Jay Shah : टी-20 वर्ल्ड कप २०२४ कोण जिंकणार? जय शाह यांनी घेतली 'या' ४ संघांची नावं, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jay Shah : टी-20 वर्ल्ड कप २०२४ कोण जिंकणार? जय शाह यांनी घेतली 'या' ४ संघांची नावं, जाणून घ्या

Jay Shah : टी-20 वर्ल्ड कप २०२४ कोण जिंकणार? जय शाह यांनी घेतली 'या' ४ संघांची नावं, जाणून घ्या

May 17, 2024 05:22 PM IST

Jay Shah On T20 World Cup 2024 :टीम इंडिया १७ वर्षांपासून टी-20 वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. भारताने २००७ मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता.

Jay Shah : टी-20 वर्ल्ड कप २०२४ कोण जिंकणार? जय शाह यांनी घेतली 'या' ४ संघांची नावं, जाणून घ्या
Jay Shah : टी-20 वर्ल्ड कप २०२४ कोण जिंकणार? जय शाह यांनी घेतली 'या' ४ संघांची नावं, जाणून घ्या

Jay Shah prediction Who Will Win T20 World Cup 2024 : सध्या भारतात आयपीएल २०२४ चा थरार सुरू आहे. ही स्पर्धा २६ मे रोजी संपेल. यानंतर लगेच टी-20 वर्ल्डकप २०२४ खेळला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सज्ज आहेत. ही स्पर्धा २ जूनपासून सुरू होत आहे. 

त्याच वेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर टीम इंडियाचा सामना ९ जूनला पाकिस्तानशी होणार आहे. 

दरम्यान, टीम इंडिया १७ वर्षांपासून टी-20 वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. भारताने २००७ मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता.

मात्र, यावेळी भारतीय संघ १७ वर्षांचा दुष्काळ संपवेल, अशी आशा सर्व चाहत्यांना आहे. अशातच आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-20 विश्वचषकात भारतीय संघ वर्ल्डकप ट्रॉफी जिंकणार का आणि ट्रॉफी जिंकण्याच्या टीम इंडियाच्या संभाव्यतेवर आपले मत मांडले आहे.

हे संघ वर्ल्डकप जिंकणार

एका वृत्तपत्राशी बोलताना जय शाह म्हणाले की, टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. याशिवाय जय शाह यांनी ३ संघांची नावे घेतली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाव्यतिरिक्त, जय शाह यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यजमान वेस्ट इंडिज या संघांना विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून सांगितले आहे.

या ४ संघांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी तगडी स्पर्धा होईल, असा विश्वास जय शहा यांनी व्यक्त केला. वेस्ट इंडिजने दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलियाने २०२१ चा टी२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर न्यूझीलंड पहिल्या टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीची वाट पाहत आहे.

टीम इंडिया ११ वर्षांचा दुष्काळ संपवणार?

नुकतेच टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती, पण ऑस्ट्रेलियाने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. 

भारतीय संघाने जवळपास ११ वर्षांपूर्वी शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती, जेव्हा भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ च्या फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत केले होते, परंतु तेव्हापासून टीम इंडियाला ICC ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे.

Whats_app_banner