इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ६४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने लखनौचा १९ धावांनी धुव्वा उडवला.
लखनौने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ ९ बाद १८९ धावाच करू शकला.
या विजयासह दिल्लीचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्याचवेळी दिल्लीच्या विजयाचा फायदा राजस्थान रॉयल्सला झाला. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्यांचे १६ गुण आहेत.
दिल्लीने ग्रुप स्टेजमधील सर्व १४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ७ जिंकले आहेत. दिल्ली संघ आता १४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्याला सनरायझर्स हैदराबाद (SRH), चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि लखनौ संघाच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.
मात्र, हे सर्व असूनही दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण दिसत आहे. कारण त्यांचा खराब नेट रनरेट. दुसरीकडे लखनौ संघाचा शेवटचा सामना अजून बाकी आहे. आतापर्यंत त्यांनी १३ पैकी ६ सामने जिंकले असून त्यांचे १२ गुण आहेत. लखनौ ७ व्या क्रमांकावर आहे.
दिल्लीविरुद्धच्या या पराभवाने लखनौ संघाचे गणितही पूर्णपणे बिघडले आहे. यामुळेच शेवटचा सामना जिंकूनही लखनौ संघाला प्लेऑफमध्ये जाणे खराब नेट रनरेटमुळे कठीण झाले आहे.
तत्पूर्वी, तत्पूर्वी, २०९ धावांचा पाठलाग करताना लखनौकडून निकोलस पुरनने ६१ धावांची खेळी केली. अर्शद खानने नाबाद ५८ धावा केल्या. ३३ चेंडूंचा सामना करताना त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. तर लखनौचे इतर फलंदाज सुपर फ्लॉप ठरले.
दिल्लीकडून अभिषेक पोरेलने अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत ५८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ५७ धावा केल्या. त्याने २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार ठोकले.
अक्षर पटेल १४ धावा करून नाबाद राहिला. शाई होपने ३८ धावा केल्या. ऋषभ पंतने ३३ धावांची खेळी केली. अशा प्रकारे दिल्लीने २०८ धावा केल्या.
लखनौकडून नवीनने २ बळी घेतले. अर्शद आणि रवी बिश्नोई यांनी १-१ विकेट घेतली.