केकेआरने रविवारी लखनौ सुपर जायंट्सचा ९८ धावांनी पराभव केला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. कोलकाताने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांनी तीन सामने गमवावे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा नेट रन रेट +१.४५३ आहे.
(PTI)यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांनी १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांनी २ सामने गमवावे लागले आहेत. संजू सॅमसनचा संघ सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. नेट रनरेटमध्ये ते केकेआरपेक्षा मागे आहेत. राजस्थानचा नेट रन रेट +०.६२२ आहे.
(ANI)चेन्नई सुपर किंग्जने रविवारी पंजाब किंग्जला पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सीएसकेने ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यांनी ५ सामने गमावले आहेत. आता त्यांचे १२ गुण झाले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या संघाचा नेट रन रेट ०.७०० आहे.
(ANI)सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने १० पैकी ६ सामने जिंकले आहेत तर ४ सामने गमावले आहेत. तसेच त्यांचे १२ गुण आहेत. नेट रनरेटच्या बाबतीत मात्र ते थोडे मागे आहेत. हैदराबादचा नेट रन रेट +०.०७२ आहे.
( AFP)लखनौ सुपर जायंट्सला रविवारी केकेआरकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचे ११ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत. त्यांनी ६ सामने जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. लखनौचा नेट रन रेट -०.३७१ आहे.
(PTI)दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर आहे. त्यांनी ११ पैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यांनी ६ सामने गमावले आहेत. दिल्लीचे १० गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट -०.४४२ आहे.
(PTI)रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सला पराभूत करत सातव्या स्थानावर झेप घेतली. त्यांनी ११ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्यांनी ७ सामने गमावले आहेत. आता त्यांचे ८ गुण झाले आहेत. फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीचा नेट रन रेट -०.०४९ आहे.
(PTI)पंजाब किंग्ज गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. पंजाबने ११ सामने खेळले आहेत. त्यांनी ४ सामने जिंकले आहेत तर उर्वरित ७ सामने गमावले आहेत. त्यांचे ८ गुण आहेत. नेट रनरेटमध्ये पंजाब पिछाडीवर आहे. त्यांचा नेट रन रेट -०.१८७ आहे.
(AFP)गुजरात टायटन्स नवव्या स्थानावर आहे. त्यांचे ११ सामान्य ८ गुण आहेत. गुजरातने ४ सामने जिंकले आहेत आणि ७7 हरले आहेत. गुजरातचा नेट रनरेट -१.३२० आहे.
(ANI)