आयपीएल-२०२४ चा मेगा सामना शनिवारी (१८ मे) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या वर्षी प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ कोणता असेल, हे या सामन्यातून ठरवले जाईल. गत विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे संघ या सामन्यात आमनेसामने येणार असून या सामन्याकडे एकप्रकारे बाद फेरीचा सामना म्हणून पाहिले जात आहे.
प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नईला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. तर आरसीबीला हा सामना १८ षटकांत किंवा चेन्नईने दिलेले लक्ष्य १८.५ षटकांत गाठावे लागेल, तरच हा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकेल.
या सामन्यासाठी दोन्ही संघांसोबतच सर्व चाहते सज्ज झाले आहेत, पण आयपीएलमधील शेवटचे काही सामने पावसामुळे रद्द झाले होते आणि त्यामुळेच हा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची भीती चाहत्यांना आहे. जर आपण सामन्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी बेंगळुरूचे हवामान पाहिले तर संध्याकाळी पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय ७.२ मिमी पावसाची शक्यता आहे.
अशा स्थितीत पावसामुळे खेळ खराब होण्याची भीती आहे. पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर काय होणार, असाही प्रश्न चाहत्यांच्या मनात असेल. अशा स्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या एका गुणासह चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल आणि आरसीबी बाहेर पडेल.
आरसीबीने या मोसमाची सुरुवात चांगली केली नाही पण नंतर या संघाने वेग पकडला आणि अजूनही सातत्याने सामने जिंकून प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यांच्या स्टार फलंदाज विराट कोहलीकडून संघाला सर्वाधिक अपेक्षा असतील.
आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, स्वप्नील सिंग.
सीएसकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.