मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड

अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 27, 2024 11:40 AM IST

अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची मोठी संधी मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम किंमत मोजावी लागणार आहे. ही संधी नेमकी काय आहे चला जाणून घेऊया..

अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचे? मग मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचे? मग मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड

बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन ओळखले जातात. गेल्या काही दशकांपासून ते बॉलिवूडवर राज्य करत आहेत. त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. अमिताभ यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. आता अमिताभ यांचे शेजारी होण्याची संधी मिळणार आहे. पण त्यासाठी मोठी किंमत देखील मोजावी लागणार आहे. त्यामुळे नेमकी भानगड काय आहे? चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण १५७८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते पत्नी जया बच्चन आणि मुलांसोबत मुंबईतील जुहू परिसरातील जलसा बंगल्यात राहातात. दर रविवारी बिग बी चाहत्यांना भेटण्यासाठी जलसाबाहेर येताना दिसतात. त्यांचा हा बंगला १०१२५ स्क्वेअर फूटांमध्ये आहे. या बंगल्याची आजची किंमत ही १०० ते १२० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला जातो.
वाचा: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान

अमिताभ यांच्या शेजारी असलेल्या बंगल्याचा होणार लिलाव

'मनीकंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्याशेजारी असलेला एक बंगला विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या बंगल्याचा डॉयचे बँकेने २५ कोटी रुपयांना लिवाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची इएमडी रुपये २ कोटी ५० लाख रुपये असणार आहे. बँक नेहमी लिलाव करताना एखाद्या मालमत्तेची किंमत ही बाजार भावापेक्षा कमी ठेवते. त्यामुळे या बंगल्याची किंमत ३५ ते ४० कोटी रुपये आहे. आता हा बंगला कोण आणि किती रुपयांना विकत घेणार हे येत्या काळात समोर येईल.
वाचा: ट्रेंडमध्ये असलेले 'गुलाबी साडी' हे गाणे कोणी गायले आणि कसे सुचले माहिती आहे का? जाणून घ्या

बिग बींच्या जलसाविषयी

अमिताभ बच्चन हे त्यांच्या ब्लॉगमध्ये नेहमीच जलसा बंगल्याविषयी बोलताना दिसतात. हा बंगला त्यांच्या अगदी जवळचा असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या प्रशस्त बंगल्यातील त्यांची रेकोर्डिंग रुम ही सर्वात आवडीची जागा आहे. या खोतील संगीतातील सप्तस्वराचा एक वेगळा अनुभव मिळतो असे ते एकदा म्हणाले होते. आता जलसा बंगल्या शेजारील बंगल्याचा लिलाव होत असल्यामुळे सर्वजण खूश झाले आहेत. या बंगल्यात कोण राहायला येणार हे जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: थिएटरमधील चित्रपटात आता जाहिरातींचा अडथळा नाही! पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय; काय आहे कारण?

IPL_Entry_Point