मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs CSK : आरसीबी-सीएसके सामन्याची उत्सुकता शिगेला, दोन्ही संघांच्या चाहत्यांनी वातावरण तापवलं, जाणून घ्या

RCB vs CSK : आरसीबी-सीएसके सामन्याची उत्सुकता शिगेला, दोन्ही संघांच्या चाहत्यांनी वातावरण तापवलं, जाणून घ्या

May 17, 2024 08:19 PM IST

ipl 2024 memes on csk vs rcb match : आयपीएल २०२४ चा ६८ वा सामना शनिवारी (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यानंतर, आयपीएल २०२४ सीझनला प्लेऑफचा चौथा संघ मिळेल.

RCB vs CSK : आरसीबी-सीएसके सामन्याची उत्सुकता शिगेला, दोन्ही संघांच्या चाहत्यांनी वातावरण तापवलं, जाणून घ्या
RCB vs CSK : आरसीबी-सीएसके सामन्याची उत्सुकता शिगेला, दोन्ही संघांच्या चाहत्यांनी वातावरण तापवलं, जाणून घ्या (ANI )

RCB vs CSK IPL 2024 : आयपीएल-२०२४ आता शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी ३ संघ ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता एका संघाची प्रतीक्षा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएल २०२४ चा ६८ वा सामना शनिवारी (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यानंतर, आयपीएल २०२४ सीझनला प्लेऑफचा चौथा संघ मिळेल.

अशा स्थितीत RCB आणि CSK यांच्यातील सामन्याला नॉकआउट सामन्याचे वळण आले आहे. जो संघ विजेता होईल त्याला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. तर हरणारा संघ बाहेर पडेल.

अशा स्थितीत आरसीबी-सीएसके सामन्याकडे IPL-२०२४ मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा सामना म्हणून पाहिले जात आहे. चाहत्यांमध्येही याची उत्सुकता आहे आणि त्यामुळे या सामन्याबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे.

दोन्ही संघांचे चाहते वेगवेगळे आणि अप्रतिम मीम्स बनवत आहेत. चेन्नईचे चाहते आरसीबी आणि त्याच्या खेळाडूंची खिल्ली उडवत आहेत. तर आरसीबीचे चाहते चेन्नईची खिल्ली उडवत आहेत. सोशल मीडियावरील हे मीम युद्ध लोकांचे वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करत आहे.

आरसीबी-सीएसके सामन्यावर अप्रतिम मीम्स 

दोन्ही संघांचे चाहते अनेक प्रकारचे मीम्स बनवत आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि तारक मेहता का उल्टा चष्मा या चित्रपट-मालिकांच्या संवादांच्या आधारे हे मीम्स बनवले जात आहेत.

१८.१ षटकांपूर्वी किंवा १८ धावांनी सामना जिंकावा लागेल

जर आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांना सीएसकेला १८ धावांच्या फरकाने पराभूत करावे लागेल. पण जर RCB १७ किंवा त्यापेक्षा कमी धावांच्या फरकाने जिंकला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल कारण त्यांचा नेट रनरेट कमी आहे. जर आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग केला तर त्यांना सीएसकेविरुद्ध १८.१ षटकांपूर्वी लक्ष्य गाठावे लागेल.

RCB संघ ११ किंवा त्याहून अधिक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले तर ते बाहेर पडतील.

आरसीबी सीएसके यांच्यात तगडी झुंज

विराट कोहलीची टीम आरसीबीने आयपीएल २०२४ मध्ये १३ सामने खेळले आहेत. यातील संघाने ६ सामने जिंकले असून ७ सामने गमावले आहेत. त्यांचे १२ गुण आहेत. सीएसकेविरुद्धच्या याआधीच्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला होता. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला होता. आता आरसीबी आणि सीएसके यंदा दुसऱ्यांदा भिडणार आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४