सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या 'गुलाबी साडी' या गाण्याला तर अक्षरश: डोक्यावर उचलून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या आजींपर्यंत सर्वांनाच या गाण्याने वेड लावले आहे. पण हे गाणे गायले कोणी आहे? या गाण्याची कल्पना कशी सुचली याबाबत सगळी माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया..
'गुलाबी साडी' हे गाणे फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४च्या मंचावर सादर करण्यात आले होते. हे गाणे गायक संजू राठोडने गायले असून त्यानेच ते लिहिले आहे. या गाण्याची क्रेझ सातासमुद्रापार देखील पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल आणि हुकस्टेप्स अनेक कलाकार देखील करताना दिसत आहेत. पण संजूला हे गाणे कसे सुचले? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. त्याने नुकताच यावर भाष्य केले आहे.
वाचा: गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
संजूने नुकताच सकाळ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी गुलाबी साडी हे गाणे कसे सुचले याविषयी माहिती दिली आहे. 'गुलाबी साडी हे गाणे मी दिवाळीच्या दिवशी सकाळी लिहिले होते. माझ्या डोक्यात एकच प्रश्न सुरु होता काय करायचे? तेव्हा काही कारणांमुळे मी दिवाळीला घरी देखील गेलो नव्हतो. मग घरी बसून काय करायचे असा प्रश्न मला पडला होता. तेव्हा वाटू लागले की नवीन काहीतरी शोधूयला हवे. तेव्हा वाटले की प्रेमाचा रंग हा गुलाबी असतो आणि नऊवारी साडी हे गाणे होतेच. मग नऊवारी साडीचा सिक्वेल आहे तर त्याच्याशीच संबंधित गाणे तयार करायला हवे. म्हणून मग मी गुलाबी साडी हे गाणे तयार केले' असे संजू म्हणाला.
वाचा: ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट सिनेमातून पदार्पण करणाऱ्या वरुण धवन याच्याकडे एकूण किती संपत्ती?
'गुलाबी साडी' या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर संजू राठोरडे आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्याच्या या नव्या गाण्याचे नाव 'Bride तुझी नवरी' असे आहे. या गाण्यात 'लागीर झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि डान्सर वैष्णवी पाटील आहे. संजू राठोरच्या या नव्या रॅप साँगने सर्वांची बोलती बंद झाली आहे.
वाचा: 'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा
संबंधित बातम्या