एक्झिट पोल

 • 01D :
 • 03H :
 • 41M :
 • 45S
अधिक वाचा

Marathi News

18:02 IST

Maharashtra Karnataka Border dispute : कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत शरद पवारांनी अल्टिमेटम दिला होता की, जर येत्या ४८ तासांत हिंसाचार न थांबल्यास माझ्यासह सर्वांना बेळगावात जाऊन तेथील लोकांना धीर द्यावा लागेल. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पवार-फडणवीस
पवार-फडणवीस

Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

06 December 2022, 18:02 ISTShrikant Ashok Londhe
06 December 2022, 23:32 IST

Maharashtra Karnataka Border dispute : कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत शरद पवारांनी अल्टिमेटम दिला होता की, जर येत्या ४८ तासांत हिंसाचार न थांबल्यास माझ्यासह सर्वांना बेळगावात जाऊन तेथील लोकांना धीर द्यावा लागेल. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. आज बेळगावजवळ हिरे-बागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हल्ला चढवला. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले व पुण्यात कर्नाटकच्या वाहनांची हवा सोडण्यात आली. कर्नाटकच्या या आगळीकीने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन ४८ तासात जर हिंसाचार थांबला नाही तर मला सीमाभागातील लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शरद पवारांच्या अल्टीमेटमवर पत्रकारांनी विचारल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीमाभागात राहणारे लोक नेहमीच आपल्या सर्वांच्या संपर्कात असतात. त्यांची अपेक्षा असते की, परिस्थितीत गंभीर झाल्यावर महाराष्ट्राने त्यांना धीर द्यावा, पाठिंबा द्यावा. आपला नेहमीच पाठिंबा त्यांना असतो. मला असं वाटतं की ४८ तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नाही. निश्चितपणे कर्नाटक सरकार,केंद्रसरकार आणि राज्य सरकार ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील लोकांनाही माझी विनंती आहे,की अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर या गोष्टी वाढत जातील. या कोणाच्या हिताच्या नाहीत.

शरद पवारांनी आरोप केला आहे की, सीमाप्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही,अन्य पक्षांशी चर्चा करत नाही,थेट निर्णय घेते आणि अंमलबजावणीही होत नाही. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळेच झाली. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना चर्चेला बोलावलं. शरद पवारांनाही बोलावलं होतं. कदाचित प्रकृतीच्या कारणामुळे ते त्यावेळी येऊ शकले नसतील.

शरद पवार म्हणाले होते की, येत्या ४८ तासांत कर्नाटकने हिंसाचार थांबवला नसल्यास माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. मात्र महाराष्ट्राच्या संयमाचाही अंत होऊ शकतो.

 

18:04 IST
 • Spain eliminated from fifa world cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये मोरोक्कोने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० ने पराभव केला आहे. या पराभवानंतर स्पेनचा संघ फिफा वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. तर मोरक्कोचा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.
Morocco Vs Spain FIFA WC
Morocco Vs Spain FIFA WC

Morocco Vs Spain: स्पेन वर्ल्डकपमधून बाहेर! मोरोक्कोनं घडवला चमत्कार

06 December 2022, 18:04 ISTRohit Bibhishan Jetnavare
06 December 2022, 23:34 IST
 • Spain eliminated from fifa world cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये मोरोक्कोने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० ने पराभव केला आहे. या पराभवानंतर स्पेनचा संघ फिफा वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. तर मोरक्कोचा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.

फिफा वर्ल्डकपच्या राऊंड ऑफ १६ फेरीत मोरोक्कोने चमत्कार घडवला आहे. मोरोक्कोने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. मोरक्कोने राऊंड ऑफ १६ फेरीत बलाढ्य स्पेनचा धुव्वा उडवला. मोरोक्कोने २०१० चा चॅम्पियन स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० ने पराभव केला. स्पेनचा संघ सलग दुसऱ्यांदा राऊंड ऑफ १६ फेरीत फेरीत पराभूत झाला आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये स्पेनला रशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

ट्रेंडिंग न्यूज

निर्धारित ९० मिनिटांत एकही गोल न झाल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळ संपल्यानंतरही स्कोअर ०-० असाच राहिला. त्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला.

मोरोक्कोच्या विजयाचा हिरो निश्चितच गोलरक्षक यासिन बोनो हा ठरला. यासिनने शूटआऊटमध्ये स्पेनला एकही गोल करू दिला नाही आणि एकूण तीन सेव्ह केले. पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरोक्कोकडून अब्देलहामिद साबिरी, हकीम झिएच आणि अश्रफ हकीमी यांनी गोल केले. फक्त बी. बेनौनला गोल करण्यात अपयश आले. 

त्याचवेळी स्पेनकडून साराबिया, कार्लोस सोलर आणि सर्जिओ बुस्केट्स यांना पेनल्टी शुटआऊटमध्ये गोल करण्यास अपयश आले. मोरोक्कोचा संघ प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी २०१० चा चॅम्पियन टीम स्पेनचा प्रवास इथेच संपला.

पेनलल्टी शुटआऊटमध्ये काय घडलं?

अब्देलहमिद साबिरी (मोरोक्को) - गोल.

पाब्लो साराबिया (स्पेन) - पेनल्टी मिस.

हकीम झिएच (मोरोक्को) - गोल

कार्लोस सोलर (स्पेन) - पेनल्टी मिस.

बी. बेनौन (मोरोक्को) - पेनल्टी मिस.

सर्जिओ बुस्केट्स (स्पेन) - पेनल्टी मिस.

अश्रफ हकिमी (मोरोक्को) - गोल.

17:03 IST

maharashtra karnataka border dispute : देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भातील माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. 

फडणवीस-शहा
फडणवीस-शहा

Border Dispute: कर्नाटक सीमावादासंबंधी सर्व माहिती अमित शहांपर्यंत पोहोचवणार - देवेंद्र फडणवीस

06 December 2022, 17:03 ISTShrikant Ashok Londhe
06 December 2022, 22:33 IST

maharashtra karnataka border dispute : देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भातील माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. 

Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव हिरे-बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राचा नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांची कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून नासधूस करण्यात आली. यावेळी गाड्यांच्या नंबर प्लेटवर लाथा मारल्याचे व महाराष्ट्राविरोधी घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कर्नाटकच्या या कृतीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: सीमावादाच्या या लढ्यात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कर्नाटक बरोबरच्या सीमावादासंदर्भातील सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले की, कर्नाटकाने हा सर्व प्रकार थांबवायला हवा. क्रियेला प्रतिक्रिया येतेच. मात्र, असे प्रकार योग्य नाहीत. महाराष्ट्राने संयम दाखवला आहे. जे कुणी वाहने रोखण्यासारखा प्रकार करतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोललो आहे. या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जातो की नाही, हे बघावे लागेल.

 

13:49 IST
 • Hrishikesh Kanitkar new coach Indian Women Team: बीसीसीआय आता पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ते धडाधड निर्णय घेत आहेत. आजही BCCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BCCI ने हृषिकेश कानिटकर याची भारतीय महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. कानिटकर अंडर १९ पुरुष क्रिकेट संघाचा कोच होता. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने अंडर -१९ वर्ल्डकप जिंकला होता. यश धूल त्या संघाचा कर्णधार होता.
Hrishikesh Kanitkar new coach Indian Women Team
Hrishikesh Kanitkar new coach Indian Women Team

Team India: वर्ल्डकपआधी BCCI अ‍ॅक्शन मोडवर, भारतीय संघात झाले ‘हे’ मोठे बदल

06 December 2022, 13:49 ISTRohit Bibhishan Jetnavare
06 December 2022, 19:19 IST
 • Hrishikesh Kanitkar new coach Indian Women Team: बीसीसीआय आता पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ते धडाधड निर्णय घेत आहेत. आजही BCCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BCCI ने हृषिकेश कानिटकर याची भारतीय महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. कानिटकर अंडर १९ पुरुष क्रिकेट संघाचा कोच होता. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने अंडर -१९ वर्ल्डकप जिंकला होता. यश धूल त्या संघाचा कर्णधार होता.

बीसीसीआयने हृषिकेश कानिटकर याची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी तो संघात सामील होईल. ही मालिका ९ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होत आहे. यासोबतच भारतीय महिला संघाचा माजी प्रशिक्षक रमेश पोवार याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) पाठवण्यात आले आहे. पोवार येथे व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली काम करेल. महिला संघासोबत दीर्घकाळ काम केलेला पोवार आता पुरुष खेळाडूंसोबत काम करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून कानिटकरची नियुक्ती

तसं पाहिलं तर, आगामी महिला टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने हृषिकेश कानिटकरला भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवले आहे. महिला T20 विश्वचषक २०२३ हा दक्षिण आफ्रिकेत १० ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हृषीकेश कानिटकर याला प्रशिक्षणासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे.

कोचपदी नियुक्ती झाल्यानंतर हृषिकेश कानिटकर काय म्हणाला?

नवीन जबाबदारी सोपवण्यात आल्यावर हृषिकेश कानिटकर म्हणाला, “वरिष्ठ महिला संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणे हा सन्मान आहे. मला या संघात प्रचंड क्षमता दिसते आणि आमच्याकडे युवा खेळाडू आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आहे. मला विश्वास आहे की हा संघ पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. आमच्याकडे काही मोठ्या स्पर्धा येत आहेत. त्या संघासाठी आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी रोमांचक असतील."

NCA मध्ये नवी जबाबदारी मिळाल्यानंतर रमेश पोवार काय म्हणाला?

तसेच, MCA मध्ये नियुक्ती झाल्यानंतर रमेश पोवार म्हणाला की, “वरिष्ठ महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ खूप चांगला राहिला. गेल्या काही वर्षांत, मी खेळातील काही दिग्गज आणि देशातील नवोदित प्रतिभांसोबत जवळून काम केले आहे. NCA मध्ये मी भविष्यासाठी नवीन टॅलेंट तयार करण्यात मदत करणार आहे. खेळ आणि बेंच स्ट्रेंथ विकसित करण्यासाठी मी व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.”

15:42 IST
 • Qatar Will Make Hotels, Shopping Mall, Schools In Stadiums: कतारमधील ५ फुटबॉल स्टेडियम्सचे शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि शाळांमध्ये रूपांतर केले जाईल. त्याचबरोबर ३ स्टेडियममध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्यात फक्त फुटबॉल खेळाडू सराव आणि सामने खेळतील.
FIFA WC
FIFA WC

FIFA WC: फिफा वर्ल्डकपनंतर ‘या’ ८ स्टेडियमचं काय होणार? कतारनं आधीच लावलंय एक्स्ट्रा दिमाग

06 December 2022, 15:42 ISTRohit Bibhishan Jetnavare
06 December 2022, 21:12 IST
 • Qatar Will Make Hotels, Shopping Mall, Schools In Stadiums: कतारमधील ५ फुटबॉल स्टेडियम्सचे शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि शाळांमध्ये रूपांतर केले जाईल. त्याचबरोबर ३ स्टेडियममध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्यात फक्त फुटबॉल खेळाडू सराव आणि सामने खेळतील.

फिफा विश्वचषक २०२२ आता एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. सध्या राऊंड ऑफ १६ चा थरार अंतिम टप्प्यात आहे. या फेरीतील विजेते संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरत आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर कतारमधील सर्व ८ स्टेडियमचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण कतारमध्ये फुटबॉल फारसा लोकप्रिय नाही, पण तरी फिफा विश्वचषकासाठी येथे ८ जागतिक दर्जाची स्टेडियम बांधण्यात आली आहेत. फिफा विश्वचषक संपल्यानंतर या सर्व स्टेडियमचा वापर कशासाठी आणि कसा करायचा हे कतारसमोर आव्हान असेल. मात्र, कतारने यावर आधीच उपाय शोधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कतारमधील फुटबॉल ५ शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि शाळांमध्ये रूपांतर केले जाईल. त्याचबरोबर ३ स्टेडियममध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्यात फक्त फुटबॉल खेळाडू सराव आणि सामने खेळतील.

सर्व स्टेडियम्सवर १८ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे

कतारमध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी १२ स्टेडियम्सचा प्रस्ताव होता. परंतु नंतर कतारच्या आदेशानुसार फिफाने ८ स्टेडियम्ससाठी सहमती दर्शवली. फिफा विश्वचषक फायनलसाठी ८० हजार प्रेक्षक बसू शकतील अशा स्टेडियमची आवश्यकता होती. याशिवाय उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ६० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले स्टेडियम आवश्यक होते. तर सामान्य सामने आयोजित करण्यासाठी किमान ४० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमची आवश्यकता होती. यातील ७ स्टेडियम नव्याने बांधण्यात आले आहेत. तर खलिफा स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास १८ हजार १२६ कोटी रूपये रुपये खर्च करण्यात आले आहेत.

कतारमधील आठही स्टेडियमचे भविष्यात वेगवेगळे उपयोग होणार आहेत. तीन स्टेडियममध्ये कोणताही बदल होणार नाही. एक स्टेडियम कतार राष्ट्रीय संघासाठी असेल. ज्यामध्ये सर्व खेळाडू सराव करतील. तसेच त्याच स्टेडियमध्ये कतार आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करेल. तर फुटबॉल क्लबसाठी २ स्टेडियम असतील. ज्यामध्ये क्लबचे खेळाडू सराव करतील आणि त्यांचे सामने खेळतील.

कतारमधील ८ स्टेडियमचे काय होणार?

त्याच वेळी, काही स्टेडियममधून एक मजला काढला जाईल. यातून येणारे स्टील आणि जागा गरीब देशांना दान करण्यात येणार आहे. ज्या देशांना स्टेडियम बांधण्याची गरज आहे.

तसेच, फिफा विश्वचषकाच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार, लुसेल स्टेडियममध्ये शाळा, दुकाने, कॅफे, क्रीडा सुविधा आणि दवाखाने असतील.

अल बायत स्टेडियमवर पंचतारांकित हॉटेल, शॉपिंग मॉल आणि स्पोर्ट्स मेडिसिन क्लिनिक उघडले जाईल.

अहमद बिन अली स्टेडियम हे रेनाइस क्लबचे होम ग्राउंड असेल. अल झैनब स्टेडियम हे अल वक्राह संघाचे होम ग्राउंड असेल. तर खलिफा स्टेडियम कतारच्या राष्ट्रीय संघासाठी असणार आहे. या स्टेडियमध्ये २०२६ च्या विश्वचषकासाठीचे पात्रता फेरीचे सामने देखील खेळवले जावू शकतात. २०२४ मध्ये होणाऱ्या आशियाई कपठीही काही स्टेडियमचा वापर केला जाऊ शकतो. कतारला २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाल्यास या स्टेडियमचा ऑलिम्पिकसाठीही वापर केला जाऊ शकतो.

17:30 IST

central railway : मध्य रेल्वे मार्गावर कसारा-इगतपुरी दरम्यान इंजिनची तीन चाके रुळावरून खाली घसरल्याने कसारा व मुंबई-ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

इंजित रुळावरून घसरले
इंजित रुळावरून घसरले

कसारा-इगतपुरी दरम्यान रेल्वेचे इंजिन रुळांवरून घसरले; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

06 December 2022, 17:30 ISTShrikant Ashok Londhe
06 December 2022, 23:00 IST

central railway : मध्य रेल्वे मार्गावर कसारा-इगतपुरी दरम्यान इंजिनची तीन चाके रुळावरून खाली घसरल्याने कसारा व मुंबई-ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

मध्य रेल्वे मार्गावर कसारा-इगतपुरी दरम्यान आज (मंगळवार) रात्रीच्या सुमारास इंजिन रुळावरून खाली घसरले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली. या घटनेमुळे मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने येणारी वाहतूक त्याचबरोबर कसाऱ्याहून कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकल सेवेवर परिणाम झाल्याने ठाणे, कल्याण आणि मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. 

ट्रेंडिंग न्यूज

कसारा- इगतपुरी मार्गावरून घाटातून लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक करण्यासाठी दोन इंजिन वापरले जाते. मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हे इंजिन कसाऱ्याहून इगतपुरीच्या दिशेने जात होते. इंजिन कसाऱ्याजवळील रेल्वे उड्डाणपूलाजवळ आले असता इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली.

घटनेनंतर मध्ये रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इंजिन रुळांवर आणण्यासाठी प्रशासनाने ओव्हरहेड तारेमधील विद्युत प्रवाह बंद केला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. कसारा-आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान हावडा दुरांतो आणि पंचवटी या लांब पल्ल्यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशीरापर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाकडून इंजिन रुळांवर आणण्याचे काम सुरू होते.

विभाग

14:23 IST
 • Womens Umpires in Ranji Trophy: रणजी क्रिकेटच्या ८८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलांना अंपायरिंग पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले आहे. १३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या वृंदा राठी, चेन्नईच्या जननी नारायण आणि गायत्री वेणुगोपालन यांचा समावेश करण्यात आला आहे.
Ranji Trophy
Ranji Trophy

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये असणार महिला अंपायर, BCCI नं केली ‘या’ तिघींची निवड

06 December 2022, 14:23 ISTRohit Bibhishan Jetnavare
06 December 2022, 19:53 IST
 • Womens Umpires in Ranji Trophy: रणजी क्रिकेटच्या ८८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलांना अंपायरिंग पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले आहे. १३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या वृंदा राठी, चेन्नईच्या जननी नारायण आणि गायत्री वेणुगोपालन यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारताची सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा अर्थात रणजी ट्रॉफीमध्ये महिला अंपायरिंग करताना दिसणार आहेत. रणजी क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन हंगामासाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या अंपायरिंग पॅनेलमध्ये ३ महिला अंपायर्सचादेखील समावेश केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रणजी क्रिकेटच्या ८८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलांना अंपायरिंग पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले आहे. १३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या वृंदा राठी, चेन्नईच्या जननी नारायण आणि गायत्री वेणुगोपालन यांचा समावेश करण्यात आला आहे.

मॅच फी देखील पुरुषांच्या बरोबरीची

या महिला पंचांची मॅच फीदेखील पुरुष पंचांच्या बरोबरीची आहे. ग्रेडनुसार बोर्ड पंचांना दिवसाला २५ ते ४० हजार रुपये पगार देते.

या ३ महिला पंचाबद्दल जाणून घेऊया

वृंदा राठी : वृंदा राठी या मुंबईच्या रहिवासी आहेत. यापूर्वी वृंदा राठी या सामन्यादरम्यान स्कोअरर म्हणून काम करायच्या. वृंदा यांची एकदा न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय पंच कॅथी क्रॉसला भेटल्या. या भेटीनंतरच वृंदा राठी यांनी अंपायरिंगमध्ये हात आजमावण्याचा निर्णय घेतला आणि बीसीसीआयची अंपायरिंग टेस्ट पास केली.

जननी नारायण: चेन्नईच्या जननी नारायण यांनी अंपायर होण्यासाठी नोकरी सोडली आहे.

गायत्री वेणुगोपाल: गायत्री यांना क्रिकेटर व्हायचे होते, पण खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, त्यांनी क्रिकेटला स्वतापासून दूर जाऊ दिले नाही. गायत्री यांनी अंपायरिंग सुरू केली.

क्रिकेट बोर्ड महिला पंचांना प्रशिक्षण देणार

देशात अधिकाधिक महिला पंच तयार व्हावेत. यासाठी बीसीसीआय प्रशिक्षण पंचांना प्रशिक्षण देणार आहे. यासाठी अंपायरिंगच्या टेस्टचेही आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून महिला पंचांचे एक स्पेशल पॅनेल तयार होईल. जे देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करू शकतील.

16:13 IST

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर

06 December 2022, 16:13 ISTShrikant Ashok Londhe
06 December 2022, 21:43 IST

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या गटांमध्ये ३३ लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून यात हबीब भंडारे, रमजान मुल्ला, शरद बाविस्कर, दीपा देशमुख आणि अन्य लेखकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कृष्ट वाङ्यम निर्मितीसाठी जाहीर झालेले पुरस्कार साहित्य प्रकार, पुरस्काराचे नाव, पुरस्कार प्राप्त लेखक, कंसात पुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम या प्रमाणे

प्रौढ वाङमय (काव्य) -कवी केशवसुत पुरस्कार: हबीब भंडारे (जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : रमजान मुल्ला (अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त), ५० हजार रुपये; प्रौढ वाङमय (नाटक/ एकांकिका)- राम गणेश गडकरी पुरस्कार : नारायण जाधव येळगावकर (यशोधरा) १ लाख रुपये. प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका)- विजय तेंडूलकर पुरस्कार : शिफारस नाही;  प्रौढ वाङमय (कांदबरी)- हरी नारायण आपटे पुरस्कार : प्रशांत बागड (नवल) १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (कादंबरी)- श्री. ना. पेंडसे पुरस्कार : श्वेता सीमा विनोद (आपल्याला काय त्याचं..) , ५० हजार रुपये; प्रौढ वाङमय (लघुकथा)- दिवाकर कृष्ण पुरस्कार : अनिल साबळे (पिवळा पिवळा पाचोळा), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (लघुकथा)- ग.ल.ठोकळ पुरस्कार : विश्वास जयदेव ठाकूर (नात्यांचे सर्व्हिंग), ५० हजार रुपये. प्रौढ वाङमय (ललितगद्य) (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार : डॉ.निलिमा गुंडी (आठवा सूर), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन- (ललितगद्य)- ताराबाई शिंदे पुरस्कार : वीणा सामंत (साठा उत्तराची कहाणी), ५० हजार रुपये;

प्रौढ वाङमय (विनोद) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : राजा गायकवाड (गढीवरून), १ लाख रुपये; प्रौढ वाङमय (चरित्र)- न.चिं.केळकर पुरस्कार: वंदना बोकील-कुलकर्णी (रोहिणी निरंजनी), १ लाख रुपये;     प्रौढ वाङमय (आत्मचित्र)- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : शरद बाविस्कर (भुरा), १ लाख रुपये;  प्रौढ वाङमय (समीक्षा/ वाङमयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार: दीपा देशमुख (जग बदलणारे ग्रंथ), १ लाख रुपये;  प्रथम प्रकाशन (समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)- रा.भा. पाटणकर पुरस्कार : प्रा.ड़. प्रकाश शेवाळे (अनुष्टभ नियतकालिकाचे वाङमयीन योगदान ), ५० हजार रुपये;  प्रौढ वाङमय (राज्यशास्त्र / समाजशास्त्र)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : सुरेश भटेवरा (शोध नेहरू-गांधी पर्वाचा ), १ लाख रुपये;

14:27 IST

Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटककडून महाराष्ट्रातील बसेस व ट्रकांवर दगडफेक करण्यात आली आहे. यावरून रोहित पवारांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, हवेत गोळीबार करणारे भाजप नेते आता कुठे आहेत.

रोहित पवार
रोहित पवार

Border dispute : “हवेत गोळीबार करणारे भाजप नेते आता कुठं गेले? यापुढं महाराष्ट्र शांत बसणार नाही"

06 December 2022, 14:27 ISTShrikant Ashok Londhe
06 December 2022, 19:57 IST

Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटककडून महाराष्ट्रातील बसेस व ट्रकांवर दगडफेक करण्यात आली आहे. यावरून रोहित पवारांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, हवेत गोळीबार करणारे भाजप नेते आता कुठे आहेत.

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असून कर्नाटकातील बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकांवर तसेच बसेसवर दगडफेकीच्या घटना आहेत. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिरे बागेवाडी टोल नाक्यावर दगडफेक करत महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत असून शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटककडून हिंसाचार न थांबल्यास आपण स्वत: कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनीही सत्ताधारी भाजपवर निशणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रोहित पवार यांनी ट्विट करून कर्नाटक हिंसाचारावर भाष्य केले आहे.' कन्नड रक्षण वेदिके'चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठे आहेत? निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतेय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतेय. संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणे हा कसला संवाद? राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळे महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय. पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढे न झुकणारा महाराष्ट्र यापुढे शांत बसणार नाही, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सीमावाद उफाळून आला आहे आणि यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे. येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल, असा रोखठोक इशारा शरद पवारांनी दिलाआहे.

 

13:57 IST
 • ind vs ban 2nd odi match preveiw: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना उद्या खेळवला जाणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला उद्याचा सामना जिंकावाच लागणार आहे. जर उद्या टीम इंडियाचा पराभव झाला तर मालिका बांगलादेशच्या खिशात जाईल.
IND vs BAN 2nd ODI
IND vs BAN 2nd ODI

IND vs BAN 2nd ODI: भारताला जिंकावच लागेल, हॉटस्टार, प्राईम नाही तर ‘या’ अ‍ॅपवर दिसणार सामना

06 December 2022, 13:57 ISTRohit Bibhishan Jetnavare
06 December 2022, 19:27 IST
 • ind vs ban 2nd odi match preveiw: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना उद्या खेळवला जाणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला उद्याचा सामना जिंकावाच लागणार आहे. जर उद्या टीम इंडियाचा पराभव झाला तर मालिका बांगलादेशच्या खिशात जाईल.

टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर संघ ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला अवघ्या एका विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता भारतीय संघाला मालिका वाचवायची असेल पुढचा सामना जिंकावाच लागणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना उद्या (७ डिसेंबर) बुधवारी ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सुरू होईल.

ट्रेंडिंग न्यूज

पहिल्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अत्यंत खराब होते. त्या सामन्यात वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

सामना कोणत्या चॅनलवर दिसणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सोनी टेन चॅनलवर पाहू शकता. तर लाईव्ह स्ट्रिमिंग Sony Liv अॅपवर पाहता येईल.

दोन्ही संघ

भारत-

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.

बांगलादेश-

लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराज, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादत हुसेन, अनामूल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद रहमान, मुस्तफिकर रहमान , नसूम अहमद आणि तस्किन अहमद.

15:34 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. जळगावचा विशाल चौधरी राज्यात प्रथम आला असून मुलींमध्ये साताऱ्याची शीतल फाळके प्रथम आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

MPSC : सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, जळगावचा विशाल चौधरी राज्यात प्रथम

06 December 2022, 15:34 ISTShrikant Ashok Londhe
06 December 2022, 21:04 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. जळगावचा विशाल चौधरी राज्यात प्रथम आला असून मुलींमध्ये साताऱ्याची शीतल फाळके प्रथम आली आहे.

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा मान जळगाव जिल्ह्यातील विशाल चौधरी यांनी मिळवला आहे. तर सातारा जिल्ह्यातील शीतल फाळके यांनी महिला प्रवर्गातून अव्वल क्रमांक मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

आयोगाने नमूद केले आहे की, शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास गुणपत्रके प्राप्त झाल्यानंतर १० दिवसांत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाच्या १०० पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. अंतिम निकालासह प्रत्येक प्रवर्गातून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुण (कटऑफ) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी त्यांच्या अर्ज नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या, आरक्षण-प्रमाणपत्राचे दावे प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी, चुकीची आढळल्यास, अर्जातील दाव्यानुसार प्रमाणपत्राची पूर्तता न केल्यास, अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

13:33 IST

Suhasini Nandgaonkar Joins Congress: प्रसिद्ध पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Suhasini Nandgaonkar
Suhasini Nandgaonkar

Suhasini Nandgaonkar: प्रसिद्ध गायिका सुहासिनी नांदगावकर काँग्रेसमध्ये; प्रवेशाचं कारणही सांगितलं!

06 December 2022, 13:33 ISTGanesh Pandurang Kadam
06 December 2022, 19:03 IST

Suhasini Nandgaonkar Joins Congress: प्रसिद्ध पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Suhasini Nandgaonkar Joins Congress: प्रसिद्ध कवी व माजी आमदार शांताराम नांदगावकर यांच्या स्नुषा पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी आज आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ट्रेंडिंग न्यूज

सुहासिनी नांदगावकर यांनी 'अशी ही बनवाबनवी, तू सुखकर्ता, गोडी गुलाबी अशा मराठी चित्रपटांबरोबरच सैनिक, स्टंटमन, छोटा सा घर अशा अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत. ३० वर्षांपासून त्या पार्श्वगायन क्षेत्रात कार्यरत असून देश विदेशातही त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. संगीत शिक्षिका म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. काँग्रेस प्रवेशानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘काँग्रेस हाच सर्व जाती-धर्मांना सामावून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणारा पक्ष आहे. मागास, वंचित, दलित समाजाच्या विकासाचं काम काँग्रेस सरकारनंच केलं, परंतु सध्या देशातील परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. दलित, मागास, पीडित समाजाचा विकास काँग्रेस पक्षच करू शकतो याचा विश्वास असल्यानंच मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एक कलाकार म्हणून कलाकारांचे प्रश्न व समस्या सोडवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून करेन,’ असं त्या म्हणाल्या.

काँग्रेसच्या विचारानं प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय!

'काँग्रेसच्या विचाराला माननारे लोक राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळं लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे. देश तोडण्याचं काम काही पक्ष व संघटना करत असताना देश जोडण्याची भूमिका घेऊन राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ऐतिहासिक पदयात्रा सुरू केली आहे. तोडणाऱ्यांपेक्षा जोडणारे महत्वाचे असतात ही लोकांची भावना आहे. काँग्रेस विचारानं प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

12:53 IST

Ajit Pawar on Border Dispute: महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्य सरकारनं 'अरे'ला 'कारे' करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी अजित पवार यांनी केलं आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar (PTI)

Border Dispute: हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला; शिंदे सरकारनं हिंमत दाखवावी; अजित पवार भडकले!

06 December 2022, 12:53 ISTGanesh Pandurang Kadam
06 December 2022, 18:23 IST

Ajit Pawar on Border Dispute: महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्य सरकारनं 'अरे'ला 'कारे' करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी अजित पवार यांनी केलं आहे.

Ajit Pawar on Maharashtra Karnataka Border Dispute: मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं आता 'अरे'ला 'कारे' करण्याची हिंमत दाखवावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारनं खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. 'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारनं दाखवावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

'कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यामुळंच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजुटीनं सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभे आहेत. सत्ताधारी पक्षांनीही आपलं कर्तव्य पार पाडावं. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

विभाग

13:43 IST
 • How to Store Green Coriander: हिवाळयात भरपूर प्रमाणात कोथिंबीर उपलब्ध असते. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही ही कोथिंबीर जास्त वेळासाठी स्टोअर करू शकता.
कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी टिप्स
कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी टिप्स (Freepik )

Coriander Storing Tips: हिवाळ्यात कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स! पटकन होणार नाही खराब

06 December 2022, 13:43 ISTTejashree Tanaji Gaikwad
06 December 2022, 19:13 IST
 • How to Store Green Coriander: हिवाळयात भरपूर प्रमाणात कोथिंबीर उपलब्ध असते. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही ही कोथिंबीर जास्त वेळासाठी स्टोअर करू शकता.

Kitchen Tips: हिवाळ्यात काही हंगामी भाज्या जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात. हिरवी कोथिंबीर देखील यापैकीच एक आहे. तसे, हिरवी कोथिंबीर प्रत्येक हंगामात वापरली जाते. पण विशेषतः हिवाळ्यात, हिरवी कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते त्यामुळे त्याचा वापर जास्त केला जातो. मात्र हिरवी कोथिंबीर जास्त काळ ठेवल्यास ती लवकर खराब होते. अशा परिस्थितीत कोथिंबीर काही खास पद्धतीने स्टोअर करून तुम्ही दीर्घकाळ ताजी ठेवू शकता. हिवाळ्यात हिरवी कोथिंबीर जास्त वापरल्यामुळे अनेकजण बाजारातून भरपूर खरेदी करतात.मात्र काही दिवस ठेवल्यानंतर हिरवी कोथिंबीर कुजून कुजायला लागते. यामुळे तुम्हाला सगळी हिरवी कोथिंबीर फेकून द्यावी लागेल. म्हणूनच आम्ही तुम्हाला कोथिंबीर साठवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही कोथिंबीर खराब होण्यापासून वाचवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरा

हिवाळ्यात कोथिंबीर साठवण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्याची मदत घेऊ शकता. यासाठी हिरवी कोथिंबीर धुवून कोरडी करून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि नंतर पाणी सुकल्यानंतर कोथिंबीर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून पॅक करा. याने तुमची हिरवी कोथिंबीर २ आठवडे खराब होणार नाही.

पाण्यात स्टोअर करा

हिवाळ्यात कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी पाणी वापरणे हा उत्तम पर्याय आहे. यासाठी अर्धा कप पाण्यात हिरवी कोथिंबीर टाकून ठेवा. यामुळे १ आठवडा कोथिंबीर खराब होणार नाही.

फ्रिजची मदत घ्या

हिवाळ्यात कोथिंबीर ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. यासाठी कोथिंबीर सुकवून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ते फ्रीजमधून बाहेर काढा, कापून घ्या आणि एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे कोथिंबीर बरेच दिवस ताजी राहते.

मऊ कापडाने झाकून ठेवा

कोथिंबीर कापडात ठेवण्यासाठी प्रथम त्याचे देठ कापून घ्या. आता कोथिंबीर नीट धुवून वाळवा. पानातील पाणी सुकल्यानंतर ते मलमलच्या कपड्यात गुंडाळा. यामुळे कोथिंबीर २०-२५ दिवस खराब होणार नाही.

टिश्यू पेपर वापरा

हिवाळ्यात कोथिंबीर जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी टिश्यू पेपर वापरणे देखील चांगले आहे. यासाठी कोथिंबीर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि नंतर हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे कोथिंबीर बरेच दिवस ताजी राहते.

 

विभाग

12:58 IST

Maharashtra Karnataka border dispute : बेळगावमध्ये महाराष्ट्रातील ट्रकांवर कन्नडीगांनी दगडफेक केली आहे. यावर छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे की, सौंदती यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील लाखो भाविक कर्नाटकात आहेत. त्यांना सुरक्षा द्यावी अन्यथा मला तिकडे यावे लागेल. 

 छत्रपती संभाजीराजेंचा इशारा
 छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

Karnataka Border Dispute : “अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावं लागेल”, छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

06 December 2022, 12:58 ISTShrikant Ashok Londhe
06 December 2022, 18:28 IST

Maharashtra Karnataka border dispute : बेळगावमध्ये महाराष्ट्रातील ट्रकांवर कन्नडीगांनी दगडफेक केली आहे. यावर छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे की, सौंदती यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील लाखो भाविक कर्नाटकात आहेत. त्यांना सुरक्षा द्यावी अन्यथा मला तिकडे यावे लागेल. 

कर्नाटक आणि महाराष्ट्रमधील सीमावाद हिंसक बनला असून आज दोन्ही राज्यात एकमेकांच्या बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. कर्नाटकमधील हिरे बागेवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील नंबर प्लेट असणाऱ्या ट्रकांवर दगडफेक करण्यात आली. कन्नड लोकांनी रस्त्यावर उतरून निर्देशने केली. यानंतर आता राज्यातील नेते आक्रमक झाले आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संभाजीराजेंनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ''छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.'' त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, ''रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापुरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत. त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल.''

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटकामधील सध्याचा वाद हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. एकदा नव्हे, दोन-तीनदा त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. आज महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाला आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील जनता संयम राखून आहे,पण संयमाला मर्यादा असतात. हा संयम सुटू नये याची काळजी कर्नाटक व केंद्र सरकारनं घ्यायला हवी. अन्यथा उद्रेक झाल्यास त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात पुण्याहून बंगळुरुच्या दिशेनं जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पाच ते सहा वाहनांवर दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं आता दोन्ही राज्यांत सीमावादाच्या प्रश्नावरून राजकीय वादंग पेटलेलं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करून बेळगावातील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला आहे. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करणाऱ्या कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फडणवीसांना सांगितलं आहे. याशिवाय महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना दुरध्वनीद्वारे दिली आहे.

12:57 IST
 • इतर देशांच्या तुलनेत भारताला आंतरराष्ट्रीय मंदीचा फार कमी फटका बसला आहे, असे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
11:29 IST

Sharad Pawar on Maharashtra Karnataka border Dispute: महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांनी गुजरात व कर्नाटकात विलीन होण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर शरद पवार यांनी आज भाष्य केलं.

Sharad Pawar
Sharad Pawar (PTI)

Sharad Pawar: राज्यातील काही गावांची गुजरात, कर्नाटकात जाण्याची भूमिका; शरद पवार म्हणाले…

06 December 2022, 11:29 ISTGanesh Pandurang Kadam
06 December 2022, 16:59 IST

Sharad Pawar on Maharashtra Karnataka border Dispute: महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांनी गुजरात व कर्नाटकात विलीन होण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर शरद पवार यांनी आज भाष्य केलं.

Sharad Pawar on Maharashtra Karnataka border Dispute: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला आहे. त्यातच नाशिक, सांगली व सोलापूरच्या सीमेवरील काही गावांनी कर्नाटक व गुजरातमध्ये विलीन होण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महत्त्वाचं विधान केलं.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी सर्वप्रथम निषेध केला. सीमाभागात सध्या जे काही सुरू आहे, त्यावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकशी संपर्क साधला असं त्यांनी स्वत:च मला सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. त्यामुळं आता माझ्यासह काही नेत्यांना बेळगावात जावं लागेल, असंही ते म्हणाले.

सोलापूर, सांगली व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील काही गावांनी अलीकडंच आपल्या समस्यांचा पाढा वाचत कर्नाटक व गुजरातमध्ये विलीन होण्याचे ठराव मंजूर केले आहेत. त्यामुळं कर्नाटकला आयतं कोलीत मिळालं असून राज्य सरकारची कोंडी झाली आहे. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, 'सोलापूर, नाशिक आणि जतमध्ये जे झालं, हे आत्ताच का झालं असं प्रश्न मलाही आहे. मी सोलापूर जिल्ह्याचा सात ते आठ वर्षे पालकमंत्री होतो. मला तिकडची इत्यंभूत माहिती आहे. माझ्या पालकमंत्री पदाच्या काळात या भागातील कुणीही असे प्रश्न मांडले नव्हते. आता कुणीतरी जाणीवपूर्वक त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करतंय आणि राज्य सरकार बघ्याची भूमिका घेतंय. अर्थात, या भागातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या समजावून घेता येतील व त्यातून मार्ग काढता येऊ शकतो, असंही ते म्हणाले.

राज्य सरकारला किती गांभीर्य आहे, ते दिसतंच आहे!

सीमाप्रश्नावर समन्वयासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं चंद्रकांत पाटील व शंभुराजे देसाई यांची नेमणूक केली होती. हे दोन्ही मंत्री बेळगावात जाऊन तेथील मराठी भाषिकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार होते. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी न येण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी अचानक हा दौरा रद्द केला. त्यासाठी कायदा सुव्यवस्था व महापरिनिर्वाण दिनाचं कारण देण्यात आलं. याबाबतही शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, 'हा राज्य सरकारचा निर्णय होता. बेळगावात मंत्र्यांना पाठवण्याबाबत आमच्याशी चर्चा झाली नव्हती. सर्वसाधारणपणे आतापर्यंतची सरकारं सीमाप्रश्नावर सगळ्यांना विश्वासात घेऊन पावलं टाकत होती. मात्र, आताचे निर्णय हे शिंदे-फडणवीस सरकारचे आहेत. त्यात आमचा सहभाग नव्हता. घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी त्यांनी केली नाही यातून या प्रश्नाकडं बघण्याचं त्यांचं गांभीर्य दिसून येतं, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.

11:41 IST
 • Aryaveer Sehwag, Virender Sehwag Son: टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला दिल्ली संघात संधी मिळाली आहे. अंडर १६ विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
Aryaveer Sehwag
Aryaveer Sehwag

Virender Sehwag Son: वीरेंद्र सेहवागच्या मुलाची प्रोफेशनल क्रिकेटमध्ये एन्ट्री, 'या' संघात झाली निवड

06 December 2022, 11:41 ISTRohit Bibhishan Jetnavare
06 December 2022, 17:11 IST
 • Aryaveer Sehwag, Virender Sehwag Son: टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला दिल्ली संघात संधी मिळाली आहे. अंडर १६ विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

वीरेंद्र सेहवागच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सेहवागच्या मुलाने आता प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे.वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागची बीसीसीआयने आयोजित केलेल्या अंडर-१६ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड झाली आहे. १५ वर्षांचा आर्यवीर आता आपल्या वडिलांप्रमाणेच क्रिकेट विश्वात थैमान घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीचा संघ सध्या बिहारविरुद्ध सामना खेळत आहे. मात्र या सामन्यात आर्यवीरला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळालेले नाही. पण त्याची एंट्री आता मोठ्या स्तरावर झाली आहे. अशा प्रकारे चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानावर वीरेंद्र सेहवागची झलक पाहायला मिळू शकते.

अंडर-१६ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघ:

अर्णव बग्गा (कर्णधार), सार्थक रे, प्रणव, सचिन, अनिंदो, श्रेय सेठी (विकेटकीपर), प्रियांशू, लक्ष्मण, उद्धव मोहन, ध्रुव, किरीट कौशिक, नैतिक माथूर, शंतनू यादव, मोहक कुमार, आर्यवीर सेहवाग

दरम्यान, आर्यवीर सेहवागच्या इंस्टाग्रामवर त्याच्या फलंदाजीचे अनेक व्हिडिओ आहेत. यामध्ये तो त्याचे वडील वीरेंद्र सेहवागप्रमाणेच स्टान्स घेताना दिसत आहे. तसेच. वीरूप्रमाणेच नेटमध्ये गोलंदाजांची धुलाई करताना दिसत आहे.

वीरेंद्र सेहवागचे क्रिकेट करिअर

वीरेंद्र सेहवागच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तो केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांमध्ये गणला जातो. सेहवागने भारतासाठी १०४ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ५० च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. तसेच, वीरेंद्र सेहवागने १५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या दरम्यान त्याने ३५ च्या सरासरीने ८२७३ धावा केल्या आहेत.

13:41 IST

Sharad Pawar warns Basavaraj Bommai : बेळगावात कानडी गुंडांनी महाराष्ट्रातील वाहनांवर केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या चिथावणीमुळं हा वाद वाढला आहे. हा सगळा हिंसाचार येत्या २४ ते ४८ तासांत थांबला नाही तर माझ्यासह सर्वच नेते बेळगावला जातील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

10:48 IST
 • Ajinkya Rahane baby boy name Raghav Rahane: भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे काही महिन्यांपूर्वीच एका मुलाचा पिता झाला आहे. रहाणेने याआधीच आपल्या चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली होती, मात्र आता त्याने आपल्या मुलाची पहिली झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जिंक्सची पत्नी राधिका धोपावकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून तिच्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने आपल्या मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे.