इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६८ वा सामना आज (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ १९७ धावाच करू शकला.
या विजयासह आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. प्रथम खेळताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला ७ विकेट्सवर केवळ १९१ धावा करता आल्या.
आरसीबीने सीएसकेला २११ धावांचे लक्ष्य दिले होते, पण सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान २०१ धावा करायच्या होत्या, परंतु यश दयालने शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करत आरसीबीचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला.
यश दयालने शेवटच्या षटकात एमएस धोनीला बाद केले आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी CSK ला आवश्यक धावा (१७) करू दिल्या नाहीत.
पहिला चेंडू- ६ धावा (षटकार) (महेंद्रसिंह धोनी)
दुसरा चेंडू- विकेट (महेंद्रसिंह धोनी)
तिसरा चेंडू- ०० (शार्दुल ठाकूर)
चौथा चेंडू- १ धाव (शार्दुल ठाकूर)
पाचवा चेंडू- ०० धावा (रवींद्र जडेजा)
सहावा चेंडू- ०० धावा (रवींद्र जडेजा)
१९ षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या ६ विकेटवर १८४ धावा आहे. चेन्नईला विजयासाठी ६ चेंडूत ३५ धावा करायच्या आहेत आणि प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी १७ धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा २० चेंडूत ४२ आणि एमएस धोनी ११ चेंडूत १९ धावांवर खेळत आहेत.
१८ षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या ६ गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा आहे. चेन्नईला विजयासाठी १३ चेंडूत ५३ धावा करायच्या आहेत आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी ३५ धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा १७ चेंडूत ३१ तर एमएस धोनी ७ चेंडूत १३ धावांवर खेळत आहे.
चेन्नई सुपर किंग्जने १३व्या षटकात ११५ धावांवर चौथी विकेट गमावली. रचिन रवींद्र ३७ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. आता सामना चेन्नईच्या हातातून निसटला आहे. शिवम दुबेही आपल्या लयीत दिसत नाही.
चेन्नई सुपर किंग्जने १०व्या षटकात ८५ धावांवर तिसरी विकेट गमावली. अजिंक्य रहाणे २२ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि एक षटकार आला. रहाणेला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले.
पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावून चेन्नईने ५८ धावा केल्या आहेत. सध्या रचिन रवींद्र (२३) आणि अजिंक्य रहाणे (२२) क्रीजवर आहेत. दोघांमध्ये चांगली भागीदारी आहे.
चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला. डावाच्या तिसऱ्या षटकात मिशेलला यश दयालने झेलबाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मिचेलने ६ चेंडूत ४ धावा केल्या. आता अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला आहे. ३ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या २६/२ आहे.
डावाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपाने चेन्नई सुपर किंग्जने पहिली विकेट गमावली. बेंगळुरूसाठी डावाचे पहिले षटक टाकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने गायकवाडला शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता डॅरिल मिशेल फलंदाजीला आला आहे.
करा किंवा मरो या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ४ गडी गमावून २१८ धावा केल्या. आता आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला २०० धावांच्या आत मर्यादित ठेवावे लागेल. आरसीबीसाठी विराट कोहलीने २९ चेंडूत ४७ धावा, फाफ डू प्लेसिसने ३९ चेंडूत ५४ धावा, रजत पाटीदारने २३ चेंडूत ४१ धावा आणि कॅमेरून ग्रीनने १७ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. मिचेल सँटनर वगळता चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाने धावा भरपूर दिल्या.
शार्दुल ठाकूरने १७वे षटक टाकले. या षटकात दोन षटकार मारले गेले. १७ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा आहे. रजत पाटीदार २२ चेंडूत ४१ धावांवर खेळत आहे. त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत. कॅमेरून ग्रीन १२ चेंडूत २३ धावांवर खेळत आहे. त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला आहे.
डुप्लेसिसने या सामन्यातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. त्याने अवघ्या ३५ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ३७वे अर्धशतक झळकावले. तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी रजत पाटीदार त्याला साथ देत आहेत. त्याची बॅटही जोरदार गर्जना करत आहे. १२ षटकांनंतर संघाची धावसंख्या १०८/१ आहे.
बंगळुरूची पहिली विकेट १०व्या षटकात ७८ धावांवर पडली. विराट कोहली २९ चेंडूत ४७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ४ षटकार आले. मिचेल सँटनरच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात किंग कोहली झेलबाद झाला.
पॉवरप्ले संपला आणि आरसीबीचा स्कोअर ४२/० आहे. पावसानंतर विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस विकेटवर संघर्ष करताना दिसत आहेत. दोघांनी पहिल्या तीन षटकात ३१ धावा केल्या होत्या. मात्र, पॉवरप्लेची शेवटची तीन षटके त्यांच्यासाठी चांगली नव्हती. यामध्ये केवळ ११ धावा करता आल्या.
शार्दुल ठाकूरने दुसरे षटक टाकले. या षटकात दोन चौकार आणि एक षटकार आला. विराटने पहिला चौकार मारला. त्यानंतर फॅफने एक चौकार आणि एक षटकार मारला. दोन षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या एकही विकेट न पडता १८ धावा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महिष थेक्षाना.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
या सामन्यात आपला संघ एका बदलाने खेळताना दिसणार असल्याचे कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी सांगितले. मोईन अलीच्या जागी मिचेल सँटनरला संधी मिळाली आहे. तर आरसीबी कोणताही बदल न करता खेळताना दिसेल.
संबंधित बातम्या