IPL 2024: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल २०२४ चा ६६वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. गुजरात टायटन्सचा हा सलग दुसरा सामना आहे, जो पावसामुळे खेळू शकला नाही. यासह सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. पावसामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.
गुजरात टायटन्सविरुद्धचा आयपीएल सामना एकही चेंडू न टाकता पावसामुळे वाया गेल्याने सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यापाठोपाठ एसआरएच हा तिसरा संघ ठरला आहे. सनरायझर्सला एक गुण मिळाला असून एक सामना शिल्लक असताना त्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे. त्यांचा सामना १९ मे रोजी अखेरच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जशी होणार आहे.
गतवर्षीचा उपविजेता आणि २०२२ चा चॅम्पियन गुजरातचा मागील सामनाही पावसामुळे रद्द झाल्याने प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. त्यामुळे त्यांनी १४ सामन्यांतून १२ गुणांसह मोसमाची सांगता केली. पावसामुळे सायंकाळी सात वाजता नाणेफेक नियोजित वेळेत होऊ शकली नाही. सामन्यातील षटक कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, परंतु पाऊस कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने अधिकाऱ्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाऊस आणि ओल्या आऊटफिल्डमुळे या आयपीएलमधील हा दुसरा सामना रद्द करण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (१४), रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (१२), दिल्ली कॅपिटल्स (१४) आणि लखनौ सुपर जायंट्स (१२) हे चार संघ अजूनही शेवटच्या स्थानासाठी रिंगणात आहेत. शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध एलएसजीने विजय मिळवला तर त्यांचे १४ गुण होतील आणि ते गणितीयदृष्ट्या जिवंत राहतील, परंतु सीएसकेने आरसीबीला पराभूत केल्यास किंवा शनिवारी सामना वाया गेल्यास ते स्थान पक्के करतील. जर आरसीबीने सीएसकेला किमान १८ धावांनी किंवा ११ चेंडू शिल्लक असताना पराभूत केले तर ते नेट रनरेटच्या आधारावर चौथ्या स्थानावर पोहोचतील कारण ते डीसी, सीएसके आणि एलएसजी (जिंकल्यास) इतकेच १४ गुण मिळवतील.