मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs CSK Dream 11 Prediction : आज धोनी-कोहली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

RCB vs CSK Dream 11 Prediction : आज धोनी-कोहली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

May 18, 2024 01:57 PM IST

RCB vs CSK Dream 11 Prediction : आरसीबी विरुद्ध सीएसके सामना आभासी नॉकआउट सामना मानला जात आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर सीएसकेला १८ धावांनी पराभूत करावे लागेल.

RCB vs CSK Dream 11 Prediction : आज धोनी-कोहली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
RCB vs CSK Dream 11 Prediction : आज धोनी-कोहली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम (AFP)

आयपीएल २०२४ चा ६८ वा सामना शनिवारी (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या सामन्यानंतर चालू मोसमात प्लेऑफसाठी चौथा संघ मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना आभासी नॉकआउट सामना मानला जात आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर सीएसकेला १८ धावांनी पराभूत करावे लागेल. तसेच, आरसीबीने नंतर फलंदाजी केल्यास त्यांना १८.१ षटकांपूर्वी लक्ष्य गाठावे लागेल. 

त्याचवेळी सीएसकेसाठी प्लेऑफचा मार्ग सोपा झाला आहे. जर सीएसकेने एकतर सामना जिंकला किंवा आरसीबीला थोड्या फरकाने जिंकू दिले, तर दोन्ही बाबतीत ते अंतिम-चार मध्ये पोहोचतील.

या हाय व्होल्टेज मॅचची लाईव्ह ॲक्शन संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे. तसे पाहता या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आरसीबी असो की सीएसके, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

RCB vs CSK Dream 11 Prediction

यष्टिरक्षक – दिनेश कार्तिक

फलंदाज – रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), विराट कोहली (कर्णधार), शिवम दुबे, फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदार.

अष्टपैलू - रवींद्र जडेजा, कॅमेरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल.

गोलंदाज - तुषार देशपांडे आणि यश दयाल.

बेंगळुरूचं हवामान कसे असेल?

या सामन्यासाठी दोन्ही संघांसोबतच सर्व चाहते सज्ज झाले आहेत, पण आयपीएलमधील शेवटचे काही सामने पावसामुळे रद्द झाले होते आणि त्यामुळेच हा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची भीती चाहत्यांना आहे. जर आपण सामन्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी बेंगळुरूचे हवामान पाहिले तर संध्याकाळी पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय ७.२ मिमी पावसाची शक्यता आहे.

पाऊस पडला तर काय होईल?

अशा स्थितीत पावसामुळे खेळ खराब होण्याची भीती आहे. पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर काय होणार, असाही प्रश्न चाहत्यांच्या मनात असेल. अशा स्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या एका गुणासह चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल आणि आरसीबी बाहेर पडेल.

टी-२० वर्ल्डकप २०२४