SRH vs LSG : हैदराबादने अवघ्या ५८ चेंडूत गाठलं १६६ धावांचे लक्ष्य, ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फलंदाजी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs LSG : हैदराबादने अवघ्या ५८ चेंडूत गाठलं १६६ धावांचे लक्ष्य, ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फलंदाजी

SRH vs LSG : हैदराबादने अवघ्या ५८ चेंडूत गाठलं १६६ धावांचे लक्ष्य, ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फलंदाजी

May 08, 2024 10:35 PM IST

SRH vs LSG Highlights : सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा अत्यंत वाईटरितीने पराभव केला आहे. हैदराबादच्या फलंदाजांनी केवळ ५८ चेंडूत १६६ धावांचे लक्ष्य पार केले.

SRH vs LSG : हैदराबादने अवघ्या ५८ चेंडूत गाठलं १६६ धावांचे लक्ष्य, ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फलंदाजी
SRH vs LSG : हैदराबादने अवघ्या ५८ चेंडूत गाठलं १६६ धावांचे लक्ष्य, ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फलंदाजी (AP)

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Scorecard : आयपीएल २०२४ च्या ५७ व्या सामन्यात (८ मे) सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा १० गडी राखून पराभव केला आहे. 

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लखनौने प्रथम खेळताना १६५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात हे लक्ष्य गाठण्यासाठी हैदराबादच्या फलंदाजांनी १० षटकेही घेतली नाहीत. 

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात ९.४ षटकात १६७ धावांची भागीदारी झाली. ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूंत ८९ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने ८ चौकार आणि ८ षटकार मारले.

तर दुसरीकडे, अभिषेक शर्माने अवघ्या २८ चेंडूत ७५ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. या दोघांनी पहिल्याच षटकापासून स्फोटक पद्धतीने षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात केली. हैदराबादने हा सामना ६२ चेंडू राखून आणि १० विकेट्स राखून जिंकल्यामुळे, लखनौच्या नेट रनेरटवर खूप वाईट परिणाम झाला आहे.

१६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चौथ्याच षटकातच ५० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर त्यांनी पॉवरप्ले षटक संपेपर्यंत म्हणजेच ६ षटकात १०७ धावा केल्या होत्या. 

एकीकडे ट्रॅव्हिस हेडने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर अभिषेक शर्माने १९ चेंडू खेळून अर्धशतक पूर्ण केले. हेड आणि अभिषेकने लखनौच्या गोलंदाजांना खूप धुतले. हैदराबादच्या डावातील १० षटकेही टाकली गेली नाहीत. यापैकी ७ षटके अशी होती ज्यात १५ किंवा त्याहून अधिक धावा झाल्या.

हैदराबादचा डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत ४ गडी गमावून १६५ धावा केल्या. एकवेळ लखनौने १२व्या षटकात ६६ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर आयुष बडोनी आणि निकोलस पुरन यांनी ५२ चेंडूत ९९ धावांची नाबाद भागीदारी केली.

बडोनीने ३० चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. त्याचवेळी पुरणने २६ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४८ धावांची नाबाद खेळी केली.

केएल राहुल ३३ चेंडूत २९ धावा करून बाद झाला, क्विंटन डी कॉक दोन धावा करून बाद झाला आणि मार्कस स्टॉइनिस ३ धावा करून बाद झाला. तर कृणाल पांड्याने २१ चेंडूत २४ धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले. त्याचवेळी कर्णधार पॅट कमिन्सला एक विकेट मिळाली.

Whats_app_banner