हिंदू कॅलेंडर 2024

इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना असतो. या महिन्यापासून इंग्रजी नववर्षाची सुरुवात होते. मात्र, हिंदू कॅलेंडरनुसार वर्षाची सुरुवात चित्र महिन्यापासून होते. चैत्र महिन्याच्या पाठोपाठ वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे महिने येतात. चैत्र महिन्यात चैत्र नवरात्री, रामनवमी आणि हनुमान जयंती हे प्रमुख हिंदू सण येतात. शास्त्रानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती सुरू केली, असं मानलं जातं.

हिंदू कॅलेंडरमधील दुसरा महिना, म्हणजेच वैशाख महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. गरुड पुराणातही वैशाख महिन्याचा उल्लेख आहे. कोणताही महिना वैशाख महिन्याची बरोबरी करू शकत नाही, असं म्हटलं जातं. तिसरा महिना ज्येष्ठाचा असतो. हा महिना अतिशय उष्ण असतो. त्यामुळं या महिन्यात पाण्याचं दान करणं महत्त्वाचं समजलं जातं. गंगादशहरा, दसरा, सावित्री व्रत आणि निर्जला एकादशी यासारखी महत्त्वाची व्रतवैकल्य आणि सण याच महिन्यात येतात. योगिनी एकादशी, जगन्नाथाची रथयात्रा आणि देवशयनी एकादशी देखील याच महिन्यात असते. चौथा महिना आषाढ आहे. साधारणपणे आषाढ महिन्यापासून पाऊस सुरू होतो. निर्सग रूप बदलायला लागतो. झाडांना पालवी फुटते. त्यानंतर श्रावण महिना आहे. या महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल सुरू होते. व्रतवैकल्ये केली जातात. त्यानंतरच्या भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव हा मोठा सण असतो. नंतर पितृपक्ष असतो. या महिन्यात श्राद्धादी कार्यक्रम होता. सातवा महिना अश्विन आहे. या महिन्यात नवरात्र आणि दसरा हा सण असतो. अश्विन महिन्याच्या शेवटीच दिवाळीची चाहूल लागते. आठव्या कार्तिक महिन्यात दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण साजरा होतो. अधिक मास आल्यास यातील तिथीमध्ये काही प्रमाणात बदल होतो. नववा महिना मार्गशीर्ष आहे. या महिन्यात लक्ष्मी व्रत केलं जातं. त्यानंतर पौष महिन्यात मकर संक्रांत साजरी होते. शेवटचे दोन महिने माघ व फाल्गुन हे आहेत. यातील माघ महिन्यात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. शेवटच्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो.

January 2024

February 2024

March 2024

April 2024

May 2024

June 2024

July 2024

August 2024

September 2024

October 2023

November 2024

December 2024


पंचांग म्हणजे पाच अंगे. पाच अंगांनी मिळून बनलेलं म्हणून पंचांग. संपूर्ण दिनदर्शिका तिथी, नक्षत्र, योग, करण आणि वार ​​या पाच भागांपासून बनते. हिंदू कॅलेंडरनुसार सौर वर्षात एकूण १२ महिने असतात. प्रत्येक महिन्याला दोन बाजू असतात, शुक्ल पक्षातील पहिले १५ दिवस आणि कृष्ण पक्षाचे दुसरे १५ दिवस. पहिल्या १५ दिवसांनी अमावस्या येते आणि पौर्णिमा पुढील १५ दिवसांनी म्हणजेच महिन्याच्या शेवटी येते. हिंदू पंचांगात प्रत्येक महिन्याचं विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेनंतर अमावस्या सुरू होते. प्रथम प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी आहेत. चतुर्दशी ही तिथी अमावस्या आणि पौर्णिमेनंतर येते.

FAQs

प्रश्नः हिंदू कॅलेंडरमध्ये किती महिने असतात?

उत्तर:हिंदू कॅलेंडरनुसार वर्षात १२ महिने असतात. चैत्र हा वर्षाचा पहिला तर फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना असतो.

प्रश्न: हिंदू कॅलेंडरमध्ये महिन्यांची नावे काय आहेत?

उत्तर: हिंदी कॅलेंडरनुसार सर्व महिन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - चैत्र वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन

प्रश्न : पुरुषोत्तमा मास म्हणजे काय?

उत्तर: हिंदू पंचांगानुसार, दर तीन वर्षांनी एकदा एक अतिरिक्त महिना असतो, ज्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणतात.

प्रश्न: वर्षभरात किती एकादशी येतात?

उत्तर: हिंदू पंचांगानुसार, साधारणपणे एका वर्षात २४ एकादशी असतात, परंतु जेव्हा लीप महिना असतो, तेव्हा दोन अतिरिक्त एकादशी जोडल्या जातात, त्यामुळं २६ एकादशी होतात.