MI vs SRH Head to Head: मुंबई-हैदराबादमध्ये आज रंगणार क्रिकेटचा थरार; जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड आणि संभाव्य संघ
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs SRH Head to Head: मुंबई-हैदराबादमध्ये आज रंगणार क्रिकेटचा थरार; जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड आणि संभाव्य संघ

MI vs SRH Head to Head: मुंबई-हैदराबादमध्ये आज रंगणार क्रिकेटचा थरार; जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड आणि संभाव्य संघ

May 06, 2024 10:33 AM IST

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Head to Head Record: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोणत्या संघाचे पारडे जड आहे, हे जाणून घेऊयात.

कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई आज हैदराबादशी दोन हात करणार आहे.
कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई आज हैदराबादशी दोन हात करणार आहे. (AFP)

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ५५व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईसाठी प्लेऑफचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. तर, आणखी एक विजय मिळवून प्लेऑफच्या जवळ पोहोचण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल. या हंगामात मुंबईने ११ पैकी केवळ तीन सामने जिंकले आहेत. तर हैदराबाद यंदाच्या मोसमात १० पैकी ६ जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. या हंगामात दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असेल.

आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. हैदराबादने हा सामना ३१ धावांनी जिंकला. हा उच्च स्कोअरचा सामना होता. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकात २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सच्या संघाला २४६ धावांपर्यंत मजल मारली. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो.

LSG Vs KKR : केकेआरची प्लेऑफमध्ये एन्ट्री, सुनील नरेन- आंद्रे रसेलच्या बळावर कोलकाताने लखनौला लोळवलं

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २२ सामने खेळले गेले. यातील मुंबईने १२ सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादच्या संघाला १० सामन्यात विजय मिळवता आला. वानखेडे मैदानावर मुंबईने हैदराबादविरुद्ध ५-२ अशी आघाडी घेतली आहे.

CSK vs PBKS Head to Head : धर्मशालाच्या मैदानावर सीएसकेसमोर पंजाबचं आव्हान; पीच रिपोर्ट, हेड टू हेड रेकॉर्ड, पाहा

खेळपट्टी अहवाल

वानखेडे स्टेडियम मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हाय स्कोरिंग सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात आम्हाला त्याची वेगळी बाजू दिसली, ज्यात एमआय आणि केकेआरचे फिरकीगोलंदाज समोर आले. केकेआरकडून पियुष चावलाने तीन षटकांत १५ धावांत एक विकेट घेतला, तर सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी ४ षटकांत २२ धावांत प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले.

मुंबईची प्लेईंग इलेव्हन:

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, इम्पॅक्ट प्लेअर- नेहल वधेरा.

हैदराबादची प्लेईंग इलेव्हन:

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, इम्पॅक्ट प्लेअर- जयदेव उनाडकट/उमरान मलिक.

Whats_app_banner
विभाग