आयपीएल २०२४ च्या ५५व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. IPL २०२४ च्या गुणतालिकेत हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स तळाशी आहे. मुंबईसाठी प्लेऑफचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. तर, आणखी एक विजय मिळवून प्लेऑफच्या जवळ पोहोचण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल.
या हंगामात मुंबईने ११ पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर हैदराबाद यंदाच्या मोसमात १० पैकी ६ जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. या हंगामात दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असेल.
मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामना आज (६ मे) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
दरम्यान, पंजाब असो की सीएसके, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक- हेनरिक क्लासेन, इशान किशन
फलंदाज- रोहित शर्मा, ट्रॅव्हिस हेड, सूर्यकुमार यादव
अष्टपैलू खेळाडू- अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, पॅट कमिन्स
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, टी-नटराजन, जेराल्ड कोएत्झी
कर्णधार- रोहित शर्मा (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार)
वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. या मैदानावर फलंदाज मोठ्या प्रमाणावर धावा करताना दिसतात. मात्र, येथील विकेटही वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाजांना चांगली उसळी आणि वेग मिळतो. त्याचवेळी, रात्रीच्या वेळी दव असल्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
मुंबई इंडियन्स- इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नमन धीर, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅन्सन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
संबंधित बातम्या