मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs GT Live Streaming: आज गुजरातचा संघ हैदराबादशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

SRH vs GT Live Streaming: आज गुजरातचा संघ हैदराबादशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 16, 2024 11:01 AM IST

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Streaming: आयपीएल २०२४ च्या ६६व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स एकमेकांशी भिडणार आहेत.

आयपीएल २०२४: सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स आज आमनेसामने येणार आहेत.
आयपीएल २०२४: सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स आज आमनेसामने येणार आहेत. (AP)

IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आज आयपीएलमधील ६६वा सामना खेळला जाणार आहे.सर्वात धोकादायक संघांपैकी एक असलेला सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. हैदराबादने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यातील सात सामने जिंकले असून १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. एक सामना जिंकल्यास संघाचे १६ गुण होतील आणि चेन्नई वगळता इतर संघ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ दोन्ही सामने जिंकून अव्वल दोनमध्ये स्थान पक्के करण्याकडे लक्ष देत आहे. दुसरीकडे, युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. गुजरातला १३ सामन्यापैकी फक्त पाच सामने जिंकता आले आहेत. गुजरात ११ गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कधी, कुठे पाहायचा सामना?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आज (१६ मे २०२४) आयपीएलमधील ६६वा सामना खेळला जाईल. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकतात.

गुजरात टायटन्सचा संघ:

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी, संदीप वॉरियर, अभिनव मनोहर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, जयंत यादव, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, विजय शंकर, जोशुआ लिटल, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, मानव सुथार, सुशांत मिश्रा.

सनरायझर्स हैदराबाद संघ:

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, उमरान मलिक, मयंक अग्रवाल, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटवेद सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जॉन्सन, आकाश महाराज सिंह.

IPL_Entry_Point