मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs CSK Head to Head : आज आरसीबी-सीएसके थरार रंगणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या

RCB vs CSK Head to Head : आज आरसीबी-सीएसके थरार रंगणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 18, 2024 11:26 AM IST

rcb vs csk head to head : आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि सीएसकेचे संघ एकूण ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी आरसीबीने १० सामने जिंकले आहेत, तर सीएसकेने २१ सामने जिंकले आहेत.

 RCB vs CSK Head to Head : आज आरसीबी-सीएसके थरार रंगणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या
RCB vs CSK Head to Head : आज आरसीबी-सीएसके थरार रंगणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या (AFP)

आयपीएल २०२४ मधील सर्वात मोठा सामना शनिवारी (१८ मे) रंगणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल, जो बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांचा हा शेवटचा साखळी सामना आहे. पण हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे कारण या सामन्यानंतर प्लेऑफमधला चौथा संघ कोणता असेल हे ठरणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, सामना सुरू होण्याआधी तुम्हाला कळले पाहिजे की इथली खेळपट्टी कशी आहे आणि हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने आले आहे तेव्हा काय घडले आहे.

आरसीबी वि सीएसके हेड टू हेड

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि सीएसकेचे संघ एकूण ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी आरसीबीने १० सामने जिंकले आहेत, तर सीएसकेने २१ सामने जिंकले आहेत. एक सामना असाही होता ज्यात निकाल लावता आला नाही. म्हणजेच या दृष्टिकोनातून सीएसकेचा वरचष्मा आहे. पण हा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. आरसीबी संघ आपल्या घरच्या मैदानावर वेगळ्या शैलीत खेळतो.

विशेष म्हणजे, आरसीबी आणि सीएसके यंदा दुसऱ्यांदा भिडणार आहेत. यावर्षीच्या पहिल्या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा पराभव केला होता.

आरसीबी वि सीएसके पीच रिपोर्ट

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. येथे फलंदाज खूप धावा करतात. या वेळीही असेच काहीसे घडताना दिसत आहे. हे छोटेसे मैदान आहे, त्यामुळे फलंदाजांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. या वर्षी येथे झालेल्या सर्व आयपीएल सामन्यांमध्ये २०० हून अधिकचा स्कोअर अनेकदा पाहिला गेला आहे, यावेळीही हाय स्कोअरिंग सामना झाला तर आश्चर्य वाटणार नाही.

असं असलं तरी, दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाजांची फौज आहे, ज्यांच्याकडे सामन्याचा निकाल कधीही बदलण्याची क्षमता आहे. एकंदरीतच हा सामना अतिशय रंजक आणि उत्कंठावर्धक असेल, त्याची शक्यता खूप जास्त आहे.

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, स्वप्नील सिंग.

सीएसकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.

टी-२० वर्ल्डकप २०२४