मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 24, 2024 10:12 AM IST

निलेश साबळेने नुकताच एका मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी त्याने राज ठाकरे यांच्या मिमिक्रीचा उल्लेख केला आहे.

'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा
'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे डॉ. निलेश साबळे. त्याने या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन अशी तिहेरी जबाबदारी पार पाडली. पण काही दिवसांपूर्वी त्याने हा कार्यक्रम सोडला आणि नवा एका शोची घोषणा केली. निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’ला रामराम ठोकताच शो बंद करण्यात आला. आता निलेशने एका मुलाखतीमध्ये मजेशीर किस्से सांगितले आहेत.

निलेश साबळेने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला किस्सा सांगितला आहे. त्याने पुढे सांगितले की राज ठाकरे यांची अनेकदा मिमिक्री केली आहे. ती पाहून त्यांची प्रतिक्रिया कशी होती हे देखील सांगितले आहे. चला जाणून घेऊया निलेशने राज ठाकरे यांचा कोणता किस्सा सांगितला आहे...
वाचा: 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

दोन ते तीन वेळा झाली साहेबांची भेट

“राजसाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहेत आणि त्यांना मी दोन ते तीन वेळा भेटलो. त्यांना भेटता आले हे माझे भाग्यच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमला त्यांनी एकदा बोलावले होते. त्यानंतरही त्यांना एकदा-दोनदा भेटण्याचा योग आला होता. मध्यतंरी ते नवीन घरात राहायला गेले होते. तेव्हा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना भेटलो होतो” असे निलेश म्हणाला.
वाचा: चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिका…”

राज ठाकरेंची केली होती मिमिक्री

पुढे तो म्हणाला, “राज ठाकरे हे निश्चितच खूप चांगले राजकारणी आहेत. परंतु, एक कलाकार म्हणून जेव्हा त्यांना आम्हाला भेटण्याची संधी मिळते तेव्हा, ते सगळे बाजूला सारून एक कलाकार म्हणून ते आमची भेट घेतात. ते नेहमीच अगदी मित्रासारखे गप्पा मारतात हे आमचे भाग्य आहे. माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर ते आतापर्यंत कधीच चिडले नाहीत. त्यांनी नेहमीच माझे कौतुक केले आहे. कारण, ते स्वत: एक व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्याप्रमाणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा व्यंग चित्रकार होते. त्यांचेही प्रत्येक कलाकाराशी एक वेगळे नाते होते. राजसाहेबांचे सुद्धा तसेच काहीसे आहे. त्यांना कलाकारांची चांगली जाण असल्याने मला नाही वाटत ते भविष्यातही कधी मिमिक्री केल्यावर चिडतील.”
वाचा: 'प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात', डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

IPL_Entry_Point