मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs LSG Weather Report : मुंबई-लखनौ सामना होणार का? आज असं असेल मुंबईचं हवामान, पाहा

MI vs LSG Weather Report : मुंबई-लखनौ सामना होणार का? आज असं असेल मुंबईचं हवामान, पाहा

May 17, 2024 10:46 AM IST

mi vs lsg weather report : मुंबई इंडियन्ससाठी यंदाचे आयपीएल चांगले राहिले नाही. ५ वेळचा विजेता सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

MI vs LSG Weather Report : मुंबई-लखनौ सामना होणार का? आज असं असेल मुंबईचं हवामान, पाहा
MI vs LSG Weather Report : मुंबई-लखनौ सामना होणार का? आज असं असेल मुंबईचं हवामान, पाहा (PTI)

आयपीएल २०२४ चा ६७वा सामना आज (१७ मे) मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयमवर खेळला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी यंदाचे आयपीएल चांगले राहिले नाही. ५ वेळचा विजेता सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाला या हंगामाचा शेवट विजयाने करायचा आहे. पण त्यांच्यासमोर लखनौचे मोठे आव्हान आहे. 

मुंबईचं हवामान कसे असेल?

सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत कारण हा सामना मुंबईत होणार असून काही दिवसांपूर्वी येथे वादळ आले होते. अशा स्थितीत हा सामना होणार की पाऊस आणि खराब हवामानाचा फटका सामन्याला बसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसं पाहिलं तर, मुंबईत शुक्रवारी तापमान २९ अंश राहण्याची शक्यता असल्याने परिस्थिती सामन्य असण्याचा अंदाज आहे. मात्र, Accuweather च्या अंदाजानुसार, रात्री उशिरा वादळ येऊ शकते. 

पावसामुळे सामना वाहून गेला तर?

पावसामुळे हा सामना वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा परिस्थितीत मुंबईचा संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहून लीग संपवेल आणि तीन वर्षांत दुसऱ्यांदा असे घडेल.

मुंबई वि. लखनौ पीच रिपोर्ट

वानखेडे हे भारतातील ऐतिहासिक मैदानांपैकी एक आहे. या मैदानावरची पीच लाल मातीची आहे. या प्रकारच्या खेळपट्टीवर सहसा बाउन्स दिसून येतो. सुरुवातीला या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळू शकेल पण त्यानंतर फलंदाजांचे काम सोपे होईल. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि त्यामुळे हाय स्कोअरिंग सामने पाहायला मिळतात. ही खेळपट्टी सपाट आहे, ज्यामुळे चौकार आणि षटकार मारणे सोपे होते.

वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ११५ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५३ सामने जिंकले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने ६२ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने या मैदानावर ६० सामने जिंकले आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४