IPL 2024 Playoffs : सीएसकेला पराभूत करूनही RCB प्लेऑफमध्ये जाणार नाही, कसं?, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Playoffs : सीएसकेला पराभूत करूनही RCB प्लेऑफमध्ये जाणार नाही, कसं?, जाणून घ्या

IPL 2024 Playoffs : सीएसकेला पराभूत करूनही RCB प्लेऑफमध्ये जाणार नाही, कसं?, जाणून घ्या

Updated May 17, 2024 03:13 PM IST

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल २०२४ चा ६८ वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यानंतर आयपीएल २०२४ मधील प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ सापडेल.

IPL 2024 Playoffs : सीएसकेला पराभूत करूनही RCB प्लेऑफमध्ये जाणार नाही, कसं?, जाणून घ्या
IPL 2024 Playoffs : सीएसकेला पराभूत करूनही RCB प्लेऑफमध्ये जाणार नाही, कसं?, जाणून घ्या (AFP)

आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी ३ संघ ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आयपीएल २०२४ चा ६८ वा सामना शनिवारी (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

या हायव्होल्टेज सामन्यानंतर, आयपीएल २०२४ सीझनला प्लेऑफचा चौथा संघ मिळेल. 

अशा स्थितीत RCB आणि CSK यांच्यातील सामन्याला नॉकआउट सामन्याचे वळण आले आहे. जो संघ विजेता होईल त्याला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. तर हरणारा संघ बाहेर पडेल.

पण येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची समस्या वेगळ्या प्रकारची आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी अशा कोंडीत आहे की सीएसकेला पराभूत करूनही ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

वास्तविक,  जर आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांना सीएसकेला १८ धावांच्या फरकाने पराभूत करावे लागेल. पण जर RCB १७ किंवा त्यापेक्षा कमी धावांच्या फरकाने जिंकला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल कारण त्यांचा नेट रनरेट कमी आहे. जर आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग केला तर त्यांना सीएसकेविरुद्ध १८.१ षटकांपूर्वी लक्ष्य गाठावे लागेल.

RCB संघ ११ किंवा त्याहून अधिक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले तर ते बाहेर पडतील. त्याचवेळी, चेन्नई सुपर किंग्जला पात्र ठरायचे असेल तर त्यांना आरसीबीला पराभूत करावे लागेल. जर CSK हरला आणि त्यांच्या पराभवाचा फरक १८ पेक्षा कमी किंवा ११ चेंडूंपेक्षा कमी असेल, तर अशा परिस्थितीतही ते प्ले ऑफमध्ये जातील.

दोन्ही संघ कसे बाहेर पडतील?

बरं, आणखी एक समीकरण आहे. पण हे होणे फार कठीण आहे. परिस्थिती अशी आहे की RCB आणि CSK दोघेही पात्र बाहेर पडू शकतात. 

जर लखनौ सुपरजायंट्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना मोठ्या फरकाने ४०० धावांनी जिंकला तर त्यांचा नेट रनरेट आरसीबीपेक्षा चांगला होईल. त्यानंतर एलएसजीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी असेल. पण ही शक्यता जवळपास नाहीच्या बरोबर आहे. 

त्यानंतर लखनौला अशी प्रार्थना करावी लागेल, की आरसीबी-सीएसके यांच्यातील सामन्यात आरसीबीच्या विजयाचे अंतर १८ धावांपेक्षा कमी किंवा ११ चेंडू असले पाहिजे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या