पंजाबचा नेट रनरेट बेंगळुरूपेक्षा चांगला -सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीचे केवळ २ गुण होते आणि संघ दहाव्या क्रमांकावर संघर्ष करत होता. मात्र हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर संघाने २ गुणांची कमाई केली.
(PTI)पण तरी RCB संघ दहाव्या स्थानावर आहे. त्यामागचे कारण म्हणजे नेट रन रेट. वास्तविक, पंजाब किंग्जने देखील २ सामने जिंकून ४ गुण मिळवले आहेत, परंतु पंजाबचा नेट रनरेट आरसीबीपेक्षा खूपच चांगला आहे.
(AFP)हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीचा नेट रनरेट -१.०४६ होता, तर पंजाब किंग्जचा नेट रनरेट -०.२९२ होता. या सामन्यानंतर, RCB चा NRR आता -०.७२१ वर पोहोचला आहे, ज्यामध्ये सुधारणा झाली आहे, परंतु पंजाबच्या नेट रनरेटला मागे टाकण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळे आरसीबी ४ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
(PTI)SRH संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम- दरम्यान, पराभवानंतरही सनरायझर्स हैदराबादला विशेष फरक पडलेला नाही. या सामन्यापूर्वी, SRH चा नेट रन रेट ०.९१४ होता, जो आता ०.५७७ झाला आहे, जो कमी झाला आहे,
(ANI)परंतु इतकाही नाही की तो लखनौ सुपर जायंट्सपेक्षा कमी होईल. LSG चा नेट रन रेट अजूनही ०.१४८ आहे. अशा स्थितीत हैदराबादचा संघ आजही पूर्वीप्रमाणेच तिसऱ्या क्रमांकावर आहे.
(AP)