LSG vs KKR Head To Head : लखनौ-केकेआर भिडणार, कोणता संघ मजबूत? सामन्यात किती धावा निघणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs KKR Head To Head : लखनौ-केकेआर भिडणार, कोणता संघ मजबूत? सामन्यात किती धावा निघणार? जाणून घ्या

LSG vs KKR Head To Head : लखनौ-केकेआर भिडणार, कोणता संघ मजबूत? सामन्यात किती धावा निघणार? जाणून घ्या

May 04, 2024 10:09 PM IST

lsg vs kkr pitch report : लखनौचा संघ सध्या १० सामन्यांत ६ विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर KKR १० सामन्यांमध्ये ७ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

LSG vs KKR Head To Head : लखनौ-केकेआर भिडणार, कोणता संघ मजबूत? सामन्यात किती धावा निघणार? जाणून घ्या
LSG vs KKR Head To Head : लखनौ-केकेआर भिडणार, कोणता संघ मजबूत? सामन्यात किती धावा निघणार? जाणून घ्या

LSG vs KKR Head To Head Record : आयपीएल २०२४ च्या ५४वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना (५ मे) लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

लखनौचा संघ सध्या १० सामन्यांत ६ विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर KKR १० सामन्यांमध्ये ७ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे .

लखनौ वि. केकेआर हेड टू हेड

अशा परिस्थितीत, रविवारी होणाऱ्या या सामन्याची खेळपट्टी कशी असू शकते आणि लखनऊ आणि केकेआर यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी काय सांगते, याबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत.

लखनऊ आणि केकेआर यांच्यात आतापर्यंत फक्त ४ सामने खेळले गेले आहेत. यापैकी लखनौ संघाने ३ सामने जिंकले आहेत तर केकेआरने केवळ एकच सामना जिंकला आहे. 

अशा स्थितीत लखनौ संघाचा वरचष्मा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. IPL मध्ये KKR विरुद्ध लखनौ संघाची सर्वात मोठी धावसंख्या २१० धावा आहे, तर KKR संघाची धावसंख्या २०८ आहे. या मोसमात, दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना आहे. 

लखनौ वि. केकेआर एकना स्टेडियम पीच रिपोर्ट

या मोसमाकडे पाहता, लखनौच्या मैदानावर मोठी धावसंख्या झालेली नाही. एकना स्टेडियमच्या खेळपट्टीवर या सामन्यात १७० ते १८० धावांचा स्कोअर होऊ शकतो. अशा स्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला दवची भूमिका लक्षात घेऊन धावसंख्या दोनशेच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

आतापर्यंत एकना स्टेडियमवर फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. या स्टेडियमवर आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या २ सामन्यांमध्ये नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर शेवटच्या ४ सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे.

Whats_app_banner