On This Day: आजच्या दिवशी रैनाने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय-on this day in 2010 when suresh raina became first indian to smash century in t20is ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  On This Day: आजच्या दिवशी रैनाने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

On This Day: आजच्या दिवशी रैनाने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 02, 2024 09:22 PM IST

Suresh Raina On This Day In 2010: सुरेश रैनाने आजच्या दिवशी २०१० मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

सुरेश रैनाने आजच्या दिवशी टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
सुरेश रैनाने आजच्या दिवशी टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

On This Day In 2010: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) हा वेगवान फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जात असे. रैना हा भारतीय संघातील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू होता. मात्र, आता तो आयपीएलमध्ये (IPL) कॉमेंट्री करताना दिसतो. रैनाने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, आजच्या दिवशी २०१० मध्ये रैनाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.
 

T20 WC 2024 : विराटचा स्ट्राईक रेट, हार्दिकच्या कॅप्टन्सीत खेळण्याचा अनुभव, रोहित शर्मानं सर्व दिली प्रश्नांची उत्तरं

रैनाने २०१० च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजच्या दिवशी शतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रैनाने ६० चेंडूत १०१ धावांची खेळी केली. ज्यात त्याने नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. रैनाच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत पाच विकेट्स गमावून १८६ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना रैनाने हे शतक झळकावले होते. त्यावेळी सुरेश रैनाच्या फलंदाजीचे क्रिडाविश्वात चर्चा झाली होती.

IPL 2024 : मुस्तफिजुर, पाथीराना-थीक्षणा मायदेशी परतले, CSK कडे गोलंदाजच राहिले नाही, प्लेइंग इलेव्हन कशी बनवणार?

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत पाच विकेट्स गमावून १७२ धावाच करू शकला. संघासाठी सलामी देणाऱ्या जॅक कॅलिसने ५४ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांसह सर्वाधिक ७३ धावा केल्या. जॅक कॅलिस व्यतिरिक्त आफ्रिकेचे उर्वरित फलंदाज जवळपास फ्लॉप ठरले, जे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.

सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. कसोटीच्या ३१ डावांत त्याने २६.४८ सरासरीने ७६८ धावा केल्या. ज्यात अर्धशतक आणि सात अर्धशतक झळकावली. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९४ डावांत ५ शतक आणि ३६ अर्धशतकांच्या मदतीने ५ हजार ६१५ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० च्या ६६ डावांमध्ये २९.१८ आणि १३४.८७ च्या स्ट्राइक रेटने १ हजार ६०५ धावा केल्या, ज्यात एक शतक ५ अर्धशतक झळकावली.

Whats_app_banner
विभाग