इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या (IPL 2024 ) शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना (१९ मे) सांयकाळी ७:३० गुवाहाटी बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
या हंगामात राजस्थान आणि केकेआर संघांकडून उत्कृष्ट कामगिरी दिसून आली, ज्यामध्ये केकेआरला साखळी फेरीनंतर गुणतालिकेत पहिले स्थान निश्चित आहे, तर राजस्थान संघाला सामना जिंकून दुसरे स्थान मिळवावे लागेल.
अशा स्थितीत, राजस्थान असो की केकेआर, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील या सामन्याच्या ड्रीम इलेव्हन संघात, तुम्ही संजू सॅमसनची यष्टिरक्षक म्हणून निवड करू शकता, त्याची ची बॅट या हंगामात आतापर्यंत चांगलीच बोलते आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामात संजूच्या बॅटमधून एकूण ५०४ धावा झाल्या आहेत. यानंतर, तुम्ही प्रमुख फलंदाज म्हणून व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांची निवड करू शकता.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये सुनील नारायण, आंद्रे रसेल आणि रायन परागची निवड करू शकता, तर नारायण आणि पराग यांनी फलंदाजीसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर गोलंदाजांमध्ये तुम्ही वरुण चक्रवर्ती, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांची निवड करू शकता.
या सामन्यासाठी तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात तुम्ही संजू सॅमसनला कर्णधार म्हणून निवडू शकता. अशा परिस्थितीत या मोसमात ५०० हून अधिक धावा करणारा संजू या सामन्यात आपल्या संघासाठी मोठी खेळी खेळताना दिसू शकतो. तुम्ही उपकर्णधार म्हणून आंद्रे रसेलची निवड करू शकता, तो अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्हाला अधिक गुण मिळू शकतात.
यष्टिरक्षक - संजू सॅमसन (कर्णधार).
फलंदाज - व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
अष्टपैलू - सुनील नरेन, आंद्रे रसेल (उपकर्णधार), रियान पराग.
गोलंदाज - वरुण चक्रवर्ती, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट.
संबंधित बातम्या