मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs SRH Live Streaming: मुंबई आज हैदराबादशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

MI vs SRH Live Streaming: मुंबई आज हैदराबादशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 06, 2024 10:08 AM IST

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएलमधील ५५वा खेळला जाणार आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि हैदराबाद यांच्या सामना रंगणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि हैदराबाद यांच्या सामना रंगणार आहे.

IPL 2024: आयपील २०२४ च्या ५५व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ आज एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबईच्या संघाने अत्यंत खराब कामगिरी केली. मुंबईने ११ सामन्यापैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. ज्यामुळे मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. दुसरीकडे हैदराबादने १० पैकी सहा सामने जिंकले आहेत. तर, चार सामने गमावले आहे. गुणतालिकेत हैदराबादचा संघ १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर, मुंबईचा संघ सहा गुणांसह गुणतालिकेच्या तळाशी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज (०६ मे २०२४) आयपीएलमधील ५५वा सामना खेळला जाईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

LSG Vs KKR : केकेआरची प्लेऑफमध्ये एन्ट्री, सुनील नरेन- आंद्रे रसेलच्या बळावर कोलकाताने लखनौला लोळवलं

सनरायझर्स हैदराबादचा संघ:

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंह, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, एडन मार्कराम , सनवीर सिंग, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, आकाश महाराज सिंह.

LSG vs KKR Head To Head : लखनौ-केकेआर भिडणार, कोणता संघ मजबूत? सामन्यात किती धावा निघणार? जाणून घ्या

मुंबई इंडियन्सचा संघ:

इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, देवाल्ड ब्रेविस , रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय, ल्यूक वुड, श्रेयस गोपाल, हार्विक देसाई, अर्जुन तेंडुलकर, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, क्वेना मफाका

IPL_Entry_Point