RCB VS CSK : आरसीबी ८ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये, चाहते वेडे झाले, बंगळुरूच्या रस्त्यांवर रात्रभर जल्लोष
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB VS CSK : आरसीबी ८ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये, चाहते वेडे झाले, बंगळुरूच्या रस्त्यांवर रात्रभर जल्लोष

RCB VS CSK : आरसीबी ८ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये, चाहते वेडे झाले, बंगळुरूच्या रस्त्यांवर रात्रभर जल्लोष

Updated May 19, 2024 11:31 AM IST

RCB VS CSK : आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. पहिल्या आठ सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदवणाऱ्या आरसीबीने सलग ६ सामने जिंकून टॉप-४ मध्ये स्थान मिळवले आहे.

RCB VS CSK : आरसीबी ८ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये, चाहे वेडे झाले, बंगळुरूच्या रस्त्यांवर रात्रभर जल्लोष
RCB VS CSK : आरसीबी ८ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये, चाहे वेडे झाले, बंगळुरूच्या रस्त्यांवर रात्रभर जल्लोष

RCB FANS CELEBRATION : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी (१८ मे) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव करून चमत्कार घडवला. आरसीबीने ८ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला, विशेष म्हणजे, आरसीबीने सुरुवातीचे ७ सामने गमावले होते, यानंतर त्यांनी या स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले आणि आपल्या चाहत्यांना सेलिब्रेशन करण्याची संधी दिली.

सीएसकेला हरवल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साह आला आहे. रात्री उशिरा, आरसबीचे चाहते रस्त्यावर उतरले आणि विजय साजरा केला. चाहते बस आणि कारच्या छतावर चढले होते. यावेळी चाहत्यांनी नाचून आणि घोषणा देऊन आनंद साजरा केला.

आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. पहिल्या आठ सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदवणाऱ्या आरसीबीने सलग ६ सामने जिंकून टॉप-४ मध्ये स्थान मिळवले आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसबीला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सीएसकेला एका निश्चित फरकाने पराभूत करणे आवश्यक होते. सामन्याच्या दिवशी आरसीबीचे खेळाडू प्रचंड उत्साहाने भरलेले दिसले आणि त्यांनी ते संपूर्ण सामन्यात दाखवून दिले.

RCB ने व्हिडिओ शेअर केला

आरसीबीच्या विजयानंतर, फ्रँचायझीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, जो पटकन व्हायरल झाला. आरसीबीच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की चाहते स्टेडियमपासून हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर उभे आहेत आणि आपल्या स्टार्सची एक झलक मिळण्याच्या आशेने दोन्ही हात हलवत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना आरसीबीने कॅप्शन लिहिले की, रात्री दीड वाजताचे हे दृश्य आहे. या गोष्टी अधिक खास बनवते. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम चाहते आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे'.

आरसीबीचा अप्रतिम विजय

सामन्यावर नजर टाकली तर फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबीने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात २१८/५ धावा केल्या. प्रत्युत्तरात CSK संघाला २० षटकात १९१/७ धावा करता आल्या. १८ मे रोजी आयपीएलमध्ये आरसीबीने सीएसकेचा पराभव करण्याची ही तिसरी वेळ होती.

१८ मे हा दिवस आरसीबीसाठी खास आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत १८ मे रोजी आरसीबीने कधीही सामना हरलेला नाही. विराट कोहलीचा जर्सी नंबर तुम्हाला माहीत आहेच.

Whats_app_banner

संबंधित बातम्या