RCB vs CSK: बंगळुरू- चेन्नई सामन्याचे तिकिट बुक करायला गेला अन् ३ लाख गमावले, सायबर गुन्हेगारापासून सावधान!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs CSK: बंगळुरू- चेन्नई सामन्याचे तिकिट बुक करायला गेला अन् ३ लाख गमावले, सायबर गुन्हेगारापासून सावधान!

RCB vs CSK: बंगळुरू- चेन्नई सामन्याचे तिकिट बुक करायला गेला अन् ३ लाख गमावले, सायबर गुन्हेगारापासून सावधान!

May 16, 2024 10:09 PM IST

RCB vs CSK Ticket Fraud News: सीएसके विरुद्ध आरसीबी निर्णायक सामन्याची मागणी गगनाला भिडल्याने सायबर गुन्हेगार क्रिकेट चाहत्यांना लक्ष्य करत आहेत.

आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान सायबर गुन्हेगार क्रिकेट चाहत्यांची फसवणूक करीत आहेत.
आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान सायबर गुन्हेगार क्रिकेट चाहत्यांची फसवणूक करीत आहेत. (Unsplash/Towfiqu barbhuiya)

Cyber Crime: चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणाऱ्या आगामी आयपीएल सामन्याचे तिकीट खरेदी करण्याच्या प्रयत्नात बेंगळुरूच्या एका २८ वर्षीय तरुणाला तीन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या निर्णायक सामन्याची मागणी गगनाला भिडल्याने सायबर गुन्हेगारांकडून क्रिकेट चाहत्यांची फसवणूक केली जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित तरुणाला ipl_2024_tickets_24 इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट दिसली, जिथे त्याला बंगळुरू आणि चेन्नई यांच्यातील सामन्यांच्या उपलब्धतेबद्दल सांगण्यात आले. हँडलवरील व्यक्तीने स्वत:ची ओळख पद्मा सिन्हा विजय कुमार अशी करून दिली. आयपीएलची तिकिटे विकणारी अधिकृत व्यक्ती असल्याचा दावा केला. त्याने आपले आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक पडताळणीसाठी पाठविला आणि प्रत्येक तिकिटासाठी २,३०० रुपये नमूद केले.

यानंतर तरुणाने तीन तिकिटांचे पैसे पाठवले. मात्र, त्याला तिकीट मिळाले नाही. यानंतर तरुणाने समोरच्या व्यक्तीला तिकीटाबाबत विचारला केली. त्यावेळी त्याने तांत्रिक बिघाड असल्याचे सांगून आणखी ६७ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. यानंतर तरुणाने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणाच्या खात्यातून ३ लाख रुपये गायब झाल्याचे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

क्रिकेट चाहत्यांना सावध राहण्याचा इशारा

बेंगळुरू पोलिसांनी आयपीसी कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी क्रिकेट चाहत्यांना सतर्क केले आणि अधिकृत तिकीट विक्री भागीदारांमार्फत ऑनलाइन तिकीट खरेदी करण्यास सांगितले.

चेन्नई बंगळुरू यांच्यात महत्त्वाचा सामना

चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचा निकाल प्लेऑफचे चित्र स्पष्ट करणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. मात्र, उर्वरीत दोन जागांसाठी चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात शर्यत लागली आहे.

चेन्नई- बंगळुरू यांच्यातील सामना कधी आणि कुठे पाहायचा?

चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात १८ मे २०२३ रोजी सामना खेळला जाणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामना १८ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग