About Us - https://marathi.hindustantimes.com

आमच्याबद्दल

कंपनी 9 जुलै 1918 रोजी भारतीय कंपनी कायदा, 1913 अंतर्गत ‘द बेहार जर्नल्स लिमिटेड’ ( Behar Journals Limited ) या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून स्थापन करण्यात आली. कंपनीला 14 जानेवारी 1919 रोजी व्यवसाय सुरू केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. 17 नोव्हेंबर 1987 रोजी कंपनीचे नाव ‘सर्चलाइट’ (Searchlight Publishing House Limited) या प्रकाशनाशी अधिक सुसंगत करण्यासाठी कंपनीचे नाव बदलून ‘सर्चलाइट पब्लिशिंग हाऊस लिमिटेड’ असे करण्यात आले. त्यानंतर, कंपनीचे नाव बदलून तिचे सध्याचे नाव ‘ Hindustan Media Ventures Ltd.’ असे करण्यात आले. कंपनीने हाती घेतलेल्या विस्तारित व्यावसायिक क्रियाकलापांना प्रतिबिंबित करण्यासाठी आणि प्रचलित उद्योग ट्रेंडशी सुसंगत राहण्यासाठी व प्रभावासाठी 11 नोव्हेंबर 2008 रोजी कंपनीला नवीन समावेशाचे प्रमाणपत्र जारी केले गेले.

कंपनीच्या आतापर्यंतच्या शतकोत्तर वाटचालीतील महत्वाच्या घटना –

वर्षघटनाक्रम
१९१८ आमच्या कंपनीचे संस्थापक संचालक असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद, श्री सच्चिदानंद सिन्हा आणि श्री सय्यद हसन इमाम यांच्यासह अन्य व्यक्तींनी ‘द बेहार जर्नल्स लिमिटेड’ नावाने प्रकाशन कंपनीची स्थापना केली.
१९१९ आमच्या कंपनीच्या व्यवसायाची सुरुवात. पाटणा येथे मुद्रणालय सुरू करण्यात आले. ‘सर्चलाइट’ या इंग्रजी वृत्तपत्राची छपाई आणि प्रकाशन सुरू झाले.
१९४७ पाटणा येथून हिंदी दैनिक ‘प्रदीप’ची छपाई आणि प्रकाशन सुरू.
१९८६ पाटणा येथून हिंदुस्तान टाइम्स लिमिटेडच्या वतीने ‘हिंदी दैनिक हिंदुस्थान’ आणि इंग्रजी दैनिक ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या छपाईला सुरुवात. हिंदी दैनिक ‘प्रदीप’आणि इंग्रजी दैनिक ‘सर्चलाइट’चे मुद्रण आणि प्रकाशन बंद.
१९८७ कंपनीचे नाव बदलून ‘सर्चलाइट पब्लिशिंग हाऊस लिमिटेड’ असे करण्यात आले.
२००० हिंदी दैनिक ‘हिंदुस्तान’ आणि इंग्रजी दैनिक ‘हिंदुस्तान टाईम्स’ची छपाई रांची या ठिकाणाहून सुरू झाली. यासाठी या प्रकाशनाची होल्डिंग कंपनी आणि प्रकाशक द हिंदुस्तान टाईम्स लिमिटेड यांच्याशी मुद्रण करार करण्यात आला.
२००८ कंपनीचे नाव बदलून ‘हिंदुस्तान मीडिया व्हेंचर्स लि.’ असे करण्यात आले. जेणेकरुन आमच्या कंपनीच्या विस्तारित व्यावसायिक क्रियाकलापांना प्रतिबिंबित करता येईल.
२००९ हिंदी दैनिक वृत्तपत्र, हिंदुस्थानचा समावेश असलेल्या एचटी मीडियाकडून ‘रविवश्री हिंदुस्तान’सह ‘नंदन’ आणि ‘कादंबिनी’ मासिके आणि या प्रकाशनांची इंटरनेट पोर्टल्स सुरू करण्यात आली. ज्यात उक्त हिंदी व्यवसायाशी संबंधित सर्व मालमत्ता, दायित्वे आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
२०१० कंपनीने शेअर्सची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) केली. एकूण रु. 270 कोटी आणि 21 जुलै 2010 रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध (Listed) झाले