मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI Vs LSG IPL Highlights : मुंबई इंडिन्सचा शेवट पराभवाने, लखनौने १८ धावांनी उडवला धुव्वा

MI Vs LSG IPL Highlights : मुंबई इंडिन्सचा शेवट पराभवाने, लखनौने १८ धावांनी उडवला धुव्वा

May 18, 2024 12:28 AM IST

MI Vs LSG IPL Highlights : आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनौने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला.

Mumbai Indians Vs Lucknow Super Giants Today Match
Mumbai Indians Vs Lucknow Super Giants Today Match (PTI)

आयपीएल २०२४ मध्ये आज (१८ मे) मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने मुंबईचा १८ धावांनी धुव्वा उडवला. अशा प्रकारे मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधील शेवट पराभवाने झाला.

ट्रेंडिंग न्यूज

लखनौने यजमान संघाला विजयासाठी २१५  धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना संघाला ६ विकेट्सवर १९६ धावाच करता आल्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली. सलामीला फलंदाजीला आलेले रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली होती, जी नवीन-उल-हकने मोडली. त्याने नवव्या षटकात डेवाल्ड ब्रेविसला बाद केले. त्याला २० चेंडूत २३ धावा करता आल्या.

यानंतर सूर्यकुमार यादव खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित शर्माने ६८ धावा केल्या. त्याने १७८.९४ च्या स्ट्राईक रेटने १० चौकार आणि ३ षटकार मारले.

या सामन्यात हार्दिक पांड्याने १६, नेहल वढेराने १ आणि इशान किशनने १४ धावा केल्या. नमन धीरने लखनौविरुद्ध स्फोटक कामगिरी केली. त्याने २६ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले. या सामन्यात तो ६२ धावा करून नाबाद राहिला. त्याने २२१ च्या स्ट्राईक रेटने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. रोमारियो शेफर्ड एक धाव करत नाबाद राहिला. 

लखनौकडून रवी बिश्नोई आणि नवीन-उलहाकने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर कृणाल पंड्या आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

लखनौचा डाव

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने ६ विकेट्सवर २१४ धावा केल्या होत्या. लखनौसाठी निकोलस पुरनने केवळ २९ चेंडूत ७५ धावा केल्या. पुरनने आपल्या खेळीत ८ षटकार आणि ५ चौकार लगावले. 

कर्णधार केएल राहुलनेही ४१ चेंडूत ५५ धावांची शानदार खेळी केली, ज्यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. पूरन आणि राहुल यांच्यात चौथ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी झाली. 

मार्कस स्टॉइनिसने २८ आणि आयुष बडोनीने २२ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून नुवान तुषारा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

टी-२० वर्ल्डकप २०२४