मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : रोहित मुंबई सोडून कुठेही जाणार नाही? नीता अंबानी यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma : रोहित मुंबई सोडून कुठेही जाणार नाही? नीता अंबानी यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल

May 18, 2024 02:39 PM IST

Rohit Sharma MI vs LSG : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर हार्दिक पंड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर मुंबई संघात अनेक बदल पाहायला मिळाले.

Rohit Sharma : रोहित मुंबई सोडून कुठेही जाणार नाही? नीता अंबानी यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल
Rohit Sharma : रोहित मुंबई सोडून कुठेही जाणार नाही? नीता अंबानी यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma and Nita Ambani : आयपीएल २०२४ मध्ये शुक्रवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सने त्यांचा शेवटचा सामना खेळला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबईचा १८ धावांनी धुव्वा उडवला. अशा प्रकारे मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधील शेवट पराभवाने झाला.

ट्रेंडिंग न्यूज

गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर राहिला. मुंबईने या मोसमासाठी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते. रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर बरेच काही बदलले.

पण लखनऊ आणि मुंबई यांच्यातील सामन्यानंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांच्याशी बोलताना दिसला.

वास्तविक X वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबईचा माजी कर्णधार रोहित आणि नीता अंबानी बोलताना दिसत आहेत. या दोघांमध्ये काय बोलणे सुरू आहे हे सांगता येत नाही.

पण काही चाहत्यांनी X वर कमेंट आणि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रोहित मुंबई इंडियन्स सोडणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, याआधीही रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो संघातील सध्याच्या परिस्थितीवर बोलत होता. या व्हिडिओवरून बरीच चर्चादेखील झाली होती. तसेच, रोहित आणि पांड्याचे संबंध चांगले नसल्याचा दावा करण्यात आला होता. सहकारी खेळाडूंना पंड्याची कर्णधारपदाची शैली आवडत नाही.

पंड्या गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी केली. मात्र तो मुंबईसाठी विशेष काही करू शकला नाही. पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने आयपीएल २०२४ चे १४ सामने खेळले. यात त्यांनी केवळ ४ सामने जिंकले आणि १० सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई पॉइंट टेबलमध्ये तळाच्या स्थानावर आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४