IPL 2024: आयपीएल २०२४ मधील साखळी सामने शेवटच्या टप्प्यात असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. यापूर्वी संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी आनंदाची बातमी आहे. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज ध्रुव जुरेल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. प्लेऑफपूर्वी ध्रुव जुरेलचा फिटनेस ही राजस्थान रॉयल्ससाठी दिलासादायक बातमी आहे. राजस्थान रॉयल्सला सलग ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ध्रुव जुरेलला दुखापत झाली होती. यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ध्रुव जुरेलला राजस्थानच्या प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. यानंतर चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवले. ध्रुव जुरेल हा पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असला तरी त्याच्या फिटनेसवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता ध्रुव जुरेल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला. याआधी कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. राजस्थान रॉयल्सचे १३ सामन्यांत १६ गुण आहेत. राजस्थानचा संघ त्यांचा शेवटचा सामना १९ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सचे १३ सामन्यांत १९ गुण आहेत. आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित २ संघ अद्याप ठरलेले नसले तरी, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्ससह यांच्यात प्लेऑफसाठी शर्यत आहे.
यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोव्हमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहलबेंच तनुष कोटियन, केशव महाराज, नांद्रे बर्गर, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, शिमरॉन हेटमायर, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, कुणाल सिंग राठौर, नवदीप सैनी.