आयपीएल २०२४ च्या ६७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स भिडणार आहेत. दोन्ही संघ शुक्रवारी (१७ मे) वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येतील. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत. असा स्थितीत दोन्ही संघांना विजयाने यंदाच्या मोसमाला अलविदा करायचा आहे.
लखनौ सुपर जायंट्सचे १३ सामन्यांत १२ गुण आहेत. संघाचा नेट रनरेटही मायनसमध्ये आहे. प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचे अशक्यप्राय आव्हान त्यांच्यासमोर आहे. लखनौ सुपर जायंट्सला मुंबईविरुद्ध ४०० धावांनी विजय मिळवावा लागेल जो टी-20 क्रिकेटमध्ये अशक्य आहे.
त्याचवेळी मुंबई इंडियन्ससाठी हा मोसम दुःस्वप्नसारखा ठरला आहे. संघाने १३ पैकी केवळ ४ सामने जिंकले आहेत तर ९ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावर आहे. मुंबईविरुद्ध लखनौ हे फेव्हरिट राहिले असून त्यांनी आतापर्यंत ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत.
दरम्यान, मुंबई असो की लखनौ, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक: केएल राहुल, इशान किशन
फलंदाज: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा
अष्टपैलू: हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस (उपकर्णधार)
गोलंदाज: जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, मोहसिन खान
संबंधित बातम्या