मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG Vs KKR : केकेआरच्या गोलंदाजांची तुफानी कामगिरी, लखनौचा धुव्वा उडवत कोलकाता प्ले ऑफमध्ये दाखल

LSG Vs KKR : केकेआरच्या गोलंदाजांची तुफानी कामगिरी, लखनौचा धुव्वा उडवत कोलकाता प्ले ऑफमध्ये दाखल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 05, 2024 07:08 PM IST

LSG Vs KKR IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये लखनौ आज सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. या सामन्यात केकेआरने लखनौचा ९८ धावांनी पराभव केला.

Lucknow Super Giants Vs Kolkata Knight Riders Match Scorecard
Lucknow Super Giants Vs Kolkata Knight Riders Match Scorecard (PTI)

इंडियन प्रीमियर लीग२०२४ चा ५४ वा सामना आज (५ मे) लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर केकेआरने लखनौचा ९८ धावांनी पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६ षटकात १३७ धावांत गडगडला. केकेआरकडून सुनील नरेनने सर्वाधिक ८१ धावा केल्या. गोलंदाजीत हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३ बळी घेतले. 

लखनौ वि. केकेआर क्रिकेट स्कोअर

लखनौला पाचवा धक्का

रसेलने लखनौची पाचवी विकेटही घेतली. त्याने निकोलस पूरनला सॉल्टकरवी झेलबाद केले. हा त्याचा दुसरा विकेट आहे. पुरनला केवळ १० धावा करता आल्या. ॲश्टन टर्नर सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. संघाला विजयासाठी ५० चेंडूत १३१ धावांची गरज आहे.

लखनौला पहिला धक्का

लखनौला पहिला धक्का दुसऱ्या षटकात २० धावांवर बसला. मिचेल स्टार्कने अर्शीन कुलकर्णीला रमणदीप सिंगकडे झेलबाद केले. रमणदीपने धावत जात शानदार झेल घेतला. तो ९ धावा करून बाद झाला. दोन षटकांनंतर लखनौची धावसंख्या एका विकेटवर २० धावा आहे.

केकआरच्या २३६ धावा

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ६ गडी गमावून २३५ धावा केल्या. या सामन्यात केकेआरने दमदार सुरुवात केली होती. सुनील नरेन आणि फिल सॉल्ट यांच्यात पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी झाली जी नवीन-उल-हकने मोडली. त्याने सॉल्टला बाद केले. तो ३२ धावा करून बाद झाला.

तर नरेनने ८१ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६चौकार आणि ७ षटकार आले. रवी बिश्नोईने त्याला आपला बळी बनवले. संघाला तिसरा धक्का आंद्रे रसेलच्या रूपाने बसला. नवीन-उल-हकने त्याला शिकार बनवले. त्याला केवळ १२ धावा करता आल्या. 

यानंतर युधवीर सिंहने अंगक्रीष रघुवंशी याची शिकार केली. तो २६ चेंडूत ३२ धावांची खेळी खेळून परतला. या सामन्यात रिंकू सिंगने १६ धावा, श्रेयस अय्यरने २३ धावा, रमणदीप सिंगने २५ धावा केल्या.

रमणदीप आणि व्यंकटेश नाबाद राहिले. लखनौकडून नवीन-उल-हकने ३ बळी घेतले. तर यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि युधवीर सिंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

कोलकाताला पाचवा धक्का

कोलकाताला रिंकू सिंगच्या रूपाने पाचवा धक्का बसला. नवीन-उल-हकने त्याला आपला बळी बनवले. या सामन्यात तो १६ धावा करण्यात यशस्वी ठरला. रमणदीप सिंग सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. १८ षटकांनंतर संघाची धावसंख्या २००/५ आहे.

कोलकाताला दुसरा धक्का

रवी बिश्नोईने कोलकाताला दुसरा धक्का दिला. त्याने सुनील नरेनला १४० धावांवर बाद केले. या सामन्यात तो ८१ धावा करून बाद झाला. यादरम्यान नरेनने आंगक्रिश रघुवंशीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

सुनील नरेनचे अर्धशतक

सुनील नरेनने २७ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. तो जबरदस्त फॉर्मात असून त्याचे हे या मोसमातील तिसरे अर्धशतक आहे. त्याचवेळी त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे सातवे अर्धशतक आहे. १० षटकांनंतर संघाची धावसंख्या ११०/१ आहे.

कोलकाताला पहिला धक्का

नवीन-उल-हकने कोलकाताला पहिला धक्का दिला. त्याने फिल सॉल्टला आपला बळी बनवले. तो १४ चेंडूत ३२ धावा करून परतला. सॉल्टने सुनील नरेनसोबत पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. आंगकृष्ण रघुवंशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव सुरू

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव सुरू झाला आहे. सुनील नरेन आणि फिल सॉल्ट सलामीला आले आहेत. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. मार्कस स्टॉइनिस डावातील पहिले षटक टाकत आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर.

लखनौने टॉस जिंकला

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. केएल राहुलने सांगितले की, या सामन्यात लखनौचा संघ एका बदलासह खेळताना दिसेल. मयंक यादवच्या जागी यश ठाकूर खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर कोलकाता प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल न करता खेळणार आहे.

IPL_Entry_Point