SRH vs GT Head to Head: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज लढत, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs GT Head to Head: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज लढत, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

SRH vs GT Head to Head: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज लढत, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

May 16, 2024 11:32 AM IST

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Head to Head Record: आयपीएल २०२४ च्या ६६व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स एकमेकांशी भिडणार आहेत.

आयपीएल २०२४: सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्स यांच्यात आज लढत
आयपीएल २०२४: सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्स यांच्यात आज लढत (AFP)

IPL 2024: माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबादचा संघ (Sunrisers Hyderabad) गुरुवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) गुजरात टायटन्सवर विजय मिळवून प्लेऑफ पात्रतेची शक्यता बळकट करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे गुजरातचा संघ (Gujarat Titans) या हंगामातील त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकुयात.

सनरायझर्स संघ सध्या १४ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत. यामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखील हैदराबादचा संघ दोन्ही सामने जिंकून अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. ऑरेंज आर्मीला पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या चमकदार जोडीच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे, ज्यांनी आपल्या संघाला आपल्या शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर १० विकेट राखून विजय मिळवून दिला. मात्र, आजच्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात गुजरात आणि हैदराबादचा संघ एकूण चार वेळा आमने आले. यातील तीन सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. तर, सनरायझर्स हैदराबादला एकच सामना जिंकता आला आहे.

खेळपट्टी

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे फलंदाजीसाठी अनुकूल ट्रॅक मानले जाते जे संघांना गोल करण्याच्या भरपूर संधी देते. या मैदानावर खेळल्या गेलेल्या ७६ सामन्यांपैकी ४२ सामने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.

सनरायझर्स हैदराबादचा संभाव्य संघ:

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंह, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत.

इम्पॅक्ट प्लेअर: टी नटराजन.

गुजरात टायटन्सचा संभाव्य संघ:

शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.

इम्पॅक्ट प्लेअर: संदीप वॉरियर.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग