीकरण, संपादन किंवा दिवाळखोरी पुनर्रचना प्रकारात एखाद्याच्या संबंधात तुमच्याबद्दल आमच्याकडे असलेली कोणतीही माहिती हस्तांतरित करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
  • h) तुमच्या संमतीने किंवा तुमच्या निर्देशानुसार : कंपनीच्या गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केलेल्या शेअरिंग व्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही अशा शेअरिंगला संमती देता किंवा निर्देशित करता तेव्हा आम्ही तुमच्याबद्दलची माहिती तृतीय पक्षांसोबत शेअर करू शकतो.
  • i) आम्ही विशिष्ट वापरकर्त्यांना ओळखत नाही अशा पद्धतीने तृतीय पक्षांसोबत इतर माहिती सामायिक करू शकतो, उदाहरणार्थ, वापरकर्ते आमच्या सेवा कशा वापरत आहेत याबद्दल एकत्रित डेटासह.
  • j) तृतीय-पक्ष साइट्सच्या लिंक्स : आमच्या सेवा आमच्या नियंत्रणाबाहेरील तृतीय-पक्ष वेबसाइट आणि सेवांशी लिंक करू शकता. आम्ही इतर वेबसाइट किंवा इतर सेवांद्वारे संकलित केलेल्या कोणत्याही माहितीच्या सुरक्षिततेसाठी किंवा गोपनीयतेसाठी जबाबदार नाही. तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तुम्ही वापरत असलेल्या तृतीय-पक्ष वेबसाइट आणि सेवांना लागू होणार्‍या गोपनीयता विधानांचे पुनरावलोकन केले पाहिजे.

वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश:

वेबसाइटवर साइन इन करून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती ऍक्सेस करू शकता किंवा सुधारू शकता. आम्ही तुमच्याद्वारे प्रदान केलेल्या माहितीमध्ये बदल करणार नाही. तथापि, अशा बदलांची आवश्यकता होताच तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. तुमच्या विनंतीनुसार, आम्ही तुमचे खाते बंद करू आणि तुमची वैयक्तिक माहिती शक्य तितक्या लवकर, तुमच्या खात्यातील क्रियाकलापांवर आधारित आणि लागू कायद्यानुसार काढून टाकू. तथापि, कायद्याचे पालन करण्यासाठी, बेकायदेशीर आणि/किंवा संभाव्य प्रतिबंधित क्रियाकलाप टाळण्यासाठी/तपासण्यासाठी आणि वापरकर्ता करारांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही बंद खात्यांमधून आवश्यक वैयक्तिक माहिती राखून ठेवू; कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचे पालन / हुकूम / आदेश / निर्देश / कायदेशीर आणि सरकारी प्राधिकरण / लागू कायद्याचे; संभाव्य उल्लंघनांची किंवा लागू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची चौकशी ; वेबसाइट/सेवांना किंवा तिच्या कायदेशीर ऑपरेशनला जाणीवपूर्वक झालेल्या नुकसानीची चौकशी; सुरक्षा आणि/किंवा तांत्रिक समस्या शोधणे, प्रतिबंध करणे किंवा अन्यथा संबोधित करणे; कंपनी आणि/किंवा तिचे संचालक, कर्मचारी आणि सामान्य जनतेचे हक्क, मालमत्ता किंवा सुरक्षितता यांचे रक्षण करणे;
तृतीय पक्षांच्या दाव्यांना प्रतिसाद; आणि कायद्याने परवानगी असेल अशा इतर कृतींसाठी ही माहिती वापरली जाईल.

तुम्ही निवड रद्द करू इच्छित असाल

आमच्याकडे तुमची संपर्क माहिती असल्यास, आम्ही तुम्हाला आमची उत्पादने, सेवा आणि कार्यक्रमांबद्दल ईमेलद्वारे पोस्ट करू इच्छितो. तुम्ही कंपनीशी संबंधित बातम्या आणि सेवांवरील ताज्या माहितीसह अद्ययावत राहण्यास प्राधान्य देत नसाल आणि अशी विपणन सामग्री प्राप्त करू इच्छित नसाल तर, कृपया तुम्हाला मिळालेल्या संप्रेषणातील सदस्यत्व रद्द करण्याच्या लिंकवर क्लिक करा. पुढे, वापरकर्ता कंपनीला दिलेली संमती मागे घेऊ शकतो. वेबसाइटच्या संपर्क सेक्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर आम्हाला लिखित स्वरुपात संप्रेषण करू शकता. तथापि, माहिती रोखणे किंवा माहिती वापरण्याची संमती काढून घेणे यामुळे कंपनी सेवा आणि सुविधा प्रदान करू शकत नाही.

वाजवी व्यवहार्य म्हणून आम्ही तुमची प्राधान्ये अद्यतनित करू. तथापि, लक्षात ठेवा की, येथे वर्णन केल्याप्रमाणे, तुम्ही ईमेल करणार्‍या कंपन्यांच्या सूचीमधून बाहेर पडल्यास, आम्ही तुमची वैयक्तिक माहिती ज्यांच्याशी आम्ही आधीच सामायिक केली आहे, त्या सहयोगी, फ्रँचायझी किंवा व्यावसायिक भागीदारांच्या डेटाबेसमधून आम्ही तुमच्या निवड रद्द करण्याच्या विनंतीच्या तारखेपर्यंत तुमची वैयक्तिक माहिती काढू शकणार नाही.

आमच्याशी संपर्क करा:

आमच्या सेवा किंवा वेबसाइटवरील सामग्रीशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, सदर व्यक्ती प्रथम प्रकाशनाच्या तारखेपासून 7 (सात) दिवसांच्या आत येथे नमूद केलेल्या ईमेल आयडीवर क्वेरी/तक्रार मांडू शकते -

Email: privacymanager@hindustantimes.com

HT Digital Streams Ltd.

Corporate Office: 2nd Floor 18-20 KG Marg

New Delhi-110001

Phone: + 91 11 66561123

Grievance Officer: Mr. Prasad Sanyal

Contact: 011-66561579 (landline - to be used during office hours i.e. 9am to 5pm on all working days i.e. Monday to Friday)

Email: grievance@htdigital.in