Term of Use - https://marathi.hindustantimes.com

वापराच्या अटी

HT Digital Streams Limited तुमचे hindustantimes.com वर स्वागत करते. साइटच्या वापरासाठी आमच्या काही अटी व शर्ती आहेत, ज्यात तुम्ही वर्ल्ड वाइड वेब, PDA, मोबाइल फोन, डिजिटल टेलिव्हिजन आणि RSS फीडसह अनेक मार्गांनी प्रवेश करू शकता. जेव्हा तुम्ही आमच्या साईटवर कोणत्याही डिव्हाइसच्या माध्यमातून प्रवेश करता त्यावेळी या अटी आणि शर्ती लागू होतात.

साइटचा वाचक किंवा नोंदणीकृत वापरकर्ता म्हणून तुम्ही आमच्या माहितीचा वापर करता त्यावेळी, तुम्ही या अटी व शर्ती स्वीकारल्या आहेत असे मानले जाते. तुम्ही वापरकर्ता म्हणून नोंदणीकृत असल्यास, कृपया गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचा.

आम्ही अटी आणि शर्तींमध्ये केलेले कोणतेही बदल या पेजवर दिसून येतील.या साइटवर (hindustantimes.com) प्रवेश आणि वापर खालील अटींच्या अधीन राहून एचटी डिजिटल स्ट्रीम्स लिमिटेडद्वारे प्रदान केला जातो:

  1. जेव्हा तुम्ही hindustantimes.com वापरता त्यावेळी तुम्ही या अटींशी कायदेशीररित्या बांधील असण्यास सहमती देता, जी तुमच्या hindustantimes.com च्या पहिल्या वापरापासून तात्काळ प्रभावाने लागू होईल. तुम्ही खालील सर्व अटींना कायदेशीररित्या बांधील असण्यास सहमत नसाल तर कृपया hindustantimes.com वर प्रवेश करू नका आणि/किंवा या साईटचा वापर करू नका.
  2. एचटी डिजिटल स्ट्रीम्स लिमिटेड ऑनलाइन पोस्ट करून या अटी कधीही बदलू शकते. HT Digital Streams Limited ने केलेल्या कोणत्याही बदलांची तुम्हाला जाणीव आहे याची खात्री करण्यासाठी कृपया या अटींचे नियमितपणे पुनरावलोकन करा. या धोरणातील बदल पोस्ट केल्यानंतर तुम्ही hindustantimes.com चा सतत वापर करत आहात याचा अर्थ तुम्ही या अटींना अद्ययावत आणि/किंवा सुधारित केल्यानुसार कायदेशीररित्या बांधील असण्यास सहमत आहात.असे मानण्यात येईल.
  3. तुम्ही तुमच्या वैयक्तिक, गैर-व्यावसायिक वापराशिवाय कोणत्याही प्रकारे hindustantimes.com hindustantimes.com सामग्रीची कॉपी, पुनरुत्पादन, पुनर्प्रकाशन, डाउनलोड, पोस्ट, प्रसारण, प्रसारित करून ही माहिती लोकांना व सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या वैयक्तिक, गैर-व्यावसायिक वापराशिवाय कोणत्याही hindustantimes.comसामग्रीचे रुपांतर, बदल किंवा प्रसार न करण्याचे देखील मान्य करता. hindustantimes.com सामग्रीच्या इतर कोणत्याही वापरासाठी HT Digital Streams Limited ची पूर्व लेखी परवानगी आवश्यक आहे.
  4. तुम्ही hindustantimes.com फक्त कायदेशीर हेतूंसाठी वापरण्यास सहमत किंवा बांधिल आहात आणि अशा प्रकारे जे hindustantimes.com च्या अधिकारांचे उल्लंघन, प्रतिबंधित करणार नाही. प्रतिबंधित वर्तनामध्ये कोणत्याही व्यक्तीला त्रास देणे किंवा अडचण निर्माण करणे किंवा गैरसोय करणे, अश्लील किंवा आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करणे किंवा hindustantimes.com मधील संवादाच्या सामान्य प्रवाहात व्यत्यय आणणे आदि बाबी समाविष्ट आहेत.

DISCLAIMER OF LIABILITY (दायित्व अस्वीकरण)

HT Digital Streams Limited प्रकाशित सामग्रीमधील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. प्रथम तज्ज्ञांचा व्यावसायिक सल्ला न घेता आम्ही hindustantimes.comhindustantimes.com वर प्रकाशित केलेल्या कोणत्याही विधानावर तुम्ही विसंबून राहू नये. कोणत्याही विशिष्ट हेतूसाठी किंवा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विनंतीनुसार माहिती व प्रकाशित सामग्री प्रदान केलेली नाही.
आम्‍ही hindustantimes.com वर प्रकाशित - माहिती, नावे, प्रतिमा, चित्रे, लोगो आणि आयकॉनसाठी कोणत्याही प्रकारची हमी देत नाही. त्याचबरोबर प्रकाशित सामग्रीचे एचटी मीडिया कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व करत नाही.

तुम्ही hindustantimes.com वरील लिंक्सद्वारे इतर साइट्सवर प्रवेश करू शकता. मात्र या साइट्स आमच्या नियंत्रणाखाली नाहीत आणि आम्ही त्यांच्या कोणत्याही सामग्रीसाठी, प्रकाशित माहितीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.

HT Digital Streams Limited खालीलपैकी कोणत्याही नुकसानीसाठी किंवा नुकसानीसाठी जबाबदार नाही (असे नुकसान जेथे अपेक्षित, ज्ञात किंवा अन्य प्रकारचे)

१ - डेटा गमावणे, माहितीचे नुकसान.( loss of data)

२ - महसूल किंवा अपेक्षित नफा. (loss of revenue or anticipated profits)

३- व्यावसायिक नुकसान (loss of business)

४ -संधी गमावणे (loss of opportunity)

५ - सद्भावना कमी होणे किंवा वैयक्तिक प्रतिष्ठेला नुकसान (loss of goodwill or injury to reputation)

६ – थर्ड पाट्रीचे नुकसान होणे ( losses suffered by third parties)

७ - hindustantimes.com च्या वापरामुळे होणारे कोणतेही अप्रत्यक्ष, परिणामी, विशेष किंवा अनुकरणीय नुकसान कारवाईच्या स्वरूपाची पर्वा न करता.

या संदर्भात तुम्ही स्वतःची खबरदारी घेतली पाहिजे, कारण आम्ही व्हायरस, इतर दूषित किंवा विध्वंसक गुणधर्म असलेल्या कोणत्याही संसर्गाची व सामग्रीची जबाबदारी स्वीकारत नाही.

तुम्ही १८ वर्षाखालील असल्यास..


1)कृपया कोणत्याही hindustantimes.com hindustantimes.com वरील चर्चेत भाग घेण्यापूर्वी तुमचे आई-वडील किंवा पालकांकडून पूर्व परवानगी घ्या.

२) स्वतःबद्दल किंवा इतर कोणाचीही वैयक्तिक माहिती कधीही उघड करू नका (उदाहरणार्थ, टेलिफोन नंबर, घरचा पत्ता किंवा ईमेल अड्रेस).

hindustantimes.com वर थर्ड पार्टी सामग्री –

तुम्हाला hindustantimes.comवर तृतीय पक्षांद्वारे सबमिट केलेले जाहिरात साहित्य दिसेल. जाहिरातदार आमच्याकडे सबमिट केलेल्या जाहिरात सामग्रीच्या आशयासाठी पूर्णपणे जबाबदार आहेत. जाहिरातदार संबंधित कायद्याचे पालन करत असल्याची खात्री करून ते आम्हाला जाहिरात सामग्री सादर करतात. आम्‍ही जाहिरात सामग्रीच्‍या कंटेन्टसाठी कोणतीही जबाबदारी स्‍वीकारत नाही. यामध्ये जाहिरात मर्यादा, कोणतीही त्रुटी, काही भाग वगळणे किंवा अशुद्धता आदि सामील आहे.

hindustantimes.com वर मजकूर सादर करणे –

आमच्या साइटचे वापरकर्ते आमच्या ब्लॉग सेवेसह साइटच्या विविध भागात प्रकाशनासाठी सामग्री सबमिट करू शकतात. आम्ही वापरकर्त्यांनी सबमिट केलेल्या आणि आमच्याद्वारे प्रकाशित केलेल्या कोणत्याही सामग्रीच्या संदर्भात कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी स्वीकारत नाही आणि आम्ही त्यातील सामग्री आणि अचूकतेसाठी जबाबदार नाही.

जर तुम्हाला hindustantimes.com वर प्रकाशनासाठी सामग्री सबमिट करायची असेल, तर तुम्ही खालील अटी व शर्तींनुसार करू शकता:

  1. तुम्ही आम्हाला सबमिट केलेल्या कोणत्याही सामग्रीचे प्रकाशन तुमच्या विवेकबुद्धीनुसार असेल. आम्ही प्रकाशनाच्या आधी मजकूर किंवा ग्राफिक्समध्ये काही जोडणे किंवा हटविण्याचा किंवा प्रकाशनास नकार देण्याचा अधिकार राखून ठेवतो.
  2. आम्हाला तुम्ही कोणत्याही फॉरमॅटमधून सबमिट केलेली कोणतीही सामग्री, मर्यादेशिवाय, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपासह, कोणत्याही स्वरूपात पुनर्प्रकाशित करण्यासाठी तुम्ही आम्हाला एक नॉन-एक्सक्लुसिव्ह, शाश्वत, रॉयल्टी-मुक्त, जागतिक परवाना (worldwide licence) प्रदान करता.
  3. माहिती सबमिट करताना तुम्ही एकप्रकारे घोषित करता की, तुम्ही आम्हाला सबमिट केलेली कोणतीही सामग्री तुमचे स्वतःचे मूळ काम ( own original work) आहे आणि तुमचे कॉपीराइट आणि इतर संबंधित अधिकार कायम आहेत.
  4. तुम्ही हमी देता की तुम्ही सबमिट केलेली सामग्री अश्लील, आक्षेपार्ह, कोणत्याही व्यक्तीची बदनामी करणारी किंवा बेकायदेशीर नाही.
  5. स्पॅमिंगसह इतर वापरकर्त्यांना जाणूनबुजून नाराज करण्याच्या उद्देशाने असलेली सामग्री पोस्ट न करण्याच्या धोरणास तुम्ही सहमत आहात.
  6. तुम्ही कबूल करता की या वॉरंटीच्या कोणत्याही उल्लंघनामुळे आमचे नुकसान किंवा हानी होऊ शकते आणि तुम्ही आम्हाला सबमिट केलेल्या सामग्रीच्या प्रकाशनाच्या परिणामी आम्हाला होणाऱ्या कोणत्याही तृतीय पक्षाच्या दायित्वे, दावे, खर्च, नुकसान किंवा हानी यांच्या विरोधात आम्हाला पूर्ण आणि कायमस्वरूपी नुकसानभरपाई देण्यास सहमत आहात, परिणामी नुकसानासह.
  7. तुम्ही सेवांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करत आहात असे आम्हाला आढळून असल्यास आम्ही वैयक्तिक सेवांवरील तुमचा प्रवेश काढून टाकण्याचा व प्रतिबंधित करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.

hindustantimes.com वर ग्राफिक मटेरियल सबमिशन किंवा सादर करणे –
जेव्हा तुम्ही आम्हाला छायाचित्र किंवा इतर ग्राफिकल सामग्री पाठवता तेव्हा तुम्ही या वापराच्या अटींनुसार असे करता. याचा अर्थ असा की तुम्ही याद्वारे सहमत आहात की तुम्ही आम्हाला पाठवलेले छायाचित्र(छायाचित्रे) तुम्ही घेतले आहेत किंवा तुम्हाला ते आम्हाला पाठवण्याची परवानगी आहे किंवा त्या छायाचित्राच्या मालकाकडून अधिकृत आहे आणि तुम्ही मंजूर करत आहात. आम्हाला
hindustantimes.com hindustantimes.com वर कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही वेळी छायाचित्र(छायाचित्रे) प्रकाशित करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी नॉन एक्सक्लुसिव्ह, रॉयल्टी-मुक्त परवाना आहे. छायाचित्र( छायाचित्रे), ग्राफिक डिझाईन बदनामीकारक नसावे आणि त्याद्वारे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करू नये.
निवडक छायाचित्रे आणि ग्राफिकल साहित्य संपादकाच्या दिशानिर्देशानुसार व विवेकबुद्धीनुसार प्रकाशित केले जातील आणि तुमचे छायाचित्र(छायाचित्रे) प्रकाशित झाले असले तरीही तुम्हाला पैसे दिले जाणार नाहीत.

hindustantimes.com वर दिसण्‍यासाठी आम्ही योग्य वाटेल तसे तुमचे छायाचित्र(छायाचित्रे) किंवा ग्राफिक कापून (CUT), संपादित(Edit), क्रॉप (crop) किंवा व्यवस्थित (Arrange) करू शकतो आणि आम्ही तुमचे छायाचित्र(छायाचित्रे) किंवा ग्राफिक्स कधीही वेबसाईटवरून काढून टाकू शकतो.हा आधिकार आम्ही राखून ठेवत आहोत.
तुमचे नाव तुमच्‍या छायाचित्र(छायाचित्रे) किंवा ग्राफिकसोबत प्रकाशित केले जाईल, परंतु तुम्‍ही तुमच्‍या छायाचित्र(छायाचित्रे) किंवा ग्राफिकसह सबमिट केलेल्या टिप्पण्‍या (कॉमेंट) आम्ही संपादित करू शकतो किंवा हटवू शकतो.

सुरक्षितता (SAFETY)

आम्ही सल्ला देतो, की तुम्ही तुमची किंवा इतर कोणाचीही वैयक्तिक माहिती कधीही उघड करू नका (उदाहरणार्थ: टेलिफोन नंबर, घरचा पत्ता किंवा ईमेल पत्ता). कृपया कोणत्याही प्रकारचे पोस्टल पत्ते समाविष्ट करू नका. तुमच्याकडे शेअर करण्यासाठी उपयुक्त पत्ता असल्यास, ' Contact Us ' लिंक वापरून संबंधित समुदाय क्षेत्राच्या होस्टला कळवा आणि त्यांना योग्य वाटल्यास ते त्याचा प्रचार (promote) करतील.

सामान्य (GENERAL)

या अटी व शर्थी वेळोवेळी बदलू शकतात. कृपया तुम्ही या अटी व शर्तींचे नियमितपणे पुनरावलोकन करत आहात याची खात्री करा कारण आम्ही बदल पोस्ट केल्यानंतरही तुम्ही साईट नियमित वापरत राहिल्यास तुम्ही हा बदल स्वीकारला आहे, असे मानले जाईल.

तरी आम्ही hindustantimes.com वर सतत, अखंड प्रवेश प्रदान करण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू, आम्ही याची हमी देत नाही. आम्ही कोणत्याही व्यत्यय किंवा विलंबासाठी कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व स्वीकारत नाही.

नियमन कायदा आणि अधिकार क्षेत्र (GOVERNING LAW & JURISDICTION) -

या अटी भारत सरकारच्या कायद्यांनुसार आणि विशेषत: माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 नुसार नियंत्रित केल्या जातील आणि त्यांचा अर्थ लावला जाईल. या कायद्यानुसार सर्व संबंधित नियम, कायदे, निर्देश, आदेश आणि अधिसूचना देखील लागू होतील.

ही साइट ब्राउझ करणे निवडून, तुम्ही साइटच्या गोपनीयता धोरणास (Privacy Policy) सहमती दर्शवता.