Kavya Maran hugs Kane Williamson Video : आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्य हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांचा प्रवास संपला आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना (१७ मे) पावसामुळे वाहून गेला. हा सामना रद्द झाल्याने सनरायझर्य हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे.
हा सामना रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर गुजरातचा खेळाडू आणि सनरायझर्य हैदराबादची मालकीण काव्या मारन यांनी एकमेकांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ SRH ने त्यांच्या अधिकृत X हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
IPL 2024 : आयपीएलचे संघ मालक आणि ‘या’ खेळाडूंमधील वाद चांगलेच गाजले, यादी मोठी आहे, पाहा
व्हिडीओमध्ये हैदराबादची मालकीण काव्या मारन गुजरात टायटन्सचा फलंदाज केन विल्यमसनला मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वास्तविक, सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटत होते. या दरम्यान, काव्या विल्यमसनला भेटल्या.
विशेष म्हणजे, केन विल्यमसन बरीच वर्षे सनरायझर्य हैदराबादकडून खेळला आहे. तो संघाचा कर्णधारदेखील होता.
सोशल मीडिया युजर्सनीया व्हिडिओवर मनोरंजक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, आज मी काव्या मारनचा आवाज ऐकला. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, केन एक सज्जन आहे. या व्हिडीओवर लाखो लाइक्स आणि व्ह्यूज आले आहेत.
सामना रद्द झाल्याचा फायदा सनरायझर्स हैदराबादला झाला कारण तो IPL २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ बनला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला सामना रद्द झाल्यानंतर 'क्यू' अर्थात प्लेऑफ पात्रतेचा अधिकृत शिक्का मिळाला. ऑरेंज आर्मी हा कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे.
सनरायझर्स हैदराबाद - संघ हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत वायस्कांत, टी नटराजन, उमरान मलिक, मयंक अगरवाल. ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग
गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी, संदीप वॉरियर, अभिनव मनोहर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, जयंत यादव, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, विजय शंकर, जोशुआ लिटल, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, मानव सुथार, गुरनूर ब्रार.
संबंधित बातम्या