आयपीएल २०२४ चा ५३वा सामना (५ मे) पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर होणार आहे. या मोसमात पहिल्यांदाच धर्मशाला येथे सामना खेळवला जात आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ येथील परिस्थितीसाठी पूर्णपणे नवीन आहेत.
विशेष म्हणजे, पंजाब आणि सीएसके यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील याआधीचा सामना पंजाब किंग्सने जिंकला होता. त्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ७ विकेट्सने पराभव झाला होता.
या स्पर्धेत या दोन्ही संघांनी आतापर्यंत १०-१० सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत त्यांच्या १० पैकी ५ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे आणि सध्या गुणतालिकेत ५व्या स्थानावर आहे, त्यांचे १० गुण आहेत आणि नेट रनरेट +०.६२७ आहे.
दुसरीकडे, पंजाब किंग्जचे ८ गुण आणि -०.०६२ इतका नेट रनरेट आहे. पंजाब गुणतालिकेत ८ व्या स्थानावर आहे.
पंजाब आणि सीएसके आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २९ वेळा आमनेसामने आले आहेत, चेन्नई सुपर किंग्जने १५ सामने जिंकले आहेत तर पंजाब किंग्जने १४ सामने जिंकले आहेत. रविवारी त्यांच्यात आणखी चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंजाब असो की सीएसके, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक: जॉनी बेअरस्टो (उपकर्णधार)
फलंदाज: शशांक सिंग, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, डॅरिल मिशेल
अष्टपैलू: सॅम करन, मोईन अली, रवींद्र जडेजा
गोलंदाज: कागिसो रवाडा, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल
धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी तुम्ही तुमच्या फॅन्टसी संघात कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची निवड करावी. कर्णधारासाठी तुम्ही ऋतुराज गायकवाडसोबत जाऊ शकता.
गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये असून चेन्नई सुपर किंग्जसाठी तो सातत्याने धावा करत आहे. सध्या तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आघाडीवर आहे.
गायकवाडने या मालिकेत आतापर्यंत १० सामन्यांत ५०९ धावा केल्या आहेत. उपकर्णधारपदासाठी तुम्ही पंजाब किंग्जचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोसोबत जाऊ शकता. त्याने ८ सामन्यात १६५.५६ च्या स्ट्राईक रेटने २५० धावा केल्या आहेत.