SRH vs RR Dream 11 Prediction : आज रंगणार आयपीएलचा सर्वात मोठा सामना, अशी बनवा हैदराबाद-राजस्थान सामन्याची ड्रीम इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs RR Dream 11 Prediction : आज रंगणार आयपीएलचा सर्वात मोठा सामना, अशी बनवा हैदराबाद-राजस्थान सामन्याची ड्रीम इलेव्हन

SRH vs RR Dream 11 Prediction : आज रंगणार आयपीएलचा सर्वात मोठा सामना, अशी बनवा हैदराबाद-राजस्थान सामन्याची ड्रीम इलेव्हन

May 02, 2024 02:05 PM IST

SRH vs RR Dream 11 Prediction आयपीेल २०२४ चा ५० वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

srh vs rr dream 11 prediction
srh vs rr dream 11 prediction

आयपीेल २०२४ चा ५० वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल आहे. त्यांनी त्यांच्या याआधीच्या सामन्यात लखनौला पराभूत केले होते. तर हैदराबादचा त्यांच्या याआधीच्या सामन्यात आरसीबीकडून पराभव झाला होता. 

हैदराबाद संघासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड सारखे खेळाडू आपली लय परत मिळवून संघाला विजयी मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतील. चहल आणि अश्विनला रोखण्यात सनरायझर्सची मधली फळी महत्त्वाची भूमिका बजावेल. मार्कराम आणि हेनरिक क्लासेन यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

दरम्यान, हैदराबाद असो की राजस्थान, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

SRH vs RR Dream 11 Prediction

कर्णधार- संजू सॅमसन

उपकर्णधार- हेनरिक क्लासेन

फलंदाज- अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, यशस्वी जैस्वाल

अष्टपैलू- अब्दुल समद, आर अश्विन

गोलंदाज- पॅट कमिन्स, टी नटराजन, युझवेंद्र चहल, आवेश खान

पीच रिपोर्ट

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकुल आहे. इथे २०० पेक्षा जास्त धावा सहज होतात. येथे गोलंदाजीत फिरकीपटू नक्कीच काही प्रभाव दाखवू शकतात. बाकी वेगवान गोलंदाजांसाठी इथे फार काही नाही. सामना सुरू झाल्यानंतर वेगवान गोलंदाजांना काही वेळ मदत मिळेल. नंतर येथे धावांचा पाऊस पडतो.

हैदराबाद वि. राजस्थान हेड टू हेड

आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाले आहेत. यापैकी ९ सामने राजस्थानने आणि ९ सामने हैदराबादने जिंकले आहेत. दोन्ही संघ एकेकाळचे आयपीएल चॅम्पियन आहेत. राजस्थानने २००८ मध्ये आयपीएल जिंकले होते, तर हैदराबादने २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. दोन्ही संघांमधील गेल्या ५ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर राजस्थानने ३ आणि हैदराबादने २ जिंकले आहेत.

Whats_app_banner