मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs KKR Dream 11 Prediction : आज मुंबई-कोलकाता भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

MI vs KKR Dream 11 Prediction : आज मुंबई-कोलकाता भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 03, 2024 02:08 PM IST

mi vs kkr dream 11 prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई आणि कोलकाता आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

MI vs KKR Dream 11 Prediction : आज मुंबई-कोलकाता भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
MI vs KKR Dream 11 Prediction : आज मुंबई-कोलकाता भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

आयपीएल  २०२४ चा ५१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

यंदा दोन्ही संघांसाठी आयपीएलचा प्रवास खूपच वेगळा राहिला आहे. एकीकडे मुंबई इंडियन्स संघ या हंगामात गुणतालिकेत तळाशी आहे, तर KKR संघ अव्वल संघांमध्ये आहे. वानखेडे स्टेडियमवर केकेआरविरुद्ध मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगलीच झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामन्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

हार्दिक पंड्याच्या मुंबईचा त्यांच्या याधीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव झाला होता. मुंबईचे १० सामन्यांत ७ पराभव झाले आहेत. तर दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या याआधीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. श्रेयस अय्यरचा संघ ९ सामन्यांत ६ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, मुंबई असो की कोलकाता, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

MI vs KKR Dream 11 Prediction

यष्टिरक्षक: फिल सॉल्ट

फलंदाज: सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर

अष्टपैलू: सुनील नरेन (कर्णधार), आंद्रे रसेल, हार्दिक पांड्या

गोलंदाज: वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), जेराल्ड कोएत्झी

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

कोलकाता नाइट रायडर्स: फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती.

IPL_Entry_Point