RCB vs CSK : एका मिनिटात हजारो लिटर पाणी गायब होणार, पाऊस आला तरी आरसीबी-सीएसके सामना होणारच!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs CSK : एका मिनिटात हजारो लिटर पाणी गायब होणार, पाऊस आला तरी आरसीबी-सीएसके सामना होणारच!

RCB vs CSK : एका मिनिटात हजारो लिटर पाणी गायब होणार, पाऊस आला तरी आरसीबी-सीएसके सामना होणारच!

May 17, 2024 05:01 PM IST

RCB vs CSK IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था चांगली आहे. पाऊस पडला तर फारशी अडचण येणार नाही.

RCB vs CSK : एका मिनिटात हजारो लिटर पाणी गायब होणार, पाऊस आला तरी आरसीबी-सीएसके सामना होणारच!
RCB vs CSK : एका मिनिटात हजारो लिटर पाणी गायब होणार, पाऊस आला तरी आरसीबी-सीएसके सामना होणारच! (AFP)

RCB vs CSK IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी ३ संघ ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता एका संघाची प्रतीक्षा आहे.

आयपीएल २०२४ चा ६८ वा सामना शनिवारी (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यानंतर, आयपीएल २०२४ सीझनला प्लेऑफचा चौथा संघ मिळेल.

अशा स्थितीत RCB आणि CSK यांच्यातील सामन्याला नॉकआउट सामन्याचे वळण आले आहे. जो संघ विजेता होईल त्याला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. तर हरणारा संघ बाहेर पडेल.

दरम्यान,  चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. अशा स्थितीत चाहत्यांची मजा किरकीरी होऊ शकते. तसेच, आरसीबीलादेखील मोठा धक्का बसू शकतो. पण एक चांगली गोष्ट म्हणजे हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे आणि इथली ड्रेनेज (chinnaswamy stadium drainage system)  व्यवस्था खूपच मजबूत आहे.

प्रत्यक्षात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यानंतर काही क्षणातच पाणी आटत असल्याचे दिसून येत आहे. 

आता या व्हिडिओवर विश्वास ठेवला तर पावसाचा आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्यावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र अनेक तास मुसळधार पाऊस पडल्यास अडचण येऊ शकते.

एक मिनिटात १० हजार लिटर पाणी काढता येणार

क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, एका अमेरिकन कंपनीने एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सबसर्फेस एरेशन सिस्टम बसवले आहे. याद्वारे मैदानात साचलेले हजारो लिटर पाणी एक मिनिटात काढता येते. ड्रेनेज व्यवस्थेमुळे या स्टेडियममध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र ही यंत्रणा २०१७ नंतर बसवण्यात आली. यानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस पडला तर मैदान कमी वेळात खेळण्यायोग्य बनवता येईल.

आरसीबी सीएसके यांच्यात तगडी झुंज

विराट कोहलीची टीम आरसीबीने आयपीएल २०२४ मध्ये १३ सामने खेळले आहेत. यातील संघाने ६ सामने जिंकले असून ७ सामने गमावले आहेत. त्यांचे १२ गुण आहेत. सीएसकेविरुद्धच्या याआधीच्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला होता. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला होता. आता आरसीबी आणि सीएसके यंदा दुसऱ्यांदा भिडणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या