RCB VS CSK : विराट-अनुष्का रडले… आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचताच दोघांनीही अश्रू ढाळले, भावनिक क्षण व्हायरल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB VS CSK : विराट-अनुष्का रडले… आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचताच दोघांनीही अश्रू ढाळले, भावनिक क्षण व्हायरल

RCB VS CSK : विराट-अनुष्का रडले… आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचताच दोघांनीही अश्रू ढाळले, भावनिक क्षण व्हायरल

May 19, 2024 10:57 AM IST

Virat Kohli and Anushka Sharma Emotional : आरसीबीच्या विजयानंतर, आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये प्रथम विराट कोहलीचा आक्रमकपणा आणि नंतर त्याचा भावनिक क्षण पाहायला मिळाला

विराट-अनुष्का रडले… आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचताच दोघांनीही अश्रू ढाळले, भावनिक क्षण व्हायरल
विराट-अनुष्का रडले… आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचताच दोघांनीही अश्रू ढाळले, भावनिक क्षण व्हायरल

RCB VS CSK HIGHLIGHTS : आयपीएल २०२४ च्या ६८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरले. बेंगळुरूच्या या विजयानंतर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना आपल्या भावनांवर (Virat Kohli And Anushka Sharma Emotions) नियंत्रण ठेवता आले नाही आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू तरळले.

आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. पहिल्या आठ सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदवणाऱ्या आरसीबीने सलग ६ सामने जिंकून टॉप-४ मध्ये स्थान मिळवले आहे.

दरम्यान, आता कोहली आणि अनुष्काचा हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरसीबीच्या विजयानंतर, आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये प्रथम विराट कोहलीचा आक्रमकपणा आणि नंतर त्याचा भावनिक क्षण पाहायला मिळाला. कोहलीने आपली कॅप काढून विजय साजरा केला आणि या वेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

याआधी अनुष्का शर्माला स्टँडवर बसलेली दाखवण्यात आली आणि तिलाही विजयाच्या आनंदात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. अनुष्काने आपले दोन्ही हात हवेत उंचावून विजय साजरा केला. यावेळी ती खूपच भावूक दिसत होती.

आरसीबी- सीएसके सामन्यात काय घडलं?

चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बेंगळुरू संघाने २० षटकांत ५ बाद २१८ धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ३९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या.

याशिवाय इतर खेळाडूंनीही शानदार फलंदाजी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यामध्ये किंग कोहलीच्या ४७ धावांचा समावेश होता. कोहलीने २९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली होती.

यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईचा संघ २० षटकांत केवळ १९१ धावांपर्यंत मजल मारू शकला. बेंगळुरू २७ धावांनी जिंकला. मात्र, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला किमान १८ धावांनी विजय मिळवायचा होता, पण बेंगळुरूच्या गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे संघाने २७ धावांनी विजय मिळवला.

Whats_app_banner