मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs CSK : कोहलीची आरसीबी प्लेऑफमध्ये, धोनी-जडेजाला शेवटच्या षटकात १७ धावा निघाल्या नाहीत, सीएसकेचा पराभव

RCB vs CSK : कोहलीची आरसीबी प्लेऑफमध्ये, धोनी-जडेजाला शेवटच्या षटकात १७ धावा निघाल्या नाहीत, सीएसकेचा पराभव

May 19, 2024 12:10 AM IST

RCB vs CSK IPL 2024 Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये एन्ट्री केली आहे. करो या मरोच्या सामन्यात त्यांनी सीएसकेला धुळ चारली.

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings, 68th Match
Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings, 68th Match (RCB-X)

करा किंवा मरोच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव केला. यासह आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. प्रथम खेळताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला ७ विकेट्सवर केवळ १९१ धावा करता आल्या.

ट्रेंडिंग न्यूज

आरसीबीने सीएसकेला २११ धावांचे लक्ष्य दिले होते, पण सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान २०१ धावा करायच्या होत्या, परंतु यश दयालने शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करत आरसीबीचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला. 

यश दयालने शेवटच्या षटकात एमएस धोनीला बाद केले आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी CSK ला आवश्यक धावा (१७) करू दिल्या नाहीत.

यश दयालचे शेवटचे षटक

पहिला चेंडू- ६ धावा (षटकार) (महेंद्रसिंह धोनी)

दुसरा चेंडू- विकेट (महेंद्रसिंह धोनी)

तिसरा चेंडू- ०० (शार्दुल ठाकूर)

चौथा चेंडू- १ धाव (शार्दुल ठाकूर)

पाचवा चेंडू- ०० धावा (रवींद्र जडेजा)

सहावा चेंडू- ०० धावा (रवींद्र जडेजा)

तत्पूर्वी, लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला चांगली सुरुवात करता आली नाही. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाने कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट गमावली होती. त्यानंतर लवकरच संघाला आणखी एक धक्का बसला. पण, तिसऱ्या विकेटसाठी रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी ६६ (४१ चेंडू) धावांची भागीदारी करून संघाला स्थैर्य मिळवून दिले, मात्र त्यानंतर संघाला स्थैर्य मिळवून देता आले नाही. जडेजा आणि धोनीने सातव्या विकेटसाठी ६१ धावांची (२७ चेंडू) भागीदारी करून संघाला पुन्हा विजयाच्या जवळ आणले पण, शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सीएसकेकडून रचिन रविंद्रने ३७ चेंडूत ६१ धावा, रविंद्र जडेजाने २२ चेंडूत ४२ आणि धोनीने १३ चेंडूत २५ आणि अजिंक्य रहाणेने २२ चेंडूत ३३ धावा केल्या.

आरसीबीचा डाव

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आल्यानंतर आरसीबीने चांगली सुरुवात केली. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात पॉवर प्लेच्या पहिल्या ३ षटकांमध्ये विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात ३१ धावांची भागीदारी झाली.

यानंतर पॉवर प्लेच्या शेवटच्या ३ षटकात केवळ ११ धावा झाल्या. मात्र, पॉवरप्लेनंतर कोहली आणि डुप्लेसिसकडून तुफान खेळी झाली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी झाली. 

दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सँटनरने किंग कोहलीला झेलबाद केले. तो २९ चेंडूत ४७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ४ षटकार आले. संघाला दुसरा धक्का कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या रूपाने बसला, त्याने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला ३९ चेंडूत ५४ धावा करता आल्या. तो धावबाद झाला. 

यानंतर रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांनी डाव सावरला. दोघांमध्ये ७१ धावांची भागीदारी झाली जी १८व्या षटकात शार्दुल ठाकूरने मोडली. त्याने भारतीय फलंदाजाला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले. पाटीदारने या सामन्यात २३ चेंडूंचा सामना केला आणि २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला दिनेश कार्तिक १४ धावा करून बाद झाला.

त्याला तुषार देशपांडेने धोनीच्या हाती झेलबाद केले. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने केवळ ५ चेंडूंचा सामना करताना १६ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ चौकार आणि एक षटकार लगावला. तर कॅमेरॉन ग्रीन ३८ आणि महिपाल लोमरर  शुन्यावर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने २ तर तुषार आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

टी-२० वर्ल्डकप २०२४